पुणे : पंजाबी गायक (Punjabi Singer) आणि काँग्रेसचे नेते (Congress leader) सिद्धू मूसेवाला (Sidhu Moosewala) हत्या प्रकरणात पुणे ग्रामीण कनेक्शन समोर आलं होतं. या प्रकरणात सौरभ महाकाळनंतर आता पुणे पोलिसांनी (Pune police) दुसरा आरोपी संतोष जाधव (Santosh Jadhav) याला अटक (Arrested) केली आहे. पोलिसांनी त्याला गुजरातमधून अटक केली आहे. संतोष जाधवसोबत त्याच्या सूर्यवंशी नावाच्या आणखी एका साथीदाराला ही पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांना रात्री बारा वाजता न्यायाधीशांसमोर त्यांच्या घरी नेऊन हजर करण्यात आलं असता त्यांना 20 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणात एकूण आठ आरोपी असल्याचं समोर आलं आहं. त्यापैकी पुण्यातील सौरभ महाकाळ आणि संतोष जाधव या दोघांची नावेही समोर आली होती. जाधव हा सिद्धू मूसेवाला हत्याकांडातही वॉन्टेड संशयित होता, अशी माहिती एका अधिकाऱ्याने सोमवारी दिली. मूसेवाला हत्येप्रकरणी आधी सौरभ महाकाळची अटक केल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली त्यातून संतोष जाधवविषयीची माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धेश कांबळे उर्फ सौरव उर्फ महाकाल याने महाराष्ट्रातील दोन नेमबाज (shooters) संतोष जाधव आणि नवनाथ सूर्यवंशी यांची लॉरेन्स बिश्नोई टोळीशी ओळख करून दिली होती. हे दोघेही मूसेवाला यांच्या हत्याकांडात सामील होते.
दरम्यान महाकाळची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली तेव्हा त्याने सांगितले की, महाराष्ट्रातील या शुटर्सची ओळख बिश्नोईचा सहकारी विक्रम ब्रार यांच्याशी करून देण्यात आली. त्यानंतर त्यांना हत्या करण्यासाठी प्रत्येकी तीन लाख रुपये देण्याची डील झाली. त्यापैकी सुरुवातीला पन्नास हजार रुपये संतोष जाधव देण्यात आले होते.
संतोष जाधव हा पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचरचा राहणारा असुन दीड वर्षांपासून तो राण्या बाणखेले नावाच्या गुडांचा खुन केल्यापासून फरार होता. त्यानंतर तो उत्तर भारतातील लॉरेन्स बिष्णोई टोळीत सामील झाला होता. या टोळीकडून खंडणी वसूल करण्यासाठी काही दिवसांपुर्वी त्याने राजस्थानमधील गंगापूर शहरातील एका व्यापाऱ्यांवर गोळीबार केला होता. मात्र संतोष जाधवची चर्चा तेव्हापासून सुरु झाली, जेव्हा पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्या प्रकरणात त्याच नावं घेण्यात आलं. त्याचबरोबर सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल देखील त्याच नाव घेण्यात आलं.
संतोष जाधवचा पंजाब, दिल्ली आणि मुंबई पोलीसांकडून त्याचा शोध सुरु करण्यात आला. त्यासाठी वेगवगेळ्या राज्यातील पोलीस पुण्यात तळ ठोकून आहेत. मात्र पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने गुजरातमधील कच्छ मधून त्याला अटक करण्यात यश मिळवलय. काही दिवसांपुर्वी पुणे ग्रामीण पोलिसांनी सौरभ महाकाळ उर्फ सिद्धेश कांबळे या त्याच्या साथीदाराला ही अटक केली होती.
पंजाबमधील आप सरकारनं काल 424 जणांची सुरक्षा काढली होती. या निर्णयाला एक दिवस उलटत नाही तोवर काँग्रेस नेते आणि पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेत अन्य दोन जण जखमी झाले आहेत. ही घटना राज्यातील मानसा जिल्ह्यात घडली. आप सरकारनं ज्यांची सुरक्षा कमी केली होती, यामध्ये मुसेवाला यांचाही समावेश होता. दरम्यान, यावर्षी झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीत मुसेवाला यांनी मानसा जिल्ह्यातून काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. त्यांचा आम आदमी पक्षाच्या डॉ. विजय सिंघला यांनी पराभव केला होता.
मानसा जिल्ह्यात रविवारी शुभदीप सिंह सिद्धू उर्फ सिद्धू मुसेवाला यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. हल्ल्याच्या वेळी मुसेवाला त्यांच्या थार जीपमधून प्रवास करत होते. या हल्ल्यात त्यांचा एक नातेवाईक आणि एक मित्र जखमी झाला. मुसेवाला यांनी काँग्रेसच्या तिकिटावर मानसा येथून पंजाब विधानसभा निवडणूकही लढवली होती. मात्र आपचे उमेदवार विजय सिंहला यांच्याकडून त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईनं स्वीकारली आहे.