India Nepal railway service: भारत आणि नेपाळ दरम्यान पहिल्यांदाच सुरू होणार ट्रेन, पंतप्रधान मोदी करणार उद्घाटन

India Nepal railway service । भारत आणि नेपाळ दरम्यान शनिवार पासून रेल्वेसेवा सुरू होणार आहे. ही ट्रेन बिहारमधील जयनगर ते नेपाळमधील कुर्था पर्यंतच्या ब्रॉडगेज मार्गावर धावणार आहे. कुर्था स्टेशन नेपाळच्या धनुषा जिल्ह्यात आहे जे झनकपूर झोनमध्ये येते.

Prime Minister Modi will inaugurate the first train between India and Nepal
भारत आणि नेपाळ दरम्यान पहिल्यांदाच सुरू होणार ट्रेन  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भारत आणि नेपाळ दरम्यान शनिवार पासून रेल्वेसेवा सुरू होणार आहे.
  • ही ट्रेन बिहारमधील जयनगर ते नेपाळमधील कुर्था पर्यंतच्या ब्रॉडगेज मार्गावर धावेल.
  • हा रेल्वे प्रवास सुमारे ३३ किलोमीटरचा असेल.

India Nepal railway service । नवी दिल्ली : भारत आणि नेपाळ दरम्यान शनिवार पासून रेल्वेसेवा (India Nepal Railway Service) सुरू होणार आहे. ही ट्रेन बिहारमधील जयनगर ते नेपाळमधील कुर्था (Jaynagar-Kurtha Railway) पर्यंतच्या ब्रॉडगेज मार्गावर धावणार आहे. कुर्था स्टेशन नेपाळच्या धनुषा जिल्ह्यात आहे जे जनकपूर झोनमध्ये येते. (Prime Minister Modi will inaugurate the first train between India and Nepal). 

अधिक वाचा : 'लॉक अप' हिट झाल्यानंतर कंगनाने साधला करण जोहरवर निशाणा

शनिवारी होणार रेल्वे सेवेचे उद्घाटन 

आता सीतेच्या जन्मस्थानापर्यंत रेल्वेसेवा सुरू होणार आहे. यापूर्वीं देखील ब्रिटीश काळात मीटरगेज रेड लाइन सुरू असायची, जी २००० मध्ये ती सेवा बंद करण्यात आली. तेव्हापासून भारत आणि नेपाळमध्ये रेल्वे संपर्क नव्हता. लक्षणीय बाब म्हणजे या रेल्वेच्या उद्घाटनासाठी नेपाळचे पंतप्रधान भारतात आले असून माहितीनुसार, शनिवारी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी भारत आणि नेपाळचे पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संयुक्तपणे या रेल्वे मार्गाचे उद्घाटन करणार आहेत. 

India Nepal Railway Service

कोकण रेल्वेकडे असणार देखभालीचे काम

यासाठी भारताने नेपाळला दोन DMU ट्रेन भेट दिल्या आहेत. याशिवाय या रेल्वेचा मार्ग आणि रेल्वेच्या देखभाल दुरूस्तीचे काम कोकण रेल्वेकडे (Konkan Railway) देण्यात आले आहे. 

पासपोर्टचीही गरज भासणार नाही

दरम्यान, दोन्ही देशांच्या सीमेपलीकडील प्रवाशांना थेट रेल्वेने प्रवास करता येणार आहे. हा रेल्वे प्रवास सुमारे ३३ किलोमीटरचा असेल. त्यासाठी बिहारमधील जयनगर येथे नवीन स्टेशनही तयार करण्यात आले आहे. लक्षणीय बाब म्हणजे या ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी प्रवाशांना व्हिसा किंवा पासपोर्टची गरज भासणार नाही.  

अधिक वाचा : तुझसे नाराज नहीं हू मै.... म्हणतायत उद्धव ठाकरे

६६ किमीचा रेल्वे मार्ग नेपाळच्या हद्दीत असेल

ही रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांकडून मोठी तयारी करण्यात आली आहे. या रेल्वे मार्गावर प्रवासी गाड्या आणि मालगाड्या दोन्ही धावतील. त्याचबरोबर हा रेल्वे मार्ग नेपाळमधील बर्दिबासपर्यंत नेण्यासाठी नवीन ट्ऱॅक टाकण्याचे देखील काम चालू आहे. यामध्ये ३ किमीची रेल्वे लाईन बिहारमध्ये आहे तर सुमारे ६६ किमीची रेल्वे लाईन नेपाळच्या हद्दीत असेल. या मार्गाच्या विस्ताराचे कामही लवकरच पूर्ण होईल अशी आशा वर्तवली जात आहे. 

भारत आणि नेपाळमधील संबंध मजबूत होणार

भारत आणि नेपाळमधील या रेल्वे सेवेमुळे भारत आणि नेपाळ मधील संबंध अधिक मजबूत होणार आहेत. तर नेपाळमधील चीनचा हस्तक्षेप देखील कमी होईल. महत्त्वाचे म्हणजे नेपाळमध्ये चिनी रेल्वेचा प्रवेश आणि विस्तार करण्याचा चीन सातत्याने प्रयत्न करत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी