Priyanka Gandhi: प्रियांका गांधींना दोन महिन्यात दुसऱ्यांदा कोरोनाची लागण, राहुल गांधीची तब्येत बिघडली

Priyanka Gandhi Vadra tests Covid positive: प्रियंका गांधी या वर्षीच्या जून महिन्याच्या सुरुवातीला कोव्हिड चाचणीत पॉझिटिव्ह आल्या होत्या. ज्यानंतर आता त्यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे.

priyanka gandhi again got covid 19 brother rahul gandhi also not feeling well had to cancel rajasthan tour
प्रियांका गांधींना दोन महिन्यात दुसऱ्यांदा कोरोनाची लागण  |  फोटो सौजन्य: IANS
थोडं पण कामाचं
 • प्रियंका गांधींनी दिली कोरोनाची लागण झाल्याची माहिती
 • देशात 24 तासांत कोरोनाचे 16,047 नवीन रुग्ण आढळले
 • तर 19,539 लोक बरे झाले, पॉझिटिव्हीटी दर 4.94%

Priyanka Gandhi Vadra tests Covid positive: नवी दिल्ली: काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी-वाड्रा (Priyanka Gandhi Vadra) यांना कोरोना (Corona) विषाणूची लागण झाली आहे. बुधवारी (10 ऑगस्ट 2022) त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. त्यांनी ट्विट करताना असं लिहलं की, 'आज माझी (पुन्हा) चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या काळात मी घरीच आयसोलेशनमध्ये असेन आणि सर्व प्रोटोकॉल पाळेन.' (priyanka gandhi again got covid 19 brother rahul gandhi also not feeling well had to cancel rajasthan tour)

यापूर्वी जूनमध्ये प्रियंका गांधींची कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह आली होती. प्रियंका यांनी त्यावेळीही ट्विटरवरुन लोकांना याची माहिती दिली होती. त्यावेळी त्या असं म्हणाल्या होत्या की,- 'माझ्यात कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. सर्व प्रोटोकॉलचे पालन करून, मी स्वतःला घरीच क्वॉरंटाइन केलं आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना मी आवश्यक खबरदारी घेण्याची विनंती करेन.'

राहुल गांधींचीही (Rahul Gandhi) तब्येत बिघडली, राजस्थान दौरा रद्द

दरम्यान, प्रियंका गांधींचे भाऊ आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी राजस्थानमधील अलवर शहराचा आपला प्रस्तावित दौरा रद्द केला आहे. सूत्रांच्या हवाल्याने वृत्तसंस्था एएनआयने सांगितले की, त्यांची प्रकृती ठीक नाही. त्यामुळे त्यांनी राजस्थान दौरा रद्द केला आहे. राहुल गांधी हे अलवरमध्ये पक्षाच्या नेतृत्व संकल्प शिबिरात(Netratv Sankalp Shivir) सहभागी होणार होते.

कोरोनाचे नवे अपडेट काय?

गेल्या 24 तासात भारतात कोरोना विषाणूचे 16,047 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर 19,539 लोक बरेही झाले आहेत. 10 ऑगस्ट रोजी सकाळी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार, सध्या सक्रिय कोरोनाव्हायरस प्रकरणांची संख्या 1,28,261 आहे, तर दररोजचा पॉझिटिव्हीटी रेट 4.94% आहे.

देशातील संक्रमितांची संख्या 

 1. 7 ऑगस्ट 2020 रोजी - 20 लाख 
 2. 23 ऑगस्ट 2020 रोजी - 30 लाख  
 3. 5 सप्टेंबर 2020 रोजी - 40 लाख 
 4. 16 सप्टेंबर 2020 रोजी - 50 लाख 
 5. 28 सप्टेंबर 2020 रोजी - 60 लाख 
 6. 11 ऑक्टोबर 2020 रोजी - 70 लाख 
 7. 29 ऑक्टोबर 2020 रोजी - 80 लाख 
 8. 20 नोव्हेंबर 2020 रोजी - 90 लाख एवढी.

19 डिसेंबर 2020 रोजी देशात कोरोना रुग्णांची संख्या ही तब्बल एक कोटींहून अधिक झाली होती. तर गेल्या वर्षी, 4 मे रोजी कोरोना रुग्णांची संख्या ही तब्बल 2 कोटींच्या देखील पुढे गेली होती आणि 23 जून 2021 रोजी ती 3 कोटींच्या घरात गेली होती. तर यावर्षी 25 जानेवारी रोजी संसर्ग झालेल्यांची संख्या चार कोटी एवढी होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी