Prashant Kishore is not Joining Congress । नवी दिल्ली : राजकीय सल्लागार प्रशांत किशोर यांनी कॉंग्रेसला मोठा धक्का दिला आहे. मागील अनेक दिवसांपासून प्रशांत किशोर कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र आता सर्व चर्चांना पूर्णविराम देत प्रशांत किशोर यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबतची अधिकृत माहिती कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. (prashant kishor denied congress offer to join congress party).
रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले की, "सादरीकरण आणि चर्चेनंतर श्री.प्रशांत किशोर, काँग्रेस अध्यक्ष यांनी एक सक्षम कृती गट २०२४ ची स्थापना केली आहे. त्यानंतर कॉंग्रेस पक्षाकडून प्रशांत किशोर यांना पक्षात सामील होण्याची ऑफर देण्यात आली होती. मात्र त्यांनी ही ऑफर नाकारली असून आम्ही त्यांच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करत आहोत."
अधिक वाचा : औरंगाबादच्या सभेपूर्वी राज ठाकरे करणार 'असा' दौरा
लक्षणीय बाब म्हणजे मागील काही दिवसांपासून प्रशांत किशोर यांच्या बाबतीत अनेक तर्क वितर्क लावले जात होते. प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये सरचिटणीसपदाची सूत्रे हाती घेऊ शकतात असे बोलले जात होते. त्यांनी पक्षप्रमुखांसमोर १८ तास प्रेझेंटेशन दिल्याने याबाबत चर्चा सुरू झाली. पीके यांच्या रणनीतीनुसार कॉंग्रेस पक्ष २०२४ ची निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती.
त्यांनी ट्विट केले आहे की, "मी EAG म्हणून पक्षात सामील होण्याची आणि निवडणुकीची जबाबदारी घेण्याची काँग्रेसची ऑफर नाकारली आहे. माझ्या मतानुसार कॉंग्रेस पक्षाला परिवर्तनात्मक सुधारणांद्वारे खोलवर रुजलेल्या संरचनात्मक समस्यांचे निराकरण करण्यासाठी पक्षाला माझ्यापेक्षा अधिक नेतृत्व आणि सामूहिक इच्छाशक्तीची गरज आहे."