Political Leaders Wishes : पंतप्रधान मोदीसह अनेक राजकीय नेत्यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा; भेदभाव मिटवा तर कोणी दिला प्रदूषण मुक्त दिवाळीचा संदेश

Political Leaders  Wishes to People on Diwali :देशभरात आज दिवाळीचा (Diwali) सण (Festival) साजरा केला जात आहे. राजकीय नेत्यांनी (Political Leaders) देशातील नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Prime Minister To Ajit pawar Wishes Happy Diwali to People
पंतप्रधान मोदीसह अनेक राजकीय नेत्यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा;   |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा
  • प्रकाशाने लोकांच्या जीवनात नवी ऊर्जा यावी- अमित शाह
  • हा सण कोणताही भेदभाव न करता प्रकाश देतो - राहुल गांधी

Political Leaders  Wishes to People on Diwali : नवी दिल्ली :   देशभरात आज दिवाळीचा (Diwali) सण (Festival) साजरा केला जात आहे. लोक घरात दिवे लावून हा दिवाळीचा सण साजरा करत प्रत्येक जण आपल्या प्रिय लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत. राजकीय नेत्यांनीही (Political Leaders) देशातील नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान (Prime Minister) नरेंद्र मोदी (Narendra Modi) ते महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्व प्रमुख नेत्यांनी देशातील नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुभेच्छा ट्विटमध्ये म्हटले कि, देशातील नागरिकांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा देत तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान आणि संपन्नता येवो, अशी मी प्रार्थना करत असल्याचं म्हटलं आहे.

दिवाळीच्या पवित्र दिनानिमित्त मी देशातील नागरिकांना शुभेच्छा देतो. माझी इच्छा आहे की हे वर्ष तुमच्या सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख, संपन्नता आणि सौभाग्य घेऊन येवो, असं मोदी ट्विटमध्ये म्हणाले आहेत. तसेच पुढे सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा असेही ट्विटरवरील संदेशामध्ये लिहिले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह - प्रकाश जीवनात नवीन ऊर्जा आणेल

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यावेळी देशवासियांना शुभेच्छा देताना सांगितले की, प्रकाशाने लोकांच्या जीवनात नवी ऊर्जा यावी. शाहांनी ट्विटक करताना लिहिले की,  “सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. प्रकाश आणि आनंदाचे हे महापर्व सर्वांच्या आयुष्यात उर्जा, प्रकाश, आरोग्य आणि समृद्धीने उजळून निघू दे,”  

राहुल गांधी म्हणाले -  हा सण कोणताही भेदभाव न करता प्रकाश देतो

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि केरळमधील वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनीही दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  राहुलने ट्विट करून म्हटले – दिव्याचा प्रकाश प्रत्येकाला कोणताही भेदभाव न करता प्रकाश देतो – हाच दीपावलीचा संदेश आहे. दिवाळी तुमच्या प्रियजनांमध्ये व्हावी, प्रत्येकाची मने जोडणारी असावी. 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येणारी दिवाळी करोनामुक्तीची ठरेल असा विश्वास व्यक्त करत सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. येणारी दिवाळी सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो असं गडकरींनी म्हटलं आहे.


राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही ट्विटरवरुन सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात. “राज्यातील जनतेला ‘दिवाळी’च्या मनःपूर्वक शुभेच्छा! यंदाची दिवाळी सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, समाधान, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो, ही दिवाळी करोना व प्रदुषण प्रतिबंधक नियमांचं पालन करुन आरोग्यदायी साजरी करुया. यंदाची दिवाळी राज्याला कोरोनामुक्तीकडे नेणारी ठरो,” असे अजित पवार म्हणाले आहेत.


अरुणाचलचे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांचे प्रदूषणमुक्त दिवाळीचे आवाहन

अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल ब्रिगेडियर (निवृत्त) बीडी मिश्रा आणि मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी बुधवारी लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. आणि प्रकाश पर्व प्रदूषणमुक्त पद्धतीने साजरे करण्याचे आवाहन केले.राज्यपालांनी लोकांना मोठ्या आवाजाचे फटाके न वापरण्यास सांगितले कारण त्यामुळे ध्वनी प्रदूषण होते आणि विषारी वायू बाहेर पडतात. ते म्हणाले की, आरोग्य धोके आणि पर्यावरण प्रदूषण कमी करण्यासाठी मदत करणे ही लोकांची जबाबदारी आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी