Pregnant Women Gangraped : माणुसकीला काळीमा, गरोदर महिलेवर सामुहिक बलात्कार, तीनही आरोपींना अटक

माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका गरोदर महिलेवर तीन नराधांनी सामूहिक बलात्कार केला आहे. नराधमांनी या महिलेचे अपहरण केले आणि तिच्यावर अत्याचार केला तसेच तिच्याकडील सर्व पैसेही लुटले. या प्रकरणी पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करून त्यांना तुरुंगात टाकले आहे.

gangraped
सामूहिक बलात्कार   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
  • एका गरोदर महिलेवर तीन नराधांनी सामूहिक बलात्कार केला आहे.
  • नराधमांनी या महिलेचे अपहरण केले आणि तिच्यावर अत्याचार केला तसेच तिच्याकडील सर्व पैसेही लुटले.

Pregnanat Women Gangraped : अमरावती : माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका गरोदर महिलेवर तीन नराधांनी सामूहिक बलात्कार केला आहे. नराधमांनी या महिलेचे अपहरण केले आणि तिच्यावर अत्याचार केला तसेच तिच्याकडील सर्व पैसेही लुटले. या प्रकरणी पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करून त्यांना तुरुंगात टाकले आहे. 

अधिक वाचा : Raj Thackeray: जे काय व्हायचे ते होऊन जाऊदे, राज ठाकरे यांचे औरंगाबादमध्ये प्रक्षोभक विधान

आंध्र प्रदेशमध्ये रेपल्ला रेल्वे स्थानकावर एक कुटुंबीय रात्री उतरले होते. रात्री घरी जाण्यासाठी कुठलेही वाहन उपलब्ध नसल्याने त्यांनी रेल्वे स्थानकावरच झोपण्याचा निर्णय घेतला. रात्री झोपण्यासाठी रेल्वे स्थानक सुरक्षित असेल असा त्यांचा विचार होता. तेव्हा एका बाकड्यावर महिला झोपली आणि तिचा पती खाली प्लॅटफॉर्मवर झोपला आणि त्यांची मुलेही वडिलांसोबत झोपून गेली. तेव्हा तीन जण मद्यधुंद अवस्थेत तिथे पोहोचले. त्यांनी आधी महिलेच्या पतीला मारहाण केली. तसेच या तीन जणांनी महिलेला जबरदस्तीने स्थानकाच्या बाहेर एका निर्जण ठिकाणी नेले आणि तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. 

अधिक वाचा : Corona Cases in Maharashtra : महाराष्ट्रात ९९५ कोरोना Active, आज १६९ रुग्ण


पीडित महिलेच्या पतीने मदत मागितली पण कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही. त्यानंतर पतीने जवळच्या पोलीस स्थानकांत धाव घेतली आणि झाला प्रकार सांगितला. पोलिसांनी लगेच पीडित महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा एका निर्जन ठिकाणी महिला पोलिसांना आढळली. महिलेने सांगितलेल्या वर्णनावरून पोलिसांनी तीनही आरोपींचा शोध घेतला. तीन आरोपींपैकी एक आरोपी अल्पवयीन असल्याचे समोर आले. 

अधिक वाचा : Raj Thackeray : ४ तारखेपासून भोंग्यांचा आवाज ऐकणार नाही, राज ठाकरेंचा पुन्हा अल्टिमेटम


रेल्वे स्थानकावरही महिला सुरक्षित नसल्याचे या घटनेवरून निदर्शनास आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी सर्वा आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.  

अधिक वाचा : Governor Bhagat Singh Koshyari : कोरोना काळातही महाराष्ट्राचा विकास थांबला नाही, राज्यपाल भगत सिंह कोश्यारींकडून ठाकरे सरकारवर स्तुतीसुमने

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी