CDS बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

तमिळनाडूच्या कुन्नूरमध्ये सैन्याचे एक हेलिकॉप्टर क्रॅश झाले. त्यात देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत  यांचा  मृत्यू झाला. रावत यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे.

bipin rawat
सच्चा देशभक्त गमावला 
थोडं पण कामाचं
  • मिळनाडूच्या कुन्नूरमध्ये सैन्याचे एक हेलिकॉप्टर क्रॅश झाले
  • चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत  यांचा  मृत्यू
  • संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे.

cds bipin rawat died in helicopter crash : नवी दिल्ली: आज तमिळनाडूच्या कुन्नूरमध्ये सैन्याचे एक हेलिकॉप्टर क्रॅश झाले. त्यात देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत  यांचा  मृत्यू झाला. रावत यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शहा यांनी रावत यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच भारतीय सैन्य, नौदल आणि हवाई दलानेही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

राष्ट्रपती कोविंद यांनी वाहिली श्रद्धांजली

बिपीन रावत यांच्या निधनाची बातमी कळाल्यानंतर आपल्याला धक्का बसला आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिली आहे. तसेच आज देशाने एक वीर सुपुत्र गमावल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

सच्चा देशभक्त गमावला

रावत यांच्या रुपाने भारताने एक सच्चा देशभक्त गमावला अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली आहे. तसेच रावत यांनी सैन्याचे आधुनिकी करण्यात सिंहाचा वाटा उचलल्याचेही मोदी म्हणाले.

देशाचे मोठी हानी

रावत यांच्या मृत्यूमुळे देशाचे मोठी हानी झाली आहे अशी प्रतिक्रिया संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे.

कर्तुत्व शब्दात व्यक्त करता येणार नाही

रावत यांचा मृत्यू ही अतिशय दुःखद घटना असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. त्यांचे कर्तुत्व शब्दात व्यक्त करता येणार नाही असेही शहा म्हणाले आहेत.

शूरवीरांच्या आत्म्याला शांती लाभो

संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी व सोबतच्या लष्करी अधिकाऱ्यांच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण देश विषण्ण झाला आहे अशी प्रतिक्रिया राज्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. तसेच या शूरवीरांच्या आत्म्याला शांती लाभो अशी प्रार्थनाही त्यांनी केली आहे.

सैन्याने वाहिली श्रद्धांजली

हवाई दलाने वाहिली श्रद्धांजली

नौदलाकडून श्रद्धांजली अर्पण

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी