पंजाबमधील या गावात रस्ते, गल्लींना दिली कर्तृत्ववान महिलांची नावे

लोकल ते ग्लोबल
Updated May 19, 2019 | 11:26 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

पंजाबच्या बठिंडा येथील हिम्मतपुरा गावात एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले आह. या गावात रस्ते तसेच गल्लींना महिलांची नावे देण्यात आली आहेत.

punjab
पंजाब  |  फोटो सौजन्य: ANI

मुंबई: सध्याच्या काळात महिला आणि पुरुष एकमेकांच्या बरोबरीने सर्वच क्षेत्रात खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. २१व्या शतकात महिला स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करत आहेत. देशातही पुरुषांसोहत महिलांनाही तितकाच सन्मान दिला जात आहे. याचेच एक उदाहरण पंजाबच्या बठिंडा जिल्ह्यात पाहायला मिळाले. बठिंडा जिल्ह्याचील हिम्मतपुरा गावात एक ऐतिहासिक चित्र पाहायला मिळाले. या गावात गल्ली तसेच रस्त्यांना महिलांची नावे देण्यात आली आहेत. 

या गावात एका गल्लीचे नाव अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला कल्पना चावला असे देण्यात आले आहे. गल्लीच्या साईन बोर्डावर कल्पना हे नाव पंजाबी भाषेत लिहिण्यात आले आहे. भारताची मुलगी कल्पना चावला यांचा कोलंबिया अंतराळ यानात मृत्यू झाला होता. कल्पनाशिवाय आणखी एका गल्लीचे नाव प्रसिद्ध साहित्यकार दलीप कौर टिवाणा यांना देण्यात आले आहे. दलीप कौर यांना साहित्य आणि शिक्षणातील उल्लेखनीय कामगिरीसाठी २००४मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 

या नव्या संकल्पनेबाबत बोलताना गावातील एक महिला करमजीत कौर यांनी सांगितले, हे केवळ आमच्या गावात होत आहे. हा एक चांगला क्षण आहे. आमच्या गावात महिलांचा सन्मान केला जातो. महिलांशिवाय गावातील इतर नागरिकही हे पाऊल उचलल्याने खुश आहेत. एकीकडे जिथे देशात महिलांच्या सुरक्षिततेबाबत सवाल उपस्थित केले जातात तिथे अशा काही घटना पाहिल्याने समाधान मिळते. या गावांप्रमाणेच इतर गावांनीही अशा प्रकारची पाऊले उचलली तर समाजात परिवर्तन नक्कीच पाहायला मिळेल. 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
पंजाबमधील या गावात रस्ते, गल्लींना दिली कर्तृत्ववान महिलांची नावे Description: पंजाबच्या बठिंडा येथील हिम्मतपुरा गावात एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले आह. या गावात रस्ते तसेच गल्लींना महिलांची नावे देण्यात आली आहेत.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles