Heeraben Modi Passed Away : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मातृशोक, हिराबेन मोदी यांचं 100 व्या वर्षी निधन

Heeraben Modi Passed Away : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आई हिराबेन मोदी (Heeraben Modi)यांचे निधन झाले आहे. वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Heeraben Modi Passes Away
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं निधन   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • हिराबेन मोदी यांना श्वास घेण्याचा त्रास होत असल्यानं त्यांना अहमदाबादमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
  • हिराबेन मोदी यांनी 18 जून रोजी वयाची 100 वर्षे पूर्ण केली होती.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 डिसेंबर रोजी गांधीनगरमध्ये आई हिराबेन यांची भेट घेतली होती.

Hiraben Modi Passed Away : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आई हिराबेन मोदी (Heeraben Modi)यांचे निधन झाले आहे. 1923 मध्ये जन्मलेल्या हिराबेन मोदी यांनी 18 जून रोजी वयाची 100 वर्षे पूर्ण केली होती.  गेल्या काही दिवसांपासून हिराबेन यांच्यावर यूएन मेहता रुग्णालयात (UN Mehta Hospital)उपचार (Treatment)सुरू होते. आज पहाटे साडेतीन वाजता उपचारादरम्यान हिराबेन मोदी यांचे निधन झाले. मातोश्रीच्या निधनाची बातमी येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादच्या दिशेनं रवाना झाले.  (Prime Minister Narendra Modi's mother Hiraben Modi passed away)

अधिक वाचा  : डहाणूमधील आदिवासींच्या सर्वसमावेषकतेच्या दिशेने पाऊल
दरम्यान एका दिवसापूर्वी हिराबेन मोदी यांना श्वास घेण्याचा त्रास होत असल्यानं त्यांना अहमदाबादमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  रुग्णालयात दाखल केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमध्ये जाऊन  आईची विचारपूस केली होती. परंतु आज उपचार सुरू असताना हिराबेन मोदी यांचे निधन झाले.

अधिक वाचा  : मुख्यमंत्री शिंदेकडून नव्या वर्षात शेतकऱ्यांना नवे गिफ्ट

आईच्या निधनाची माहिती स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून दिली. एक भावनिक ट्विट करत त्यांनी ही दु:खाची  बातमी दिली . 'शानदार शताब्दी का ईश्वर चरणों में विराम...' असं लिहित आईच्या रुपात आपल्याला दिसलेल्या तपस्वी आणि मूल्यांप्रती जीवन समर्पित करणाऱ्या एका कर्मयोगिणीला त्यांनी श्रद्धासुमनं वाहिली.   

पंतप्रधान मोदींना मातृशोक झाल्याने मोदी ट्विटवर भावूक झालेले पाहण्यास मिळाले. आई हिराबेन यांच्या आठवणींमध्ये ते रमले आणि भावनांच्या भरात एक आठवण देशवासियांपुढेही आणली. पंतप्रधान म्हणाले, 'आईच्या 100 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने जेव्हा मी त्यांना भेटलो तेव्हा त्या एकच गोष्ट म्हणाल्या होत्या, जी माझ्या कायम लक्षात राहील. ती गोष्ट म्हणजे बुद्धीने काम करा आणि शुद्धीने आयुष्य जगा'. थोडक्यात आयुष्यात कायमच बुद्धिचातुर्याचा वापर करा. पण, जीवनातील पावित्र्य गमावू नका, असा संदेश हिराबेन यांनी लेकाला दिला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 डिसेंबर रोजी गांधीनगरमध्ये आई हिराबेन यांची भेट घेतली होती. पंतप्रधान मोदींनी आईसोबत बराच वेळ गप्पाही मारल्या होत्या. त्यानंतर त्यांनी आईच्या पायाल स्पर्श करत आशीर्वाद घेतले होते. त्यावेळी मोदी आणि त्यांच्या आईसोबतच्या भेटीचे फोटो समोर आले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी