Prashant Kishor New Plan । नवी दिल्ली : काँग्रेससोबतची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर निवडणुकीतील चाणक्य, रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आपल्या भविष्यातील राजकारणाची दिशा जाहीर केली आहे. त्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आज सकाळी ट्विट करून 'जन सूरज'च्या मार्गावर जाण्याची घोषणा केली आहे. 'जन सूरज'ची सुरुवात बिहारमधून होणार असल्याचे त्यांनी ट्विटच्या माध्यमातून लिहिले आहे. मात्र 'जन सूरज'चा मार्ग कसा असेल याचा खुलासा त्यांनी अद्याप केलेला नाही. (prashant kishor now on a new path, The new campaign will start from Bihar).
दरम्यान, प्रशांत किशोर यांच्या ट्विटवरून असे लक्षात येते की ते त्यांच्या होमपीचवरून म्हणजेच बिहार मधून सामान्य लोकांशी संपर्क साधून ते त्यांच्यासाठी अनुकूल धोरणे बनवण्यासाठी मदत करण्याच्या दिशेने पावले उचलतील. मात्र राजकीय पक्षाच्या माध्यमातून ते एक नवीन राजकीय अध्याय सुरू करणार असल्याचे दिसते आहे.
अधिक वाचा : भारतात दम्याच्या आजाराने मृत्यू होणाऱ्यांची संख्या सर्वाधिक
प्रशांत किशोर यांनी सोमवारी सकाळी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "लोकशाहीमध्ये अर्थपूर्ण सहभागी होण्यासाठी आणि लोक-अनुकूल धोरणाला आकार देण्याच्या माझ्या शोधाचा प्रवास गेल्या १० वर्षांमध्ये रोलरकोस्टरसारखा होता. मी जसजशी पाने पलटत आहे, त्यानुसार मला वाटते की आता सर्वसामान्यांमध्ये जाण्याची वेळ आली आहे, त्यांचे खरे मुद्दे समजून घ्यावे लागतील. तसेच यातून चांगल्या प्रशासनाचा रस्ता 'जन सूरज' निघेल."
याआधी प्रशांत किशोर आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये दीर्घकाळ चर्चा सुरू होती. ज्यात काँग्रेसला प्रशांत किशोर यांच्या माध्यमातून नवा चाणक्य मिळेल आणि पक्षाचे चांगले दिवस येतील अशी आशा होती. तसेच प्रशांत किशोर यांना काँग्रेसमध्ये आपली नवी राजकीय इनिंग सुरू करायची होती. पण अपेक्षेप्रमाणे फ्री हँड न मिळाल्याने आणि प्रशांत किशोर यांनी तेलंगणात केसीआरसोबत भागीदारी करून बनवलेले आयपॅक यामुळे संपूर्ण प्रकरण बिघडले. त्यामुळे काँग्रेस आणि प्रशांत किशोर यांची चर्चा निष्फळ ठरली. तेव्हापासून प्रशांत किशोर यांच्या नव्या वाटचालीची अटकळ होती. खर तर प्रशांत किशोर यांनी गेल्या वर्षी मे महिन्यातच घोषणा केली होती. की ते यापुढे iPAC साठी काम करणार नाहीत. तसेच पुढील एक वर्षात आम्ही भविष्यात काय करणार आहोत ते आम्ही उघड करू. असे त्यांनी मागील वर्षी म्हटले होते.