Most Influential Personality on Twitter: Twitter वर पीएम मोदींपेक्षा अमेरिकन गायिका ठरली अव्वल, प्रभावशाली व्यक्तींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जगात नंबर दुसरा

Most Influential Personality on Twitter: कंझ्युमर इंटेलिजन्स कंपनी (Consumer Intelligence Company) ब्रँडवॉचच्या (Brandwatch) वार्षिक सर्वेक्षणानुसार (Annual survey), जगातील 50 प्रभावशाली व्यक्तींचे नावे जाहीर केली आहेत.

Prime Minister Narendra Modi is the second most influential
जगातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये पीएम मोदी दुसऱ्यास्थानी   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • लिओनार्डो डी कॅप्रिओ आणि युनायटेड स्टेट्सच्या माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांना सचिन तेंडुलकरने मागे टाकले आहे.
  • अमेरिकन गायिका पहिल्या क्रमांकाची प्रभावशाली व्यक्ती ठरली आहे.

Most Influential Personality on Twitter:नवी दिल्ली : कंझ्युमर इंटेलिजन्स कंपनी (Consumer Intelligence Company) ब्रँडवॉचच्या (Brandwatch) वार्षिक सर्वेक्षणानुसार (Annual survey), जगातील 50 प्रभावशाली व्यक्तींचे नावे जाहीर केली आहेत. यावर्षी ट्विटरवरील 50 सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या (influential Person) यादीत अमेरिकन गायिका टेलर स्विफ्ट (Taylor Swift) हिने पहिल्या क्रमांक पटकावला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरही (Sachin Tendukar) या यादीत ३५ व्या स्थानावर आहे.

एंट्रीमध्येच सचिनने अमेरिकन अभिनेते ड्वेन जॉन्सन (Dwayne Johnson), लिओनार्डो डी कॅप्रिओ (Leonardo Di Caprio) आणि युनायटेड स्टेट्सच्या माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा (Michelle Obama) यांच्यासारख्या प्रसिद्ध लोकांना मागे टाकले आहे. भारतीयांसाठी आणि जगभरातील सचिनच्या चाहत्यांसाठी ही खुप आनंदाची बातमी आहे. 

संशोधनात तेंडुलकरला या स्थानी आणण्यासाठी त्याचे 'वंचितांसाठी प्रशंसनीय कार्य, त्यांच्यासाठी आवाज उठवणे आणि योग्य मोहिमांसाठी मार्ग दाखवणे, तसेच त्याचे प्रेरित चाहते आणि त्याच्या भागीदार ब्रँड्सच्या संबंधित प्रभावशाली मोहिमांमुळे सचिन तेंडुलकर या यादीत ३५ व्या स्थानावर असल्याचे संशोधनात म्हटले आहे.

भारताचा माजी कर्णधार तेंडुलकर एका दशकाहून अधिक काळ युनिसेफशी जोडला गेला आहे आणि 2013 मध्ये त्यांना दक्षिण आशियाचे दूत म्हणून नियुक्त करण्यात आले. तेंडुलकरने ग्रामीण आणि शहरी भारतातील आरोग्य, शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक उपक्रमांना पाठिंबा दिला आहे. याच कारणामुळे ट्विटरवरील व्यक्तींच्या यादीत सचिन तेंडुलकरने स्थान पटकावलं आहे. ब्रँडवॉच कंपनीद्वारे केलेल्या संशोधनानुसार ही यादी जाहीर करण्यात आली आहे.


ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी