Punjab CM stomach : पंजाबचे मुख्यमंत्री (Punjab CM) भगवंत मान (Bhagwant Mann) यांना दिल्लीत रुग्णालयात (Hospitalized) उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर एका व्हिडिओची (Video) जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या व्हिडिओत मुख्यमंत्री मान हे दूषित पाणी (Polluted water) पित असल्याचं दिसतं. पंजाबमधील एका नदीचं पाणी ग्लासमध्ये घेऊन ते सर्वांदेखत त्यांनी ते प्यायलं होतं. याच पाण्यातून त्यांना इन्फेक्शन झाल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. आम आदमी पक्षाकडून मान यांचा हा व्हिडिओ ट्विट करण्यात आला होता. दरम्यान, मान यांच्या पोटाचा आजार आणि त्यांनी प्यायलेलं नदीचं पाणी यांचा एकमेकांशी काहीही संबंध नसल्याचा दावा आम आदमी पक्षानं केला आहे.
ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਸਾਹਿਬ ਦੀ ਚਰਨ ਛੋਹ ਪ੍ਰਾਪਤ ਧਰਤੀ ਸੁਲਤਾਨਪੁਰ ਲੋਧੀ ਵਿਖੇ ਪਵਿੱਤਰ ਵੇਈਂ ਦਾ ਪਾਣੀ ਪੀਂਦੇ ਹੋਏ CM @BhagwantMann ਜੀ — AAP Punjab (@AAPPunjab) July 17, 2022
ਪਵਿੱਤਰ ਵੇਈਂ ਨੂੰ ਸਾਫ਼ ਕਰਨ ਦਾ ਬੀੜਾ ਰਾਜ ਸਭਾ ਮੈਂਬਰ ਸੰਤ ਸੀਚੇਵਾਲ ਜੀ ਨੇ ਚੁੱਕਿਆ ਹੋਇਆ ਹੈ pic.twitter.com/4LnU0U66wQ
पंजाबमधील प्रसिद्ध पर्यावरणवादी नेते आणि राज्यसभा खासदार बाबा बलबीर सिंग यांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांना एका कार्यक्रमााठी आमंत्रित केलं होतं. कालीबेन नदी शुद्धीकऱण मोहिमेचा 22 वा वर्धापनदिन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री मान उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान नदीचं पाणी किती शुद्ध झालं आहे, हे दाखवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी या नदीचं पाणी प्यावं, अशी विनंती आयोजकांकडून करण्यात आली. ती मान्य करत मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या हातात एक ग्लास पकडून नदीचं पाणी त्यात भरलं आणि पिऊन टाकलं. या घटनेचं अनेकांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं आणि सोशल मीडियावर अपलोडही केलं.
अधिक वाचा - Congress President ED: सोनिया गांधींची ईडीकडून चौकशी, कार्यकर्त्यांकडून हिंसक निदर्शने; कार पेटवली
नदीचं पाणी वरवर पाहता स्वच्छ दिसत असलं तरी आजूबाजूच्या गावांमधील कचरा आणि सांडपाणी त्यात मिसळत असल्यामुळे ते दूषित असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. हे पाणी मुख्यमंत्र्यांनी प्यायल्यामुळेच त्यांच्या पोटात गडबड झाली असावी, असा दावा काही स्थानिक नागरिक करत आहेत. ही घटना घडल्यानंतर काही दिवसांतच मुख्यमंत्र्यांना पोटाच्याच समस्येसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागल्यामुळे या पाण्याचा आणि मुख्यमंत्र्यांच्या पोटाचा एकमेकांशी संबंध जोडला जात आहे.
अधिक वाचा - विवाहित महिलांप्रमाणेच अविवाहित मुलींनाही गर्भपाताचा अधिकार, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
पंजाबमध्ये आम आदमी पक्षाकडून नदी शुद्धीकरण मोहिम हाती घेण्यात आली आहे. राज्यातील सर्व जलस्त्रोत शुद्ध आणि स्वच्छ करण्याची ही मोहिम आहे. आपल्याला नदीचं स्वच्छ पाणी पिण्याची संधी मिळाली आणि त्यासाठी आपण स्वतःला भाग्यवान समजतो, अशी प्रतिक्रिया मान यांनी दिली होती. गुरु नानक देव ज्या नदीत स्नान करत असत, त्या नदीचं शुद्धीकरण होत असल्याचं पाहून समाधान वाटत असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली होती. आता मुख्यमंत्र्यांच्या पोटासंबंधी विकाराचं नेमकं कारण काय, ते लवकरच स्पष्ट होईल. मात्र त्यापूर्वीच या व्हिडिओशी त्यांच्या आजाराचा संबंध जोडला जाऊ लागला आहे.