पंतप्रधान मोदींनी केलं कुशीनगर विमानतळाचं उद्धघाटन; २६० कोटींचा खर्च झालेल्या विमानतळाचं काय आहे वैशिष्ट्य जाणून घ्या

कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि विकास योजनांचे उद्घघाटन आणि पायाभरणीमुळे या जिल्ह्याला नवी ओळख मिळाली आहे. 

Prime Minister Modi inaugurates Kushinagar Airport
पंतप्रधान मोदींनी केलं कुशीनगर विमानतळाचं उद्धघाटन  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • कुशीनगर अंतरराष्ट्रीय विमानतळाची धावपट्टी (रनवे) ३.२ किमी लांब आणि ४५ मीटर रुंद आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी येथे वैद्यकीय महाविद्यालयाचीही पायाभरणी करणार आहेत.
  • कुशीनगर विमानतळावर पहिले विमान हे श्रीलंकेच्या कोलंबो येथून येणार

नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कुशीनगरच्या जिल्ह्याला आज विकास योजनांचे गिफ्ट मिळाले आहे. कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि विकास योजनांचे उद्घघाटन आणि पायाभरणीमुळे या जिल्ह्याला नवी ओळख मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी येथे एका वैद्यकीय महाविद्यालयाचे शिलान्यास केलं. याचबरोबर कुशीनगर विमानतळाचे उद्घाघाटनदेखील मोदींनी आज केलं. या विमानतळावरुन जापान, चीन, कंबोडिया, श्रीलंका, म्यानमार, या देशांसाठी उडाण केले जाईल. विमानतळ सुरू झाल्यानंतर कुशीनगर बौद्ध धर्माचे पालन करणाऱ्या देशांशी थेट जोडले जाणार आहे. कुशीनगर विमानतळावर पहिले विमान हे श्रीलंकेच्या कोलंबो येथून येणार असून या विमानातून १२५ प्रवाशांसह बौद्ध भिक्षु कुशीनगरमध्ये दाखल होणार आहेत. दरम्यान या विमानतळाचं काय वैशिष्ट्ये आहेत याची माहिती आपण जाणून घेऊ. 

कुशीनगर विमानतळ हे केंद्र आणि राज्य सरकारच्या सहयोगातून बनविण्यात आले असून याला एकूण खर्च २६० कोटी रुपये आला आहे. या विमानतळाचे टर्मिनल ३ हजार ६०० मीटरमध्ये पसरलेलेले आहे. नवीन टर्मिनल रहदारीच्या वेळी ३०० प्रवाशांना येण्या- जाण्याची सुविधा असणार आहे.  कुशीनगर हे एक अंतरराष्ट्रीय बौद्ध तीर्थ केंद्र आहे. येथे भगवान गौतम बौद्धांनी महापरिनिर्वाण प्राप्त केलं होतं. कुशीनगर अंतरराष्ट्रीय विमानतळाची धावपट्टी (रनवे) ३.२ किमी लांब आणि ४५ मीटर रुंद आहे.

ही धावपट्टी उत्तर प्रदेशातील इतर विमानतळात असलेल्या रनवेपेक्षा मोठी आहे. या विमानतळाच्या रनवे वर प्रत्येक तासाला ८ विमाने ये-जा करू शकतील. दिवसाबरोबर रात्रीही विमाने उतरण्यास सोपं व्हावे, यासाठी नवीन सुविधा येथे केली जात आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण (एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया) आणि उत्तर प्रदेश सरकारमध्ये ५ मार्च २०१९ मध्ये या विमानतळाविषयीचा करार झाला होता. तर २४ जून २०२०ला या विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ घोषित करण्यात आले. 

या विमानतळावरुन श्रीलंका, चीन, जापान, तैवान दक्षिण कोरिया, थायलँड, सिंगापूर, आणि व्हिएतनाम सारख्या दक्षिण अशियाच्या देशांसाठी थेट विमाने उडाणे भरतील. कुशीनगर विमानतळावर येणारे प्रवाशी लुम्बिनी बोधगया, सारनाथ आमि कुशीनगरचा प्रवास करू शकतील. यासह श्रावस्ती, कौशांबी, संकीशा, राजगीर आणि वैशालीपर्यंत प्रवासाचे अंतर कमी होणार आहे.

वैद्यकीय महाविद्यालयाची पायाभरणी करणार पीएम मोदी 

कुशीनगर अंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाघाटन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी येथे वैद्यकीय महाविद्यालयाचा शिलान्यासही करणार आहेत. हे महाविद्यालय २८० रुपयांच्या खर्चातून उभारण्यात असून या वैद्यकीय महाविद्यालयात ५०० बेडची सोय असणार आहे. यात २०२२-२३ पासून एमबीबीएसच्या शंभर विद्यार्थ्यांना प्रवेश देखील दिला जाणार आहे.   

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी