Presidential Election 2022 : भारताचा पुढील राष्ट्रपती (President) कोण निवडला जाईल? या प्रश्नाचं उत्तर आज मिळणार आहे. 18 जुलै रोजी होणाऱ्या झालेल्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीची (Presidential Election) मतमोजणी (counting) आज होणार असून सायंकाळपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. त्यामुळे लवकरच भारताला नवे राष्ट्रपती मिळतील. आज निकाल जाहीर झाल्यानंतर 25 जुलै रोजी नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी (Oath ceremony) होईल.
18 जुलै रोजी झालेल्या राष्ट्रपती निवडणुकीची मतमोजणी आज होणार असून सायंकाळपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. संसद भवनातील खोली क्रमांक 63 मध्ये मतमोजणी होणार आहे. त्याच कक्षात मतदानही झाले होते. मतमोजणीसाठी सर्व राज्यांच्या विधानसभांच्या मतपेट्या दाखल झाल्या आहेत. 18 जुलैला भारताच्या 16 व्या राष्ट्रपती पदासाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत एकुण 4800 खासदार आणि आमदारांनी मतदानात सहभाग घेतला. द्रौपदी मुर्मू यांना 27 पक्षांचा पाठिंबा होता. तर यशवंत सिन्हा यांना 14 पक्षा पाठिंबा होता. मुर्मू विजयी झाल्या, तर देशातील सर्वोच्च घटनात्मक पदावर पहिल्यांदा आदिवासी महिला विराजमान होतील. सकाळी 11 वाजता संसद भवनाच्या रूम नंबर 63 मध्ये मतमोजणी सुरू होणार आहे. संध्याकाळी 4 ते 5 वाजताच्या दरम्यान निकाल येण्याची शक्यता आहे.
Read Also : ठाकरेंची पावसातील सभा शिवसेनेला तारणार का?
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सर्वप्रथम संसद भवनात झालेल्या मतांची मोजणी केली जाणार आहे. संसद भवनात एकूण 730 मतदान झाले. या मतमोजणीनंतर राज्यांमधील मतांची मोजणी सुरू होईल. त्यासाठी 10 राज्यांच्या मतपेट्या आलटून पालटून काढल्या जातील. उदाहरणार्थ, पहिल्या 10 राज्यांमध्ये आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, गुजरात, हरियाणा, छत्तीसगड आणि झारखंड या राज्यांचा समावेश असेल.
भाजपचे खासदार राजकुमार चहर म्हणाले की, आकडेवारी अनुकूल असल्याने एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जात आहे. विविध राज्यांतून द्रौपदी मुर्मूच्या बाजूने क्रॉस व्होटिंग झाल्याच्या बातम्या आल्याने विरोधी उमेदवार यशवंत सिन्हा यांची शक्यता आणखी कमी झाली आहे. मुर्मू यांच्या निवडणूक प्रचारावर लक्ष ठेवणाऱ्या भाजपच्या सूत्रांचा दावा आहे की, मुर्मू यांना किमान 65 टक्के मते मिळतील, त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे.
Read Also : पुष्पा गर्लने केली अक्षय कुमारवर जादू
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची कारकीर्द संपणार असून येत्या 21 तारखेला देशामध्ये नव्या राष्ट्रपतींची निवड होणार आहे. देशात आतापर्यंत आदिवासी समुदायातील कोणीही व्यक्ती राष्ट्रपती बनलेला नाही. महिला, दलित, मुस्लीम आणि दक्षिण भारतातील व्यक्ती राष्ट्रपतीपदी विराजमान झाले आहेत. पण आदिवासी समाज यापासून वंचित राहिला होता. त्यामुळे द्रौपदी मुर्मू यांचा विजय झाला तर त्या आदिवासी महिला राष्ट्रपती असणार आहेत.
Read Also : ब्रिटनमध्ये प्रथमच पारा ४० अंशांच्या वर
यावेळी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील मतदार यादीत एकूण 4809 मतदार आहेत. यामध्ये 776 खासदार आणि 4033 आमदार आहेत. खासदारांच्या एका मताचे मूल्य 700 असते तर आमदारांच्या एका मताचे मूल्य राज्यानुसार बदलते.