Punjab Assembly Election 2022 : नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने (Election Comission of India) पंजाब विधानसभा निवडणूक (Punjab Assembly Election 2022) पुढे ढकलली आहे. १४ फेब्रुवारी रोजी पंजाबमध्ये मतदान (voting) पार पाडणार होते. आता निवडणूक आयोगाने यात बदल करून २० फेब्रुवारीला मतदान होईल असे जाहीर केले आहे. पंजाबमध्ये ११७ विधानसभा मतदारसंघ (117 constituency) असून राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक पार पाडणार आहे. मुख्यमंत्री चन्नी (CM Charanjit Singh Channi) यांच्यासह अनेक राजकीय पक्षांनी (Political Parties) मतदानाची तारीख बदलावी अशी मागणी कीले होती. राज्यातील दलित (dalit) समाजातील नागरिक संत रविदास (saint ravidas) यांच्या जयंतीनिमित्त वाराणसीला (varanasi) जातात. १६ फेब्रुवारी रोजी संत रविदास यांची जयंती आहे, त्यामुळे काँग्रेस (congress) आणि भाजपने (bjp) मतदानाची तारीख बदलावी अशी मागणी केली आहे. आता आयोगाने २० फेब्रुवारी रोजी मतदान होईल असे जाहीर केले आहे. (Punjab elections postponed to February 20 in view of Guru Ravidas Jayanti)
Punjab Assembly election will be held on 20th February: ECI pic.twitter.com/rPJTAt0OEn — ANI (@ANI) January 17, 2022
पंजबामध्ये मुख्यमंत्री चन्नी यांच्यासह भाजप, बसपा आणि इतर काही राजकीय पक्षांनी मतदान पुढे ढकलण्याची मागणी केली होती. त्यावर आज निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आहे. आता पंजाब विधानसभा निवडणूक २० फेब्रुवारी रोजी एका टप्प्यात पार पडणार आहे. सोमवारी निवडणूक आयोगाची बैठ्क पार पाडली आणि त्यात हा निर्णय घेण्यात आला. सर्व पक्षांनी पत्र लिहून ही मागणी केली होती.
When a huge number of people make a demand which is related to their religion & the Election Commission of India listens to them, it becomes a decision that respects and honours the voice of the people: Punjab Congress president Navjot Singh Sidhu on Punjab polls postponed by ECI pic.twitter.com/4PRkLlp8FO — ANI (@ANI) January 17, 2022
भाजपने निवडणूक आयोगाच्या प्रमुखांना पत्र लिहून म्हटले होते की, पंजाबमध्ये गुरू रविदास यांना मानणारा मोठा वर्ग आहे. राज्यात अनुसूचित जमातीची लोकसंख्या ३२ टक्के इतकी आहे. वाराणसीत गुरू पर्व साजरा करण्यासाठी लाखोच्या संख्येत लोक तिथे जातात. अशा वेळी मतदनावार त्याचा प्रभाव पडू शकतो. त्यामुळे मतदानाची तारीख पुढे ढकलावी जेणेकरून हा समाज मतदानापासून वंचित राहणार नाही अशी मागणी भाजपने केली होती.