PM Modi च्या सुरक्षेत त्रुटी हा रचलेला बनाव - सिद्धू

punjab congress chief navjot singh sidhu mocks pm modi security breach calls it a drama : पीएम मोदींच्या सुरक्षेतील त्रुटी हा रचलेला बनाव आहे; असे वक्तव्य पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवजोत सिंह सिद्धू यांनी केले. सिद्धू यांनी पंजाबमध्ये काल (बुधवार ५ जानेवारी २०२२) घडलेल्या घटनेबाबत बोलताना हे वक्तव्य केले.

sidhu mocks pm modi security breach calls it a drama
PM Modi च्या सुरक्षेत त्रुटी हा रचलेला बनाव - सिद्धू 
थोडं पण कामाचं
  • PM Modi च्या सुरक्षेत त्रुटी हा रचलेला बनाव - सिद्धू
  • कोणाकडून काय माहिती घेतली हे जाहीर न करता केले वक्तव्य
  • पंतप्रधानांच्या सुरक्षेत राहिलेली त्रुटी हा विषय चिघळला

punjab congress chief navjot singh sidhu mocks pm modi security breach calls it a drama : अमृतसर : पीएम मोदींच्या सुरक्षेतील त्रुटी हा रचलेला बनाव आहे; असे वक्तव्य पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवजोत सिंह सिद्धू यांनी केले. सिद्धू यांनी पंजाबमध्ये काल (बुधवार ५ जानेवारी २०२२) घडलेल्या घटनेबाबत बोलताना हे वक्तव्य केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काल (बुधवार ५ जानेवारी २०२२) पंजाबच्या दौऱ्यावर होते. ते भटिंडा विमानतळावरुन फिरोझपूर जिल्ह्यातील हुसैनीवाला येथे हुतात्मा स्मारकाला भेट देण्यासाठी जात होते. पंतप्रधानांचा ताफ जात असताना शेतकऱ्यांच्या एका गटाने आंदोलन करत ताफा अडवला. आंदोलक पंतप्रधान मोदी यांच्या वाहनांच्या दिशेने येऊ लागले. 

सुरक्षा रक्षकांनी पंतप्रधान मोदी असलेल्या वाहनाला चहूबाजूने घेरले. पुढील १५-२० मिनिटे ही परिस्थिती कायम होती. सुदैवाने या दरम्यान कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाही. पंतप्रधानांचा ताफा उड्डाणपुलावर अडकला असताना सुरक्षा रक्षकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना फोन केला. पण मुख्यमंत्र्यांनी फोन घेणे टाळले. हा प्रकार अतिशय संशयास्पद होता. यामुळे सावध झालेल्या अधिकाऱ्यांनी परिस्थितीचा अंदाज घेतला आणि योग्यवेळी कडेकोट बंदोबस्तात पंतप्रधानांच्या वाहनांचा ताफा भटिंडा विमानतळाच्या दिशेने परत वळवला. 

पंजाब पोलिसांनी परवानगी दिल्यानंतरच पंतप्रधान मोदींचा ताफा रस्तेमार्गाने जात होता. नियमानुसार पंतप्रधानांच्या वाहनांच्या ताफ्यासाठी रस्ता मोकळा करणे आणि सुरक्षित ठेवणे ही स्थानिक पोलिसांची जबाबदारी होती. पण त्यांच्याकडून जबाबदारीचे पालन करण्यात हलगर्जीपणा झाल्याचे प्रथमदर्शनी आढळले. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. ही चौकशी सुरू असतानाच पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवजोत सिंह सिद्धू यांनी 'पीएम मोदींच्या सुरक्षेतील त्रुटी हा रचलेला बनाव आहे'; असे वक्तव्य केले. 

विशेष म्हणजे पंजाब पोलिसांच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी केलेल्या पत्रव्यवहारात पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचा आणि शेतकरी आंदोलनाचा स्पष्ट उल्लेख आढळतो. आंदोलन होणार आहे यामुळे दौरा विना अडथळा पूर्ण व्हावा यासाठी पुरेशी खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. लेखी आदेशवजा सूचना असताना पोलिसांनी आंदोलकांना पंतप्रधानांच्या ताफ्यापासून दूर ठेवण्याचे काम केले नाही. पण या वास्तवाकडे सोयीस्कर डोळेझाक करुन सिद्धू यांनी 'पीएम मोदींच्या सुरक्षेतील त्रुटी हा रचलेला बनाव आहे'; असे वक्तव्य केले. हे वक्तव्य करताना त्यांनी नेमकी कोणाकडून काय माहिती घेतली हे जाहीर केलेले नाही. 

पंतप्रधानांच्या सुरक्षेत राहिलेली त्रुटी हा विषय चिघळला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी झालेल्या घटनेविषयी चिंता व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सरन्यायाधीश एन. व्ही. रामण्णा यांच्या खंडपीठासमोर पंतप्रधानांच्या सुरक्षेत राहिलेल्या त्रुटी प्रकरणी उद्या (शुक्रवार ७ जानेवारी २०२२) सुनावणी आहे. प्रकरण चिघळत असल्याचे पाहून पंजाब सरकारने एक समितीन स्थापन केली आहे. या समितीला तीन दिवसांत चौकशी करुन अहवाल देण्याचा आदेश देण्यात आला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने बुधवारीच चौकशी सुरू केली आहे. दोषींवर कठोर कारवाई करू; असे संकेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी