हिमाचल :  ५०० फूट दरीत कोसळली बस, २५ जणांचा मृत्यू झाल्याची भीती

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 20, 2019 | 19:15 IST | टाइम्स नाऊ मराठी

हिमाचल प्रदेशच्या कुल्लू जिल्ह्यात एक मोठा अपघात झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बंजारहून एक किलोमीटर अंतरावर भियोठ येथील वळणावर बस ५०० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात २५ जणांचा मृत्यू झाल्याची भीती

kullu bus accident
कूल्लू बस अपघात   |  फोटो सौजन्य: Twitter

कूल्लू :  हिमाचल प्रदेशच्या कुल्लू जिल्ह्यात एक मोठा अपघात झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बंजारहून एक किलोमीटर अंतरावर भियोठ येथील वणावर बस ५०० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात २५ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. 

दरम्यान, अपघातात बसचा चेंदामेंदा झाला असून यात मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. कुल्लूहून गाडागुशैणी येथे जाणारी ही बस प्रवाशांनी खचाखच भरली होती. दरी कोसळल्यावर बसचे भाग अस्ताव्यस्त पडले होते. बसचे छताचा पूर्ण चुराडा झाला आहे.  घटना स्थळावरील प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, प्रवाशांचे मृतदेह सर्वत्र रक्ताच्या थारोळात पडलेले होते. घटनास्थळावरील परिस्थिती फारच भीषण झाली होती. या बसमध्ये किमान ६० जण प्रवास करीत होते. 

यात अनेक लोक जखमी आहेत, त्यांना दरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न होत आहेत.  स्थानिक नागरिक आणि पोलिस प्रशासन घटना स्थळी पोहचले आहेत. स्थानिक नागरिक बचाव आणि मदत कार्यात सक्रीय भाग घेत आहेत. सध्या जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याला प्राधान्य दिले जात आहे. 

अपघातात जखमी झालेल्यांमध्ये १२ महिला ६ तरूणी, ७ मुलं आणि १० युवकांना बचावण्यात यश आले आहे. माहितीनुसार ते सर्व गंभीररित्या जखमी आहेत. सर्वांना उपचारासाठी बंजार येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

सांगण्यात येत आहे की बसमधील बहुतांशी प्रवाशी हे बंजार स्कूल आणि कॉलेजचे विद्यार्थी आहेत. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. 
 

 

 

 

 

 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
हिमाचल :  ५०० फूट दरीत कोसळली बस, २५ जणांचा मृत्यू झाल्याची भीती Description: हिमाचल प्रदेशच्या कुल्लू जिल्ह्यात एक मोठा अपघात झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बंजारहून एक किलोमीटर अंतरावर भियोठ येथील वळणावर बस ५०० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात २५ जणांचा मृत्यू झाल्याची भीती
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles