Kashmir Fight Blog पाकिस्तानचे समर्थन करणारा ब्लॉग अमेरिकेने केला बंद

'काश्मीर फाइट ब्लॉग' या नावाने पाकिस्तानचे समर्थन करणारा एका ब्लॉग वर्डप्रेस या प्लॅटफॉर्मवर चालवला जात होता. या ब्लॉगशी संबंधित फाइल अमेरिकेतील सर्व्हरवर होत्या. भारत सरकारच्या मागणीनंतर अमेरिकेने हा ब्लॉग कायमचा बंद केला.

Pro-Pakistan 'Kashmir Fight' blog shut down by US
Kashmir Fight Blog पाकिस्तानचे समर्थन करणारा ब्लॉग अमेरिकेने केला बंद 
थोडं पण कामाचं
  • Kashmir Fight Blog पाकिस्तानचे समर्थन करणारा ब्लॉग अमेरिकेने केला बंद
  • विचार स्वातंत्र्याच्या नावाखाली ब्लॉगमधून भारतविरोधी कारवायांसाठी चिथावणी दिली जात होती
  • काश्मीरमधील निवडक हत्यांचा आणि ब्लॉगमधील मजकुराचा संबंध असल्याचे ठोस पुरावे भारतीय तपास यंत्रणांच्या हाती आले

नवी दिल्ली: 'काश्मीर फाइट ब्लॉग' या नावाने पाकिस्तानचे समर्थन करणारा एका ब्लॉग वर्डप्रेस या प्लॅटफॉर्मवर चालवला जात होता. या ब्लॉगशी संबंधित फाइल अमेरिकेतील सर्व्हरवर होत्या. भारत सरकारच्या मागणीनंतर अमेरिकेने हा ब्लॉग कायमचा बंद केला. Pro-Pakistan 'Kashmir Fight' blog shut down by US

विचार स्वातंत्र्याच्या नावाखाली ब्लॉगमधून भारतविरोधी कारवायांसाठी चिथावणी दिली जात होती. या ब्लॉगमधून भारताचे समर्थन करणाऱ्यांची कोंडी करण्यासाठी मार्गदर्शन केले जात होते. 'रायझिंग काश्मीर'चे संपादक शुजात बुखारी यांची २०१८ मध्ये तर वकील आणि टीव्हीवरील चर्चांमध्ये सहभागी होणारे बाबर कादरी यांची २०२० मध्ये हत्या करण्यात आली. तसेच ज्वेलर सतपाल निश्चल यांची जानेवारी २०२१ मध्ये हत्या करण्यात आली. या हत्यांचा आणि ब्लॉगमधील मजकुराचा संबंध असल्याचे ठोस पुरावे भारतीय तपास यंत्रणांच्या हाती आले. यानंतर ब्लॉग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी