पब कर्मचाऱ्याने टॉयलेटमध्ये शूट केला महिलेचा अश्लील व्हिडिओ, पाहा पुढे काय घडलं

Bengaluru: बंगळुरुमधील एका पबमध्ये कर्मचाऱ्याने टॉयलेटमध्ये एका महिलेचा अश्लील व्हिडिओ शूट केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

pub worker made obscene video of woman in toilet in bengaluru
पब कर्मचाऱ्याने टॉयलेटमध्ये शूट केला महिलेचा अश्लील व्हिडिओ (प्रातिनिधिक फोटो)  |  फोटो सौजन्य: Representative Image

बंगळुरु: देशाच्या आयटी राजधानीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बंगळुरूमधील एका पब कर्मचाऱ्याला टॉयलेटमध्ये महिलेचा अश्लील व्हिडिओ बनवल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. ही घटना २४ जानेवारी रोजी मॅकग्राथ रोडवरील पबमध्ये घडली. ओडिशाचा रहिवासी असलेल्या बौद्ध देबनाथ असं ३० वर्षीय आरोपीचंन नाव असून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपीने आपला मोबाइल फोन वापरुन महिलेचा अश्लील व्हिडिओ बनवल्याची कबुली दिली आहे. देबनाथ तीन महिन्यांपूर्वी पबमध्ये कामाला लागला होता. या प्रकरणी त्याला स्थानिक न्यायालयात हजर केल्यानंतर कोर्टाने त्याला मध्यवर्ती कारागृहात धाडलं आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने अशी माहिती दिली आहे की, देबनाथच्या फोनवर कोणताही व्हिडिओ सापडला नाही, मात्र त्याने तो डिलीट केला असण्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान, एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या ३४ वर्षीय महिलेने आपल्या तक्रारीत असं म्हटलं आहे की,'मी जेव्हा वॉशरूममध्ये गेले तेव्हा मी व्यक्ती टॉयलेटमध्ये मोबाइल फोनमधून व्हिडिओ रेकॉर्ड करत होता. हे पाहताच मी ताबडतोब आरडाओरडा सुरु केला. यावेळी माझ्या शेजारी उभी असलेली आणखी एक महिलेने देखील त्याला पाहिलं आणि तिने देखील आरडाओरडा सुरु केला. त्यावेळी ती असं म्हणाली की, तो व्यक्ती पबचा कर्मचारी होता. कारण त्याने पब कर्मचाऱ्यांचा ड्रेल घातला होता.'

दरम्यान, महिलने तक्रारीत असंही म्हटलं आहे की, तिने जेव्हा पबच्या कर्मचार्‍याने केलेल्या कृत्याबाबत पब व्यवस्थापनाला माहिती दिली तेव्हा त्यांनी तिच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं.  

पीडित महिलेनं असंही सांगितलं की, 'आम्ही त्या व्यक्तीची ओळख पटवली होती. जेव्हा आरोपीला पकडलं तेव्हा त्याने माफी मागितली आणि गैरवर्तनाबद्दल खेद व्यक्त केला. नंतर आम्ही पब मॅनेजरशी संपर्क साधला व त्याला टॉयलेट परिसरातील सीसीटीव्ही व्हिडिओ आम्हाला देण्यास विनंती केली. पण त्याने ते देण्यास आम्हाला नकार दिला.' 

दरम्यान, या प्रकरणाबाबत पब व्यवस्थापनाने या घटनेवर प्रतिक्रिया देताना असं म्हटलं की, ते कधीही बेशिस्तपणा खपवून घेत नाही. एका निवेदनात पब व्यवस्थापनाने म्हटलं आहे की, 'पबमधील ग्राहक व महिलांची सुरक्षा ही आमची जबाबदारी आहे. आम्ही पबमधील ग्राहकांविषयी कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन सहन करणार नाही. अशा घटना पुन्हा होणार नाहीत यासाठी देखील आम्ही प्रयत्न करीत आहोत.'  पब व्यवस्थापनाने नंतर सांगितले की गैरवर्तन करणाऱ्या कर्मचार्‍यास नोकरीवरून काढून टाकण्यात आले असून त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी