Padma Award 2022 : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार जाहीर, प्रभा अत्रे यांचा पद्म विभूषण तर सत्या नडेला आणि सुंदर पिचाईला पद्मभुषण जाहीर, महाराष्ट्रातील १० जणांचा पद्म पुरस्काराने सन्मान

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कार जाहीर केले आहेत. त्यात महाराष्ट्रातील शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचा पद्म विभुषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. तसेच जनरल बिपीन राव यांचा मृत्यूपश्चात पद्म विभुषणपुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.

padm award
पद्म विभूषण  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कार जाहीर केले आहेत.
  • महाराष्ट्रातील शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचा पद्म विभुषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.
  • महाराष्ट्रातील १० जणांचा सन्मान पद्म पुरस्काराने सन्मान

Padma Award 2022 : नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कार जाहीर केले आहेत. त्यात महाराष्ट्रातील शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचा पद्म विभुषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. तसेच जनरल बिपीन राव यांचा मृत्यूपश्चात पद्म विभुषणपुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. तसेच गूगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सीईओ सत्या नडेला यांचाही पद्म भुषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 


पद्मविभूषण

यंदा भारत सरकराने चार जणांना पद्म विभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केल आहे. त्यात महाराष्ट्रातील कला क्षेत्रातील शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांना पद्म विभूषण पुरस्कार देण्यात आला आहे. तसेच शिक्षण आणि साहित्य क्षेत्रातील उत्तर प्रदेशचे श्री राधेश्याम खेमका, नागरी सेवा क्षेत्रातील जनरल बिपीन रावत आणि सामाजिक कार्यातील कल्याण सिंह यांना मृत्यूपश्चात पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. 

सत्या नडेला आणि सुंदर पिचाईचा गौरव

गूगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सीईओ सत्या नडेला यांना भारत सरकारने पद्म भुषण पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. 


महाराष्ट्रातील १० जणांचा सन्मान

भारत सरकारने राज्यातील १० जणांचा पद्म पुरस्काराने सन्मान केला आहे. त्यात प्रभा अत्रे यांना कला क्षेत्रातील कामगिरीमुळे पद्म विभूषण जाहीर करण्यात आला आहे. सायरस पुनावाला आणि नटराजन चंद्रशेखरन यांना पद्म भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. हिम्मतराव बावस्कर, डॉ. विजयकुमार गावित, डॉ. भीमसेन सिंघल, आणि डॉ. बालाजी त्यांबे यांना मृत्यू पश्चात वैद्यकीय क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केल्याबद्दल पद्म भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर अनिल कुमार राजवंशी यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील कामगिरीबद्दल भारत सरकारने पद्म भूषण जाहीर केला आहे. गायिका सुलोचना चव्हाण आणि गायक सोनू निगमला संगीत क्षेत्रातील कामगिरीमुळे पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.  

पहा पद्म पुरस्काराची संपूर्ण यादी

पद्म विभूषण 
1. प्रभा अत्रे कला महाराष्ट्र
2. राधेश्याम खेमका (मृत्यूपश्चात), साहित्य आणि शिक्षण उत्तर प्रदेश
3 जनरल बिपिन रावत (मृत्यूपश्चात), नागरी सेवा उत्तराखंड
4. कल्याण सिंह (मृत्यूपश्चात), समाजसेवा उत्तर प्रदेश

पद्म भूषण (17)
5. गुलाम नबी आजाद, सामाजिक कार्य जम्मू आणि कश्मीर
6. विक्टर बनर्जी, कला पश्चिम बंगाल
7. गुरमीत बावा (मृत्यूपश्चात), कला पंजाब
8. बुद्धदेव भट्टाचार्जी, समाजसेवा पश्चिम बंगाल
9. नटराजन चंद्रशेखर,  व्यापार आणि उद्योग महाराष्ट्र
10. कृष्ण एला आणि मती, सुचित्रा एला (संयुक्त)  व्यापार आणि उद्योग तेलंगाणा
11. मधुर जाफरी, अमेरिका
12. देवेंद्र झाझरिया, क्रीडा राजस्थान
13. राशिद खान, कला उत्तर प्रदेश
14. राजीव महर्षि, नागरी सेवा राजस्थान
15. सत्य नारायण नडेला,  व्यापार आणि उद्योग अमेरिका
16. सुंदरराजन पिचाई,  व्यापार आणि उद्योग अमेरिका
17. साइरस पूनावाला,  व्यापार आणि उद्योग महाराष्ट्र
18. संजय राजाराम (मृत्यूपश्चात), विज्ञान आणि अभियांत्रिकी मेक्सिको
19 सुश्री प्रतिभा राय, साहित्य आणि शिक्षण  ओडिशा
20 स्वामी सच्चिदानंद, साहित्य आणि शिक्षण  गुजरात
21. वशिष्ठ त्रिपाठी, साहित्य आणि शिक्षण उत्तर प्रदेश

पद्म. (107)
22. प्रल्हाद राय अग्रवाल,  व्यापार आणि उद्योग पश्चिम बंगाल
23 प्रो. नजमा अख्तर, साहित्य आणि शिक्षण  दिल्ली
24. सुमित अंतिल, क्रीडा हरियाणा
25. टी सेनका एओ, साहित्य आणि शिक्षण  नागालँड
26 सुश्री कमलिनी अस्थाना आणि नलिनी अस्थाना, (संयुक्त) कला उत्तर प्रदेश
27. सुब्बान्ना अय्यप्पन, विज्ञान आणि अभियांत्रिकी कर्नाटक
28. जे के बजाज, साहित्य आणि शिक्षण  दिल्ली
29. सिरपी बालासुब्रमण्यम, साहित्य आणि शिक्षण  तमिळनाडू
30. मद बाबा बलिया, सामाजिक कार्य ओडिशा
31 संघमित्रा बंद्योपाध्याय, विज्ञान आणि अभियांत्रिकी पश्चिम बंगाल
32. माधुरी बर्थवाल, कला उत्तराखंड
33. अखोन असगर अली बशारत, साहित्य आणि शिक्षण  लद्दाख
34. डॉ. हिम्मतराव बावस्कर, वैद्यकीय महाराष्ट्र
35. हरमोहिंदर सिंह बेदी, साहित्य आणि शिक्षण  पंजाब
36. प्रमोद भगत, क्रीडा ओडिशा
37. एस बलेश भजंत्री, कला तमिळनाडू
38. खांडू वांगचुक भूटिया, क्रीडा सिक्किम
39. मारिया क्रिस्टोफर, बायर्स्की साहित्य आणि शिक्षण  पोलंड
40 आचार्य चंदनाजी, सामाजिक कार्य बिहार
41 सुश्री सुलोचना चव्हाण, कला महाराष्ट्र
42. नीरज चोपड़ा, क्रीडा हरियाणा
43. शकुंतला चौधरी, सामाजिक कार्य आसाम
44. शंकरनारायण मेनन चुंडायिल, क्रीडा केरळ
45. एस दामोदरन, सामाजिक कार्य तमिळनाडू
46. फैसल अली डार, क्रीडा जम्मू आणि कश्मीर
47. जगजीत सिंह दर्दी,  व्यापार आणि उद्योग चंडीगढ़
48. डॉ. प्रोकर दासगुप्ता, वैद्यकीय यूनाइटेड किंगडम
49. आदित्य प्रसाद दास, विज्ञान आणि अभियांत्रिकी ओडिशा
50. डॉ. लता देसाई, वैद्यकीय गुजरात
51. मालजी भाई देसाई, सामाजिक कार्य गुजरात
52. बसंती देवी, सामाजिक कार्य उत्तराखंड
53. लौरेम्बम बिनो देवी, कला मणिपुर
54. मुक्तामणि देवी,  व्यापार आणि उद्योग मणिपुर
55. श्याममणि देवी, कला ओडिशा
56. खलील धनतेजविक (मृत्यूपश्चात), साहित्य आणि शिक्षण गुजरात
57. सावजी भाई ढोलकिया, सामाजिक कार्य गुजरात
58. अर्जुन सिंह धुर्वे, कला मध्य प्रदेश
59. डॉ. विजयकुमार विनायक, डोंगरे वैद्यकीय महाराष्ट्र
60. चंद्रप्रकाश द्विवेदी, कला राजस्थान
61. धनेश्वर एंगती, साहित्य आणि शिक्षण  आसाम
62. ओम प्रकाश गांधी, सामाजिक कार्य हरियाणा
63. नरसिम्हा राव गरिकापति, साहित्य आणि शिक्षण  आंध्र प्रदेश
64. गिरधारी राम घोंजु (मृत्यूपश्चात), साहित्य आणि शिक्षण  झारखंड
65. शैबल गुप्ता (मृत्यूपश्चात), साहित्य आणि शिक्षण  बिहार
66. नरसिंह प्रसाद गुरु, साहित्य आणि शिक्षण  ओडिशा
67. गोसावीदु शेख हसन (मृत्यूपश्चात), कला आंध्र प्रदेश
68. रयुको हीरा,  व्यापार आणि उद्योग जापान
69. सोसम्मा इयपे, अन्य - पशुपालन केरळ
70. अवध किशोर जड़िया, साहित्य आणि शिक्षण मध्य प्रदेश
71. सौकार जानकी, कला तमिळनाडू
72. तारा जौहर, साहित्य आणि शिक्षण  दिल्ली
73. वंदना कटारिया, क्रीडा उत्तराखंड
74. एच आर केशवमूर्ति, कला कर्नाटक
75. रटगर कोर्टेनहॉर्स्ट, साहित्य आणि शिक्षण  आयरलैंड
76. पी नारायण कुरुप, साहित्य आणि शिक्षण  केरळ
77. अवनि लेखारा, क्रीडा राजस्थान
78. मोती लाल मदन, विज्ञान आणि अभियांत्रिकी हरियाणा
79. शिवनाथ मिश्र, कला उत्तर प्रदेश
80 डॉ नरेंद्र प्रसाद मिश्रा (मृत्यूपश्चात), चिकित्सा मध्य प्रदेश
81. दर्शनम मोगिलैया, कला तेलंगाना
82. गुरुप्रसाद महापात्र (मृत्यूपश्चात), नागरी सेवा दिल्ली
83. थविल कोंगमपट्टू ए वी.मुरुगईयन, कला पुडुचेरी
84. आर मुथुकन्नमल, कला तमिळनाडू
85. अब्दुल खादर नादकत्तिन, अन्य कर्नाटक
86. अमाई महालिंग नाइक, अन्य - कृषि कर्नाटक
87. छेरिंग नामग्याल, कला लडाख
88. ए के सी नटराजन, कला तमिळनाडू
89. वी.एल. नघाका, साहित्य आणि शिक्षण  मिझोरम
90. सोनू निगम, कला महाराष्ट्र
91. राम सहाय पांडे, कला मध्य प्रदेश
92. चिरापत प्रपंडविद्या, साहित्य आणि शिक्षण  थायलँड
93. के वी राबिया, सामाजिक कार्य केरळ
94. अनिल कुमार, राजवंशी
95. शीश रामन कला उत्तर प्रदेश
96. रामचंद्रैया, कला तेलंगाना
97. डॉ. सुनकारा वेंकट आदिनारायण राव, वैद्यकीय आंध्र प्रदेश
98. गामित रमीलाबेन रायसिंहभाई, सामाजिक कार्य गुजरात
99. पद्मजा रेड्डी, कला तेलंगाना
100 गुरु तुल्कु रिनपोछे, अन्य - अध्यात्मवाद अरुणाचल प्रदेश
101. ब्रह्मानंद सांखवळकर, क्रीडा गोवा
102. विद्यानन्द सरेक, साहित्य आणि शिक्षण  हिमाचल प्रदेश
103. काली पाड़ा सरें, साहित्य आणि शिक्षण  पश्चिम बंगाल
104. डॉ. वीरस्वामी शेषिया, चिकित्सा तमिळनाडू
105. प्रभाबेन शाह, सामाजिक कार्य दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव
106. दिलीप शाहनी, साहित्य आणि शिक्षण  दिल्ली
107. राम दयाल शर्मा, कला राजस्थान
108. विश्वमूर्ति शास्त्री, साहित्य आणि शिक्षण  जम्मू आणि कश्मीर
109. तातियाना ल्वोव्ना शौमयान, साहित्य आणि शिक्षण  रशिया
110. सिद्धलिंगैया (मृत्यूपश्चात), साहित्य आणि शिक्षण  कर्नाटक
111. काजी सिंह, कला पश्चिम बंगाल
112. कोन्सम इबोम्चा सिंह, कला मणिपुर
113. प्रेम सिंह, सामाजिक कार्य पंजाब
114. सेठ पाल सिंह, अन्य - कृषि उत्तर प्रदेश
115. विद्या विंदु सिंह, साहित्य आणि शिक्षण उत्तर प्रदेश
116 बाबा इकबाल सिंह जी, सामाजिक कार्य पंजाब
117. डॉ. भीमसेन सिंघल, वैद्यकीय महाराष्ट्र
118. शिवानंद, अन्य - योग उत्तर प्रदेश
119. अजय कुमार सोनकर, विज्ञान एवं अभियांत्रिकी उत्तर प्रदेश
120. अजीता वास्तव, कला उत्तर प्रदेश
121. सद्गुरु ब्रह्मेशानंद आचार्य स्वामी, अन्य - अध्यात्मवाद गोवा
122. डॉ. बालाजी तांबे (मृत्यूपश्चात), चिकित्सा महाराष्ट्र
123. रघुवेंद्र तंवर, साहित्य आणि शिक्षण  हरियाणा
124. डॉ. कमलाकर त्रिपाठी, चिकित्सा उत्तर प्रदेश
125. ललिता वकील, कला हिमाचल प्रदेश
126. दुर्गा बाई व्याम, कला मध्य प्रदेश
127. जयंतकुमार मगनलाल व्यास, विज्ञान आणि अभियांत्रिकी गुजरात
128. बडापलिन युद्ध, साहित्य आणि शिक्षण  मेघालय 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी