Punjab AAP Govt : पंजाबच्या आरोग्यमंत्र्यांना अटक: सरकारी टेंडरसाठी पंजाबच्या आरोग्यमंत्र्यांनी फिक्स केलं होतं 1% कमिशन

पंजाबमधील (Punjab ) आम आदमी पार्टीच्या (आप) (Aam Aadmi Party) सरकारचे आरोग्य मंत्री (Minister of Health) डॉक्टर विजय सिंगला (Dr. Vijay Singh) यांची मंत्रिमंडळातून (cabinet) हकालपट्टी झाली आहे. सिंगला यांच्यावर आरोग्य विभागातील (Department of Health) प्रत्येक काम व टेंडरच्या मोबदल्यात 1 टक्के कमिशनची मागणी केल्याचा आरोप आहे.

punjab  Health Minister's commission for tender
टेंडरसाठी आरोग्यमंत्र्यांचं 1 टक्का कमिशन, सीएम मान कडून हकालपट्टी   |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • आरोग्य विभागातील (Department of Health) प्रत्येक काम व टेंडरच्या मोबदल्यात 1 टक्के कमिशनची मागणी
  • हाकालपट्टी केल्यानंतर काही वेळातच पंजाब पोलिसांच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने सिंगला यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांची अटक
  • गुप्तणे या प्रकरणाची चौकशी करत मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मंत्रीमंडळातील नेत्यांची केली हाकलपट्टी

नवी दिल्ली : पंजाबमधील (Punjab ) आम आदमी पार्टीच्या (आप) (Aam Aadmi Party) सरकारचे आरोग्य मंत्री (Minister of Health) डॉक्टर विजय सिंगला (Dr. Vijay Singh) यांची मंत्रिमंडळातून (cabinet) हकालपट्टी झाली आहे. सिंगला यांच्यावर आरोग्य विभागातील (Department of Health) प्रत्येक काम व टेंडरच्या मोबदल्यात 1 टक्के कमिशनची मागणी केल्याचा आरोप आहे. सिंग कमीशन घेतल असल्याची तक्रार खुद्द मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यापर्यंत पोहोचली होती. त्यांनी गुप्तणे या प्रकरणाची चौकशी केली. अधिकाऱ्यांची विचारपूस करुन सिंगला यांना पाचारण केले. मंत्र्याने चूक मान्य केल्यानंतर त्यांची हकालपट्टी केली.

हाकालपट्टी केल्यानंतर काही वेळातच पंजाब पोलिसांच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने सिंगला यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांची अटक केली. आता त्यांची आम आदमी पार्टीतूनही हकालपट्टी करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. पंजाबचे आप प्रवक्ते मालविंदर कंग यांनी भ्रष्टाचाऱ्यांना पक्षात कोणतेही स्थान नसल्याचे स्पष्ट केले आहे. सिंगला यांनी या प्रकरणी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

सीएम मान यांनी सांगितली संपूर्ण कथा

सीएम भगवंत मान म्हणाले -'माझ्यापुढे एक प्रकरण आले. त्यात माझ्या सरकारचा एक मंत्री प्रत्येक निविदा किंवा त्या विभागाच्या खरेदी व्यवहारांत एक टक्के कमिशन मागत होता. या प्रकरणाची केवळ मला माहिती आहे. याची विरोधी पक्ष व माध्यमांना कोणतीही माहिती नाही. माझी इच्छा असती तर मी हे प्रकरण दाबून टाकले असते. पण, यामुळे जनतेचा विश्वासघात झाला असता. मी त्या मंत्र्याविरोधात कठोर कारवाई करत आहे. त्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करत आहे. मी या प्रकरणी पोलिसांनाही गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत.'

मान म्हणाले की, 'विरोधी पक्ष म्हणतील अवघ्या 2 महिन्यांतच माझ्या सरकारच्या एका मंत्र्याने भ्रष्टाचार केला. पण, अशा मंत्र्यांवर कठोर कारवाई करणारा मी एकमेव मुख्यमंत्री आहे. आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांना अवैध वाळू उत्खननात कुणाचा हात होता हे माहिती होते. पण, त्यानंतरही त्यांनी त्यांच्यावर कारवाई केली नाही. याउलट मी भ्रष्ट मंत्र्याची हकालपट्टी करण्यासह त्याच्यावर गुन्हाही दाखल करत आहे.'
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी