स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं अभिभाषण, पाहा राष्ट्रपतींनी काय म्हटलं

लोकल ते ग्लोबल
Updated Aug 14, 2019 | 20:19 IST | टाइम्स नाऊ मराठी

राष्ट्रपती कोविंद यांनी स्वातंत्रदिनाच्या पूर्वसंध्येला संपूर्ण देशाला संबोधित केलं. या दरम्यान राष्ट्रपती कोविंद यांनी सरकारच्या कार्याचा उल्लेख केला, जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयावर म्हटलं

President Ramnath Kovind
राष्ट्रपती रामनाथ कोविंद   |  फोटो सौजन्य: YouTube

थोडं पण कामाचं

 • स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशाला संबोधल
 • राष्ट्रपतींनी भारतवासियांना दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा
 • देश जगा आणि जगू द्या या सिद्धांतावर चालत आहे: राष्ट्रपती
 • राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सरकारच्या कामांचाही केला उल्लेख

नवी दिल्ली: स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशाला संबोधित केलं. आपल्या अभिभाषणात राष्ट्रपतींनी भारतवासियांना ७३व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि म्हटलं, '७३व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला तुम्हा सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा. हा स्वातंत्र्य दिवस भारतमातेच्या सर्व मुलांसाठी एक आनंदाचा दिवस आहे मग ते देशात असो किंवा परदेशात राहणारे असोत. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द झाल्यानंतर आता विकास होण्यास मदत होईल आणि याचा फायदा नागरिकांना मोठ्या प्रमाणात होईल. तीन तलाक पद्धत रद्द झाल्याने मुलींना एक मोठा न्याय मिळाला आहे'.

राष्ट्रपतींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

 1. यंदाच्या वर्षी उन्हाळ्यात सर्व देशवासियांनी १७व्या लोकसभा निवडणुकीत सहभागी होत मतदान केलं. लोकशाहीच्या या प्रक्रियेसाठी सर्वच मतदार अभिनंदनास पात्र आहेत. आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे की, आपल्या गौरवशाली देशाला नव्या उंचीवर पोहोचवण्यासाठी नव्या जोशात सर्वांनी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करायला हवं.
 2. मला आनंद होत आहे की संसदेच्या नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांच कामकाज खूपच चांगलं पार पडलं.
 3. भारत सरकारने जम्मू-काश्मीर संदर्भात घेतलेल्या या निर्णयामुळे तेथील नागरिकांना सुद्धा आता देशातील इतर नागरिकांप्रमाणे आयुष्य जगता येईल तसेच त्यांनाही समान अधिकार आणि सुविधांचा लाभ घेता येईल.
 4. जम्मू-काश्मीर आणि लडाख संदर्भात भारत सरकारने नुकताच एक महत्वाचा बदल केला आहे. मला विश्वास आहे की या बदलाचा फायदा तेथे राहणाऱ्या नागरिकांना होणार आहे. 
 5. नागरिकांच्या आशा आणि अपेत्रा पूर्ण करत त्यांच्या सहायतेसाठी चंगल्या सुविधा सरकारतर्फे उपलब्ध करुन दिल्या जात आहेत
 6. यंदा गुरु नानक यांची ५५०वी जयंती आहे, गुरु नानक हे भारतामधील एक मोठे आणि महान संतांपैकी एक 
   
 7. भाषा, जात आणि क्षेत्राच्या सीमा ओलांडून एकमेकांचा सन्मान आपण करत आहोत 
 8. जगा आणि जगू द्या या सिद्धांतावर भारत पुढे चालत आहे 
 9. देशातील प्रत्येक व्यक्तीसा सन्मान केला पाहिजे आणि त्याच्यासोबत सन्मानाने वागलं पाहिजे जसं आपण आपल्यांसोबत वागतो
 10. समाजाच्या आणि राष्ट्राच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या पायाभूत सुविधांचा सुदुपयोग करणं आणि त्याचं संरक्षण करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे.
 11. प्रत्येक घरात शौचालय आणि पाणी उपलब्ध करुन देण्याचा पूर्ण लाभ तेव्हाच मिळेल जेव्हा या सुविधा आपल्या घरातील बहिण-मुलींना सशक्त करण्यास मदत करतील. 
 12. येत्या २ ऑक्टोर रोजी महात्मा गांधी यांची १५०वी जयंती आहे. महात्मा गांधी यांची ही १५०वी जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाईल 
 13. आपल्या देशातील युवकांची ऊर्जा खेळापासून विज्ञानापर्यंत आणि ज्ञानापासून संशोधनापर्यंत प्रत्येक क्षेत्रात आपली कार्यक्षमता सिद्ध करत आहे
 14. भारत तरुणांचाा, युवकांचा देश आहे
 15. भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सर्व भारतीय नागरिकांना शुभेच्छा 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं अभिभाषण, पाहा राष्ट्रपतींनी काय म्हटलं Description: राष्ट्रपती कोविंद यांनी स्वातंत्रदिनाच्या पूर्वसंध्येला संपूर्ण देशाला संबोधित केलं. या दरम्यान राष्ट्रपती कोविंद यांनी सरकारच्या कार्याचा उल्लेख केला, जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयावर म्हटलं
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
INX Media case: काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांना अटक
INX Media case: काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांना अटक
पाकिस्तानला मोठा झटका देण्यासाठी मोदी सरकारने केला 'हा' सर्वात मोठा प्लान
पाकिस्तानला मोठा झटका देण्यासाठी मोदी सरकारने केला 'हा' सर्वात मोठा प्लान
जीएसटीने केला घोळ; पार्ले कंपनी दहा हजार कामगारांना काढून टाकणार
जीएसटीने केला घोळ; पार्ले कंपनी दहा हजार कामगारांना काढून टाकणार
P Chidambaram INX Media case: चिदंबरम यांच्या अडचणींमध्ये वाढ; सर्वोच्च न्यायलयाकडूनही अद्याप दिलासा नाही
P Chidambaram INX Media case: चिदंबरम यांच्या अडचणींमध्ये वाढ; सर्वोच्च न्यायलयाकडूनही अद्याप दिलासा नाही
पंतप्रधान मोदींच्या न्यू यॉर्क भेटीत अडचण आणण्यासाठी हा प्लान करत आहे पाकिस्तान 
पंतप्रधान मोदींच्या न्यू यॉर्क भेटीत अडचण आणण्यासाठी हा प्लान करत आहे पाकिस्तान 
ज्या इमारतीचं उद्घाटन केलं तिथेच आरोपी म्हणून आले चिदंबरम! 
ज्या इमारतीचं उद्घाटन केलं तिथेच आरोपी म्हणून आले चिदंबरम! 
Donald Trump On Kashmir: काश्मीर प्रश्नावर डोनाल्ड ट्रम्प यांना चिंता; मध्यस्थीची तयारी
Donald Trump On Kashmir: काश्मीर प्रश्नावर डोनाल्ड ट्रम्प यांना चिंता; मध्यस्थीची तयारी
उत्तराखंड :  पूरग्रस्त भागात मदत सामुग्री घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरला अपघात, २ जण ठार 
उत्तराखंड :  पूरग्रस्त भागात मदत सामुग्री घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरला अपघात, २ जण ठार