दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १२ जून २०१९: तिहेरी तलाक विधेयक ते भारत सिनेमाची रेकॉर्डब्रेक कमाई

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 12, 2019 | 23:17 IST | टाइम्स नाऊ मराठी

Headlines of the day: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

top 5 news_latest news_times now marathi
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १२ जून २०१९  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबईः आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज दिवसभरातील सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे आज पहिलीच कॅबिनेट बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वांचे निर्णय घेण्यात आले. प्रकाश जावडेकरांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे. तसंच त्यानंतर अनंतनागमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात ५ जवानांना वीरमरण आलं आहे. तिसरी आजची महत्त्वाची बातमी राज्यातली आहे. पुण्यात नोटाबंदीच्या अडीच वर्षानंतर १ कोटींच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. त्यानंतरची महत्त्वाची बातमी पावसासंदर्भातली आहे. सध्या वायू चक्रीवादळाचा धोका असल्यानं मुंबईत अधिक पोलीस, एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आल्या आहेत. पाचवी महत्त्वाची बातमी झगमगाट विश्वातली आहे. सलमान खानच्या भारत सिनेमानं रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. आठवड्याभरात सिनेमानं बरेच रेकॉर्ड ब्रेक केले आहेत.  या सगळ्या बातम्या सविस्तर जाणून घ्या... 

जम्मू काश्मीरच्या राष्ट्रपती राजवटीत वाढः केंद्रीय मंत्रिमंडळानं बुधवारी जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवटीचा कालावधी सहा महिन्यांसाठी वाढवण्यासाठी मंजूर दिली आहे. केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. कॅबिनेट बैठकीतले महत्त्वाचे निर्णय जाणून घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

अनंतनागमध्ये CRPF च्या पथकावर  दहशतवादी हल्ला, ५ जवान शहीदः  जम्मू काश्मीरमधल्या अनंतनागमध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीर पोलिसांच्या गस्तीवर हा हल्ला केला आहे. ज्यात ५ जवान शहीद झाले आहेत. चकमक अजूनही सुरू आहे. बातमी सविस्तर वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा. 

नोटाबंदीच्या अडीच वर्षानंतर पुण्यातून १ कोटींच्या जुन्या नोटा जप्तः पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे १ कोटी २६ हजार रुपयांच्या जुन्या नोट्या जप्त करण्यात करण्यात आल्या आहेत. यावळी पोलिसांनी ३ जणांना अटकही केली आहे. सविस्तर बातमीसाठी क्लिक करा. 

'वायू' चक्रीवादळाचा धोका, मुंबईत वादळाचा परिणाम जाणवणारः ‘वायू’ चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं सरकत असलं तरी मुंबईत त्याचा परिणाम जाणवतोय. चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी मुंबई पोलीस दल आणि एनडीआरएफच्या टीम तैनात झाल्या आहेत. बातमी संपूर्ण वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा. 

सलमानचा 'भारत' सिनेमा लवकरच गाठणार 200 कोटींचा टप्पाः सलमान खानचा भारत सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. रोज नवनवीन रेकॉर्ड कायम करताना दिसतोय. सिनेमा आता 200 कोटींजवळ पोहोचलाय. बातमी सविस्तर वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १२ जून २०१९: तिहेरी तलाक विधेयक ते भारत सिनेमाची रेकॉर्डब्रेक कमाई Description: Headlines of the day: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles