कलम ३७० हटवल्यानंतर मोदी- ट्रम्प यांच्यात पहिल्यांदाच अर्धा तास फोनवर चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि णि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवरून चर्चा झाली आहे. यावेळी दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय आणि प्रादेशिक मुद्द्यावर चर्चा झाल्याचं समजतंय. 

modi and trump
कलम ३७० हटवल्यानंतर मोदी- ट्रम्प यांच्यात पहिल्यांदाच अर्धा तास फोनवर चर्चा 

थोडं पण कामाचं

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवर अर्धा तास संवाद साधला
  • दोघांमध्ये दोन्ही देशातील संबंधावर चर्चा
  • दोघांनी द्विपक्षीय आणि प्रादेशिक मुद्द्यावर बातचीत केली
  • जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर मोदींनी ट्रम्प यांच्यासोबत साधलेला हा पहिला उच्चस्तरीय संवाद

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवर अर्धा तास संवाद साधला आहे. दोघांमध्ये दोन्ही देशातील संबंधावर चर्चा झाल्याचं समजतंय. त्यांनी द्विपक्षीय आणि प्रादेशिक मुद्द्यावर बातचीत केली आहे. प्रादेशिक स्थितीच्या संदर्भात पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांसोबत बोलताना म्हटले की, पाकिस्तानमधील नेते भारताविरूद्ध करत असलेले चिथावणीखोर विधानं आशियाच्या शांततेसाठी अनुकूल नाहीत. जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर मोदींनी ट्रम्प यांच्यासोबत साधलेला हा पहिला उच्चस्तरीय संवाद आहे. 

पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा दहशतवाद आणि हिंसाचार मुक्त वातावरण बनवण्यासाठी आणि सीमेवरील दहशतवादी हल्ला थांबवणं महत्त्वाचं असल्याचं मोदींनी पुन्हा अधोरेखित केलं. पंतप्रधान मोदींनी गरीबी, निरक्षरता आणि रोगराईविरूद्ध लढा देण्यासाठी हा मार्ग पत्करणाऱ्या कोणाशीही भारत सहकार्य करण्यास बांधील आहे, असा पुनरूच्चारही केला.

अफगाणिस्तानला स्वातंत्र्य मिळून १०० वर्ष पूर्ण झाल्याचा उल्लेख करत पंतप्रधानांनी ट्रम्प यांच्याशी बोलताना, एकात्मिक, सुरक्षित आणि लोकशाही अफगाणिस्तानसाठी काम करण्याच्या भारताच्या दीर्घकालीन दृढ प्रतिबद्धतेचा पुनरुच्चार केला.जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदा पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांच्याशी संवाद साधत होते. 

ओसाका येथील आपल्या द्विपक्षीय (भारत-अमेरिका) चर्चेचा संदर्भ देताना पंतप्रधान मोदींनी अशी आशा व्यक्त केली की परराष्ट्र फायद्यासाठी द्विपक्षीय व्यापार संभाव्यतेबद्दल चर्चा करण्यासाठी भारताचे वाणिज्यमंत्री आणि अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी लवकरच एकमेकांची भेट घेतील.

या संवादावर व्हाईट हाऊसने एका निवेदनात म्हटलं आहे की, दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक विकासाबद्दल आणि अमेरिका-भारत योजनाबद्ध भागीदारीविषयी बोलले. निवेदनात म्हटलं  की, भारत-पाकिस्तानमधील तणाव कमी करण्याचे आणि या प्रदेशात शांतता राखण्याचे महत्त्व राष्ट्राध्यक्षांनी सांगितलं.

डोनाल्ड ट्रम्प यांनी केली इमरान खान यांच्याशी बातचीत 

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी सोमवारी म्हटलं की, डोनाल्ड ट्रम्प यांनी आज पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्याशी बातचीत केली. ट्रम्प आणि अमेरिका सध्या सुरू असलेल्या काश्मीरच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी आपली भूमिका बजावतील अशी आमची अपेक्षा आहे.

इमरान खान यांनी ट्रम्प यांच्याशी फोनवरून केलेल्या संवादाचा तपशील शेअर करताना शाह मेहमूद कुरेशी म्हणाले की, इमरान यांनी ट्रम्प यांचे या प्रकरणात रस घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानले. ट्रम्प यांनी आपली भूमिका बजावावी अशी आमची अपेक्षा आहे. मला इमरान खानचा अभिमान आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी पाकिस्तानच्या वेळेनुसार रात्री १० वाजता संवाद साधला. गेल्या चार दिवसांत इमरान खान आणि ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा फोनवरून संवाद साधला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
कलम ३७० हटवल्यानंतर मोदी- ट्रम्प यांच्यात पहिल्यांदाच अर्धा तास फोनवर चर्चा Description: पंतप्रधान नरेंद्र मोदी आपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि णि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवरून चर्चा झाली आहे. यावेळी दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय आणि प्रादेशिक मुद्द्यावर चर्चा झाल्याचं समजतंय. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
मोठी बातमी: 'या' सहा आमदारांनी धरला काँग्रेसचा हात
मोठी बातमी: 'या' सहा आमदारांनी धरला काँग्रेसचा हात
[VIDEO]: धक्कादायक! प्रेम संबंधांमुळे तरुणाला बेदम मारहाण करत जबरदस्ती पाजली लघुशंका
[VIDEO]: धक्कादायक! प्रेम संबंधांमुळे तरुणाला बेदम मारहाण करत जबरदस्ती पाजली लघुशंका
चांद्रयान २: आज अतिशय मोठी अपडेट मिळणार, लँडर विक्रमशी संपर्क होणार? 
चांद्रयान २: आज अतिशय मोठी अपडेट मिळणार, लँडर विक्रमशी संपर्क होणार? 
PM Narendra Modi birthday: नरेंद्र मोदींनी घेतले आईचे आशीर्वाद
PM Narendra Modi birthday: नरेंद्र मोदींनी घेतले आईचे आशीर्वाद
[VIDEO]: आमदाराच्या कारची पादचाऱ्याला धडक, घटनास्थळीच मृत्यू
[VIDEO]: आमदाराच्या कारची पादचाऱ्याला धडक, घटनास्थळीच मृत्यू
[VIDEO]: Honour Killing: नवदाम्पत्याला गाडीखाली चिरडले आणि नंतर गोळ्या झाडून हत्या
[VIDEO]: Honour Killing: नवदाम्पत्याला गाडीखाली चिरडले आणि नंतर गोळ्या झाडून हत्या
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १६ सप्टेंबर २०१९:  जैश-ए-मोहम्मदची धमकी ते सरकारी नोकरीची संधी
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १६ सप्टेंबर २०१९: जैश-ए-मोहम्मदची धमकी ते सरकारी नोकरीची संधी
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १७ सप्टेंबर २०१९: चांद्रयानबाबत मोठी अपडेट ते मराठी तरुणांना सरकारी नोकरीची संधी
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १७ सप्टेंबर २०१९: चांद्रयानबाबत मोठी अपडेट ते मराठी तरुणांना सरकारी नोकरीची संधी