PM Modi celebrate Diwali with the soldiers : जम्मू-काश्मीरच्या जवानांसोबत पंतप्रधान मोदी साजरी करणार दिवाळी

PM Modi celebrate Diwali with the soldiers पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi ) यावर्षीच देशाच्या सीमेवर तैनात असणाऱ्या जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत

PM Modi celebrate Diwali with the soldiers
जम्मू-काश्मीरच्या जवानांसोबत पंतप्रधान मोदी साजरी करणार दिवाळी  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • सुरक्षेच्या कारणास्तव पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचे ठिकाण बदलण्यात येऊ शकते.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षी सीमेवरील तैनात जवानांसोबत दिवाळी साजरी करत असतात.
  • राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये जवानांसोबत पंतप्रधान मोदी दिवाळी साजरी करू शकतात.

PM Modi celebrate Diwali with the soldiers: नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi ) यावर्षीच देशाच्या सीमेवर तैनात असणाऱ्या जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू-काश्मीरच्या राजौरी (Rajouri) जिल्ह्यातील नौशेरा (Naushera) सेक्टरमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी जाऊ शकतात. मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काश्मीर खोऱ्यातील अनेक भागांत सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

दरम्यान पंतप्रधान मोदींचा जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याचं ठिकाण शेवटच्या वेळी बदलण्यात येऊ शकते. दरम्यान पंतप्रधान मोदी जेव्हा जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याच्या त्यांच्या दौऱ्याविषयी सुरक्षेच्या कारणास्तव नेहमी गुप्ताता ठेवली जाते. पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमधील जवानांसोबत दिवाळी साजरी करत आहेत, असे नाही. यापूर्वी 2019 मध्ये आर्टिकल 370 हटवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जम्मू-काश्मीरमध्ये दिवाळी साजरी केली होती. यावेळी पंतप्रधान मोदींनी राजौरी जिल्ह्यात तैनात जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. 

दरम्यान जवानांसोबत दिवाळी सण साजरा करण्यासाठी पंतप्रधान मोदी काही सीमेवरील भागांची निवड करत असतात. पंतप्रधान मोदी दरवर्षी सीमेवर तैनात असणाऱ्या जवानांसोबत दिवाळीचा सण साजरा करतात. यावेळी पंतप्रधान जवानांसोबत वेळ घालवतात. तसेच त्यांचं मनोधैर्य उंचावण्याचं काम करतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी