Free Electricity | पंजाब सरकार 1 जुलैपासून देणार मोफत 300 युनिट वीज

Punjab Electricity : पंजाबमधील भगवंत मान (Punjab CM Bhagwant Mann) यांच्या नेतृत्वाखालील आप सरकारने 1 जुलैपासून घरांना 300 युनिट मोफत वीज (Free electricity) देण्याची घोषणा केली आहे. राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाने शनिवारी विविध वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध केलेल्या जाहिरातींमध्ये ही घोषणा करण्यात आली होती. सध्या देशभरात वीजेचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे.

Punjab to give free electricity
पंजाबात मिळत मोफत वीज 
थोडं पण कामाचं
  • पंजाबातील आपचे सरकारचे वीजेसंदर्भात महत्त्वाचे पाऊल
  • पंजाबात नागरिकांना 300 युनिट वीज मोफत मिळणार, जाहीरनाम्यातील आश्वासनाची पूर्तता
  • सध्या देशातील विविध राज्यांमध्ये वीजेचा पुरवठा आणि वीज बिल हा मुद्दा ऐरणीवर आहे

Punjab government announcement on electricity : चंदीगढ  : पंजाबमधील भगवंत मान (Punjab CM Bhagwant Mann) यांच्या नेतृत्वाखालील आप सरकारने 1 जुलैपासून घरांना 300 युनिट मोफत वीज (Free electricity) देण्याची घोषणा केली आहे. राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाने शनिवारी विविध वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध केलेल्या जाहिरातींमध्ये ही घोषणा करण्यात आली होती. वीजेचा मुद्दा हा पंजाबमधील आप सरकारच्या ३० दिवसांच्या रिपोर्ट कार्डशी संबंधित आहे. (Punjab government announces free 300 units electricity from 1 July 2022)

अधिक वाचा : Cyber Crime: पाकिस्तान भारताविरूद्ध रचतोय षडयंत्र, शेजारील देश द्वेष पसरवण्यासाठी करतोय हे काम 

लवकरच अधिकृत घोषणा

शनिवार नंतर यासंदर्भात औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे. 300 युनिट मोफत वीज देणे हे पंजाब विधानसभा निवडणुकीतील आम आदमी पक्षाचे प्रमुख मतदान आश्वासन होते. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी गुरुवारी जालंधरमध्ये सांगितले होते की 16 एप्रिल रोजी “चांगली बातमी” जाहीर केली जाईल. पंजाबमध्ये शेती क्षेत्राला आधीच मोफत वीज पुरवली जाते. सर्व अनुसूचित जाती, मागास जाती आणि दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना 200 युनिट मोफत वीज पुरवली जाते.

अधिक वाचा : मध्य रेल्वे मुख्य मार्ग वाहतूक रविवारच्या वेळापत्रकाने सुरू

सध्या देशभरात वीजेचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. वीज निर्मिती, वीजेचे वितरण आणि वीजबिल यासंदर्भात विविध राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच उन्हाळ्यामुळे वीजेच्या मागणीत वाढ झाली आहे.

मुंबईकरांच्या वीजबिलात घट

मुंबईत वीजपुरवठा करणार्‍या टाटा आणि महावितरण या कंपन्यांनी वीजबील कमी केले आहे. टाटा कंपनीने आपल्या वीज दरात ४ टक्के तर महावितरणने आपल्या वीज दरात २ टक्क्यांनी घट केली आहे. हे दर आजपासून लागू झाले आहेत. जसजसा उन्हाळा जवळ येतो तसतशी ग्राहकांची विजेची मागणी वाढते. घरात पंखा, कूलर आणि एसीचा वापर वाढतो. उकाडा टाळण्यासाठी पंखा, कूलर किंवा एसीच्या वापरामुळे उन्हाळ्यात वीजबिल वाढते. परंतु टाटा आणि महावितरणने वीजदर कमी केल्याने सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

अधिक वाचा : रशियाकडून भारताला S-400च्या दुसऱ्या स्क्वाड्रनचा पुरवठा होणार

अदानीच्या दरात होणार वाढ

एकीकडे महावितरण आपल्या वीजदरात २ टक्के तर टाटा ४ टक्के कपात करत आहेत. तर बेस्टचे दर स्थिर असणार आहेत. अदानी कंपनीची वीज महागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अदानी कंपनीच्या वीजबिलात प्रति युनिट १ ते ६ पैश्यांनी वाढ होणार आहे, त्यामुळे अदानी कंपनीच्या ग्राहकांना ऐन उन्हाळ्यात वाढीव वीजबिलाचा शॉक बसू शकतो. १ एप्रिल पासून २०२२-२३ हे नवे आर्थिक वर्ष सुरू झाले आहे. या दिवसापासून अनेक छोटे मोठे आर्थिक बदल दिसणर आहेत. काही ठिकाणी सामान्य माणसांना दरवाढीचा झटका बसणार आहे. तसेच महाराष्ट्रात कोरोनाचे सर्व निर्बंध मागे घेतल्याने सर्व व्यवहार पूर्वीप्रमाणे सुरळीत होत आहेत.

वीजचोरी, वीजगळती आणि एकूणच वीजनिर्मिती आणि सध्या राज्यात असलेली वीजेची मागणी लक्षात घेता महाराष्ट्रात आगामी तीन महिन्यात लोड शेडिंग केली जाणार आहे. महावितरणने त्यासंदर्भातील जिल्हावार वेळापत्रकदेखील दिले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी