लखीमपूरला जाणाऱ्या प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात; गेस्ट हाऊसमध्ये मारावा लागला झाडू, पाहा व्हिडिओ

हिंसाचाराच्या घटनेनंतर रात्री उशीरा या ठिकाणी पाहणीसाठी पोहचलेल्या काँग्रेसच्या महसचिव प्रियंका गांधी यांना मध्यरात्रीनंतर पोलिसांनी ताब्यात घेतले.

Priyanka Gandhi sweeping  in the guest house
प्रियंका गांधींनी गेस्ट हाऊसमध्ये मारला झाडू; पाहा व्हिडिओ   |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • सीतापूरमध्ये प्रियंका गांधींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांना PAC गेस्ट हाउसमध्ये ठेवण्यात आले.
  • गेस्ट हाउसमध्ये प्रियंका गांधींना झाडू मारावा लागला आहे.
  • प्रियंका गांधी सर्व कार्यक्रम रद्द करुन लखीमपूर जात होत्या.

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी येथे रविवारी शेतकरी आंदोलनादरम्यान हिंसाचार झाला. यात आठ जणांचा मृत्यू झाला. हिंसाचाराच्या घटनेनंतर रात्री उशीरा या ठिकाणी पाहणीसाठी पोहचलेल्या काँग्रेसच्या महसचिव प्रियंका गांधी यांना मध्यरात्रीनंतर पोलिसांनी ताब्यात घेतले. सीतापूरमध्ये प्रियंका गांधींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांना PAC गेस्ट हाउसमध्ये ठेवण्यात आले. तेथील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, यात त्या झाडू मारताना दिसत आहेत. प्रियंका गांधींची ही शिक्षा की सुरक्षा असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 

प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतल्यानंतर मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रियंका गांधी सर्व कार्यक्रम रद्द करुन लखीमपूर जात होत्या. त्यांना सीतापूर येथे त्यांच्याशी गैरवर्तवणूक करत त्यांना थांबविण्यात आले. हे खूप दुर्दैवी आणि निंदनीय आहे. या देशात लोकशाहीच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत असल्याचं छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले आहेत. दुसरीकडे, राहुल गांधी यांनी ट्वीट करून म्हटले की, प्रियंका, मला माहीत आहे की तू मागे हटणार नाहीस - तो तुझ्या धैर्याला घाबरतो. न्यायासाठीच्या या अहिंसक लढाईत आपण देशाच्या अन्नदात्याला विजयी करू.  

 ताब्यात घेताना प्रियंका गांधींचा पोलिसांशी जोरदार वाद झाला. त्या म्हणाल्या की,  ऑर्डर काढा, नाहीतर मी येथून हलणार नाही.  जर तुम्ही मला कारमध्ये बसवले तर मी तुमच्यावर अपहरणाचा आरोप लावेल.  मी ते पोलिसांवर टाकणार नाही, तुम्ही त्यांना महिलांसाठी का पुढे करत आहात. एकतर वॉरंट काढा, मला दाखवा. तुम्ही मला कशाच्या आधारावर काढत आहात?

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्य़ातील टिकोनिया येथे शेतकरी आंदोलनादरम्यान रविवारी हिंसाचार घडला. त्यात आठजण ठार झाले, तर अनेकजण जखमी झाले. मृतांमध्ये चार शेतकऱ्यांचा समावेश आहे. काँग्रेसचे उत्तर प्रदेश युनिटचे अध्यक्ष अजय कुमार लल्लू यांनी सांगितले की, प्रियंका गांधी वाड्रा आणि काँग्रेसचे राज्यसभा सदस्य दीपेंद्र हुडा यांच्यासह काही वरिष्ठ नेते लखीमपूर खेरीला जात होते.

पहाटेच्या सुमारास सीतापूरमध्ये पोहचले असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले. प्रियंका गांधी- वाड्रा यांच्याशी पोलिसांनी गैरवर्तन केले, त्यांना धक्का-बुक्की केल्याचा आरोप अजय कुमार लल्लू केला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस शेतकऱ्यांचे दुःख वाटून घेणार होते आणि त्यांना अशाप्रकारे थांबवणे अलोकतांत्रिक आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी