कोरोना स्थितीवर पंतप्रधान मोदींची बैठक; लसीकरण, व्हेंटिलेटर्स, रेमडिसिविर दिल्या 'या' सूचना

वेगाने पसरणाऱ्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांबरोबर एक आढावा बैठक घेतली. या बैठकीत ऑक्सिजन,व्हेंटिलेटर्स आणि लसीकरणाविषयीच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.

Prime Minister Modi's high level meeting on corona condition
कोरोना स्थितीवर पंतप्रधान मोदींची बैठक  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • कोरोनामुळे होणारे मृत्यूचे दर कमी करण्यासाठी लवकर चाचणी महत्त्वपूर्ण
  • रेमडेसिविरसह इतर औषधांचा काळ्या बाजाराला आळा घाला - मोदी
  • वैद्यकीय ऑक्सिजन प्लांटची स्थापना त्वरित करा

नवी दिल्ली :  वेगाने पसरणाऱ्या कोरोना (Corona Virus) संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi ) यांनी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांबरोबर एक आढावा बैठक घेतली. या बैठकीत ऑक्सिजन (Oxygen),व्हेंटिलेटर्स (Ventilators)आणि लसीकरणाविषयीच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. दरम्यान पंतप्रधानांनी खासगी आणि सरकारी औषधनिर्मिती क्षेत्रांना पूर्ण क्षमतेने लस उत्पादन करण्याचे आवाहन केले.

चाचणी करणं आवश्यक 

पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताने मागील वर्षी आपण सर्व एकत्रित येत कोरोनाला पराभूत केले होते. आताही आपण परत त्याच नियमांनी, गतीने आणि समन्वयासह करू शकतो. यासह चाचणी, ट्रॅकिंग आणि उपचारांवर मोदींनी भर दिला. चाचणी, ट्रॅकिंग आणि उपचार करावेच लागतील. कोरोनामुळे होणारे मृत्यूचे दर कमी करण्यासाठी लवकर चाचणी महत्त्वपूर्ण असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. यासोबत ते म्हणाले की, स्थानिक प्रशासनाने लोकांच्या समस्यांसाठी सक्रिय आणि संवेदनशील असणे आवश्यक आहे.
महामारीच्या रोगाचा सामना करण्यासाठी राज्यांशी जवळून समन्वय साधला जावा, असे पंतप्रधानांनी निर्देश दिले. ते म्हणाले की कोविड रूग्णांसाठी रुग्णालयाच्या बेडची उपलब्धता वाढवण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना केल्या पाहिजेत. तात्पुरती रूग्णालये आणि क्वांरटीन केंद्राद्वारे बेडचा अतिरिक्त पुरवठा करावा, अशा सूचना पंतप्रधानांनी  दिल्या.

औषधांचा काळ्याबाजाराला आळा घाला

विविध औषधांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी देशाच्या औषधनिर्मिती क्षेत्राची संपूर्ण क्षमता वापरण्याची गरज असल्याचे पंतप्रधान या बैठकीत म्हणाले. रेमडेसिविरसह इतर औषधांच्या वापरासाठी वैद्यकीय मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जायला हवे आणि त्यांचा काळाबाजार रोखण्यात यावा, अशी सूचना त्यांनी केली. दरम्यान रेमडेसिविरच्या उपलब्धतेविषयी अधिकाऱ्यांनी पंतप्रधान मोदींना सर्व माहिती दिली.  सरकारच्या प्रयत्नामुळे रेमडेसिविरच्या निर्मिती क्षमता आणि उत्पादनाची वाढ मे महिन्यात साधरण ७४.१० लाख बाटली महिना देण्याची तयारी करण्यात आली. जर जानेवारी- फेब्रुवारीमध्ये सामान्य उत्पादन प्रति महिन्याला फक्त २७-२९ लाख बाटली होतं. दरम्यान ११ एप्रिलला ६७, हजार ९०० बाटल्यांनी वाढवून १५ एप्रिल २०२१ ला २ लाख ६ हजारापेक्षा जास्त बाटल्यांचा पुरवठा केला जात आहे. ज्या राज्यांमध्ये अधिक कोरोना प्रकरणे आहेत , याची अधिक मागणी त्या राज्यांकडे पुरवठा अधिक केला जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पंतप्रधानांनी रेमडेसिविरच्या उत्पादन वाढी लक्ष देत, निर्देश दिले की, राज्यांशी रिअल-टाइम सप्लाय चेन मॅनेजमेंटशी संबंधित मुद्द्यांचा राज्यांशी समन्वय साधून त्वरित तोडगा काढावा. रेमाडेसिविर व इतर औषधांचा वापर मान्यताप्राप्त वैद्यकीय मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने झाला पाहिजे आणि त्यांचा गैरवापर व काळ्या बाजाराला कठोरपणे आळा बसवावा.

काय आहे ऑक्सिजन स्थिती 

वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठा करण्याच्या मुद्यावर पंतप्रधानांनी मंजूर वैद्यकीय ऑक्सिजन प्लांटची स्थापना त्वरित करावी, अशी सूचना केली. यावर अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, १६२ पीएसए ऑक्सिजन संयंत्र ३२ राज्यांमध्ये आणि केंद्र शासित राज्यांमध्ये पीएम केअर्स स्थापण्यात आले आहे. यातून १ लाख सिलिंडरांची खरेदी केली जात आहे. त्याचा पुरवठा लवकरच राज्यांना केली जाणार आहे. मेडिकल ऑक्सिजनची सध्या आणि भविष्याच्या मागणीविषयी मुल्यमापन करण्यासाठी आम्ही अधिक मागणी असलेल्या राज्यांच्या संपर्कात असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. यासह ३० एप्रिलपर्यंत अधिक मागणी असलेल्या १२ राज्यांमध्ये पुरवठा मॅपिगची योजना देखील सुरू करण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, या महामारीपासून वाचण्यासाठी औषधे आणि उपकरणे उत्पादनासाठी आवश्यक ऑक्सिजनची पुर्तंता केली पाहिजे. पंतप्रधानांनी व्हेंटिलेटरची उपलब्धता आणि पुरवठा स्थितीचा आढावा घेतला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, वास्तवीक वेळेच्या निगरानीसाठी यंत्रणा तयार केली गेली आहे, आणि संबंधित राज्य सरकारांनी या यंत्रणेचा सतत वापर करण्यासाठी संवेदनशीलता घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. लसीकरणाच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान मोदींनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, लसीचे उत्पादनात वाढ करण्यासाठी सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रासोबत  पुर्ण राष्ट्रीय संभाव्यतेचा उपयोग करावा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी