Agnipath Scheme विरोधात 'भारत बंद'ची घोषणा, बिहारमधील 17 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट बंद,अनेक राज्यांमध्ये शाळा बंद

केंद्र सरकारने (Central Government) सैन्य भरतीसाठी (Military recruitment) आणलेल्या अग्निपथ योजनेला (Agneepath Scheme) देशभरात तीव्र विरोध होत आहे. तसेच, अनेक राज्यांमध्ये सुरू असलेली निदर्शनेही हिंसक होत आहेत. आंदोलक आणि विद्यार्थी संघटनांनी बिहार बंदची हाक दिल्यानंतर सध्या बिहारमध्ये भारत बंदची हाक देण्यात आली आहे.

Declaration of 'Bharat Bandh' against Agnipath Scheme
Agnipath Scheme विरोधात 'भारत बंद'ची घोषणा  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • अनेक राज्यांमध्ये हजारो तरुण या योजनेला विरोध करताना दिसत आहेत.
  • भारत बंदच्या पार्श्वभूमीवर पंजाब पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना

Agneepath Protest: केंद्र सरकारने (Central Government) सैन्य भरतीसाठी (Military recruitment) आणलेल्या अग्निपथ योजनेला (Agneepath Scheme) देशभरात तीव्र विरोध होत आहे. तसेच, अनेक राज्यांमध्ये सुरू असलेली निदर्शनेही हिंसक होत आहेत. आंदोलक आणि विद्यार्थी संघटनांनी बिहार बंदची हाक दिल्यानंतर सध्या बिहारमध्ये भारत बंदची हाक देण्यात आली आहे. याबाबत देशातील अनेक राज्यांतील प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

केंद्र सरकारने ही योजना जाहीर केल्यापासून सातत्याने आंदोलने केली जात आहेत. देशभरात अग्निपथ योजनेचा विरोध वाढताना दिसत आहे. या ठिणगी सर्वप्रथम बिहार पडली. त्यानंतर बघता बघता देशातील अनेक राज्यांमध्ये आंदोलक रस्त्यावर उतरले. यात अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले. ज्यामध्ये रेल्वे, बसेससह सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यात आले. अनेक राज्यांमध्ये हजारो तरुण या योजनेला विरोध करताना दिसत आहेत. अग्निपथ योजनेबाबत रविवारी तिन्ही सेनांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. ज्यामध्ये अग्निपथ योजनेचे फायदे सांगण्यात आले. तर आंदोलन करणाऱ्या तरुणांनी आता सोमवारी भारत बंदची घोषणा केली आहे.

भारत बंदमुळे पंजाब पोलीस सतर्क

सैन्य भरतीसाठी सुरू करण्यात आलेल्या अग्निपथ योजनेच्या विरोधात सोमवारी होणाऱ्या संभाव्य भारत बंदच्या पार्श्वभूमीवर पंजाब पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासोबतच पंजाबमधील सर्व प्रमुख लष्करी प्रशिक्षण संस्थांभोवती सुरक्षा वाढवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. 

हरियाणात कडेकोट सुरक्षा व्यवस्था

यासोबतच हरियाणामध्येही लष्कराच्या अग्निपथ योजनेला विरोध होत असताना भारत बंदच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. त्याअंतर्गत फरिदाबाद पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सुरक्षा व्यवस्थेशी संबंधित सर्व तयारी पूर्ण केली आहे. सुरक्षा व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आज फरिदाबादमध्ये २ हजारांहून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

केरळमध्ये सुरक्षा वाढवली

20 जून रोजी भारत बंदच्या आवाहनादरम्यान, केरळ पोलिसांनी सांगितले की सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या किंवा हिंसाचारात सहभागी असलेल्या कोणालाही अटक करण्यासाठी संपूर्ण पोलिस दल तैनात केले जाईल. राज्य पोलीस प्रमुख अनिल कांत यांनी कर्मचार्‍यांना सार्वजनिक हिंसाचार आणि व्यावसायिक आस्थापने सक्तीने बंद करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. कांत यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांना 20 जून रोजी न्यायालये, केरळ राज्य विद्युत मंडळाची कार्यालये, परिवहन महामंडळ आणि खाजगी बसेस आणि सरकारी कार्यालयांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत.

भारत बंदच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक राज्यांमध्ये शाळा-कॉलेज बंद

20 जूनपासून उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर शाळा सुरू होणार असल्याची माहिती आहे, मात्र ज्याप्रकारे हिंसाचार आणि तोडफोडीच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

झारखंडमध्ये शाळा बंद 

अग्निपथ योजनेला झालेल्या विरोधाचा नकारात्मक परिणाम मध्य भारतातही दिसून येत आहे. तरुणांनी पुकारलेल्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर झारखंडमध्ये सोमवारी सर्व शाळा बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  झारखंडच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे की विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने झारखंडमधील सर्व शाळा सोमवारी बंद राहणार आहेत.
अनेक गाड्या रद्द

'अग्निपथ' योजनेला सुरू असलेल्या विरोधामुळे पूर्व रेल्वेने रविवारी कोलकाता आणि पश्चिम बंगालच्या इतर भागांना जोडणाऱ्या 29 गाड्या रद्द केल्या. बिहारच्या विविध भागात, महाराष्ट्रातील वांद्रे आणि गुजरातमधील अहमदाबाद येथे धावणाऱ्या सात गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर दोन गाड्या कमी करण्यात आल्या आहेत.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी