Prashant Kishor News | नवी दिल्ली : शनिवारी सोनिया गांधी आणि राहुल गांधींसह (Sonia Gandhi And Rahul Gandhi) काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांच्या बैठकीत प्रशांत किशोर यांनी २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या विजयासाठी 'प्लॅन ३७०' चा मंत्र शेअर केला आहे. या बैठकीत प्रशांत किशोर यांनी पक्षप्रवेश करण्यास होकार दिल्याचे देखील काँग्रेस मधील सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र त्यांनी पक्षात कोणतेही पद मागितलेले नाही. तसेच आपल्या प्रेजेंटेशनदरम्यान, त्यांनी पक्षाच्या नेत्यांशी निवडणुकीसाठी काँग्रेसच्या प्रत्येक मुद्द्यावर चर्चा केली आहे, ज्यावर राहुल गांधींनी सहमती दर्शविली आहे. (Prashant Kishor gave 'Plan 370' to the Congress, said that the way to victory in 2024).
अधिक वाचा : Mumbai : कळस यात्रेदरम्यान दोन गटात राडा
काँग्रेसच्या सूत्रांनी वृत्तसंस्था एएनआयला सांगितले की, निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (PK) लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात. सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या मॅरेथॉन बैठकीत त्यांना सल्लागार म्हणून पक्षात येण्याऐवजी पक्षात सामील होण्यास सांगण्यात आले, ज्याला पीके यांनी सहमती दर्शवली. मात्र पीके काँग्रेस पक्षात कधी प्रवेश करणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र आजपर्यंत त्यांनी पक्षात आपल्या पदासाठी कोणतीही मागणी केलेली नाही.
मागील दोन लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर मागच्या पटरीवर धावणाऱ्या काँग्रेस पक्षाला एक नवसंजीवनी हवी आहे. प्रशांत किशोर यांच्या प्रवेशाचा काँग्रेस पक्ष बदल म्हणून विचार करत आहे. पीके पक्षात गेल्याने काँग्रेसला किती फायदा होईल, हे भविष्यात स्पष्ट होईलच. मात्र शनिवारी त्यांनी आपल्या सादरीकरणाने सोनिया आणि राहुल गांधींना प्रभावित केले असल्याचे समजते.
आगामी लोकसभा निवडणुकीत २०२४ मध्ये काँग्रेस पक्षाने ३७० जागांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे पीके यांनी आपल्या सादरीकरणात सांगितले आहे. यूपी, बिहार आणि ओडिशामध्ये काँग्रेसने एकट्याने म्हणजेच स्वबळावर लढावे. तर तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात युती करून निवडणूक लढवणे अधिक योग्य ठरेल. प्रशांत किशोर यांचे म्हणणे राहुल गांधींनी मान्य केल्याचे काँग्रेसच्या सूत्रांचे म्हणणे आहे.