प्रेषित मोहम्मद अवमान प्रकरण: विद्यार्थ्याला नग्न करून मारहाण, पीडित मुलासोबत अश्लिल चाळे; VIDEO व्हायरल

या घटनेचे संतापजनक व्हिडिओज आणि फोटोज महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. विशेष म्हणजे मारहाण करत असल्याचे व्हिडिओ आणि फोटो महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात आले आहे. तत्पूर्वी, पीडितेने IFHE अधिकार्‍यांना पत्र लिहून आरोपीविरुद्ध शारीरिक हल्ला आणि जीवाला धोका असल्याची औपचारिक तक्रार दाखल करण्याची मागणी केली होती.

Prophet Mohammad contempt case: Student beaten naked
प्रेषित मोहम्मद अवमान प्रकरण: विद्यार्थ्याला नग्न करत मारहाण  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • रॅगिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल.
  • 15 ते 20 जणांनी पीडित विद्यार्थ्याच्या वसतिगृहात शिरुन मारहाण केली.
  • या मारहाणी प्रकरणी पीडित विद्यार्थ्याने 11 नोव्हेंबर रोजी तक्रार दाखल केली

हैदराबाद :  प्रेषित मोहम्मद (Prophet Mohammad) यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी हैदराबादमध्ये एका विद्यार्थ्याला नग्न करुन मारहाण झाल्याची घटना घडली आहे.  हा प्रकार हैदराबादमधील (Hyderabad) एका वसतिगृहात (hostel) घडला आहे. मारहाण झालेल्या विद्यार्थ्याचे नाव हे हिमांक बन्सल (Himank Bansal) असून तो कायद्याचं शिक्षण घेत आहे. दरम्यान या मारहाण प्रकरणी पीडित विद्यार्थ्याने 11 नोव्हेंबर रोजी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार ही घटना 1 नोव्हेंबर रोजी घडली असून 15 ते 20 जणांनी पीडित विद्यार्थ्याच्या वसतिगृहात शिरुन मारहाण करण्यात आली तसेच त्याचा लैंगिक छळ देखील करण्यात आला आहे.   (Prophet Mohammad contempt case: Student stripped naked, molested with child victim; VIDEO VIRAL)

अधिक वाचा  : गोळीबार करत लुटली 28 लाख रुपयाची रोकड
संबंधित विद्यार्थ्यांनी पीडित विद्यार्थ्याला धक्काबुक्की करत चुकीची वागणूक दिली. तसेच त्याच्या चेहऱ्यावर, गालावर, पोटात लाथा-बुक्क्या आणि चापटीने मारहाण केली आहे. एवढंच नव्हे तर आरोपींनी पीडित विद्यार्थ्याच्या गुप्तांगांला स्पर्श करत त्याला काही रसायने आणि पावडर बळजबरीने खाऊ घातली, असं तक्रारीत म्हटलं आहे. दरम्यान, एका आरोपी विद्यार्थ्याने आपल्या तोडांत गुप्तांग घालण्याचा प्रयत्न केला.

तसेच कपडे फाडून नग्नावस्थेत मारहाण केल्याचा आरोपही पीडित विद्यार्थी बन्सलने केला आहे.  तसेच आपल्याला मरेपर्यंत बांधून ठेवण्याचा त्याचा विचार होता असंही बन्सल याने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. आपल्या तक्रारीत विद्यार्थ्याने पुढे म्हटले आहे की, त्याच्या चेहऱ्यावर जखमा होत्या आणि त्याच्या डोळ्याचा खालचा भाग आणि नाक सुजले होते. दरम्यान याबाबतचं वृत्त ‘इंडिया टुडे’नं दिलं आहे.

अधिक वाचा  :  YouTube मध्ये Q&A फीचर, युझरना होणार फायदा

या घटनेचे संतापजनक व्हिडिओज आणि फोटोज महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. विशेष म्हणजे मारहाण करत असल्याचे व्हिडिओ आणि फोटो महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात आले आहे. तत्पूर्वी, पीडितेने IFHE अधिकार्‍यांना पत्र लिहून आरोपीविरुद्ध शारीरिक हल्ला आणि जीवाला धोका असल्याची औपचारिक तक्रार दाखल करण्याची मागणी केली होती.

पीडित विद्यार्थ्याच्या   पत्रानुसार, त्याने एका मित्रासोबतच्या संभाषणात पैगंबर विरुद्ध टिप्पणी केली होती. त्या मित्राने त्यांच्या गप्पा सार्वजनिक केल्यानंतर इतर विद्यार्थ्यांना याची माहिती मिळाली. त्यानंतर विद्यार्थ्याला मारहाण केली झाली. 

 याप्रकरणी 11 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी पीडित विद्यार्थ्याला धमकावलं होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली असून रॅगिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी