सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणात पंजाबी गायिका अफसाना खानची NIA कडून 5 तास चौकशी

moose wala murder case: मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील एका छाप्यामध्ये गायिका अफसाना खान NIAच्या रडारवर आली होती. त्यानंतर मंगळवारी अफसानाला एनआयएनं चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले. काल  5 तासांच्या चौकशीनंतर आज म्हणजे 26 ऑक्टोबरला देखील अफसानाची चौकशी केली जाणार आहे.

Moosewala murder case: Afsana Khan questioned for 5 hours by NIA
मूसेवाला हत्या प्रकरण: अफसाना खानची NIA कडून 5 तास चौकशी  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मूसेवाला खून प्रकरणाचा तपास एनआयए करत आहे.
  • मुंबईतील एका छाप्यामध्ये गायिका अफसाना खान NIAच्या रडारवर आली होती.
  • सिद्धू मूसेवाला हा अफसाना खानकडून राखी बांधत होता. दोघांनी अनेक पंजाबी हिट गाणी गायली आहेत.

sidhu moose wala murder case: पंजाबी गायक (Punjabi singer) सिद्धू मूसेवाला (moose wala)हत्याप्रकरणात (murder case) मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात बिग बॉस फेम (bigg boss fame)आणि पंजाबी गायिका (punjabi singer)अफसाना खानला(Afsana Khan)एनआयए (NIA)ने समन्स बजावून तिची तब्बल 5 तास चौकशी केली. आज परत तिला चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे.दरम्यान  
अफसाना खानची बंबीहा टोळीशी जवळीक असल्याचं लॉरेन्स टोळी आणि हत्येतील इतर आरोपींनी सांगितलं आहे. (Punjabi singer Afsana Khan interrogated for 5 hours in Sidhu Moosewala case) 

अधिक वाचा  : सूर्यग्रहणाच्या बाबतीत 1300 वर्षांनंतर आला आहे हा योग

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील एका छाप्यामध्ये गायिका अफसाना खान NIAच्या रडारवर आली होती. त्यानंतर मंगळवारी अफसानाला एनआयएनं चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले. काल  5 तासांच्या चौकशीनंतर आज म्हणजे 26 ऑक्टोबरला देखील अफसानाची चौकशी केली जाणार आहे. अफसानाचा बंबीहा टोळीशी काय संबंध आणि अफसानाची बंबीहा टोळीशी कधी आणि कधी बोलणी झाली, या सर्व गोष्टींवर तपास यंत्रणा काम करत आहेत.

अधिक वाचा  : दिवाळीच्या दिवशीही सुटी न घेता काम करणार अधिकारी कर्मचारी

NIAच्या टीमनं सिद्धू मूसेवाला प्रकरणात सामील असलेल्या गँगस्टरसंदर्भात माहिती मिळवली आहे. या माहितीमध्ये सिंगर अफसाना खानचा सिद्धूच्या हत्याप्रकरणात महत्त्वाची भूमिका असू शकते असा संशय आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने अफसाना खानला याच प्रकरणी समन्स बजावले होते. याप्रकरणी अफसानाची 5 तास चौकशी करण्यात आली आहे.बंबीहा गँगही लॉरेंस बिश्नोई गँगचा प्रतिस्पर्धी आहे. यात बिश्नोई गँगला सिद्धू मूसेवाला हा बंबीहा गँगच्या जवळचा माणूस आहे असा संशय होता. त्यामुळेच त्यांनी सिद्धू मूसेवालाची हत्या केल्याचं म्हटलं जात आहे.

अधिक वाचा  : मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी 'नाराज' आमदारांना मिळणार गिफ्ट?

अफसाना खान ही  बंबीहा गँगच्या जवळील व्यक्ती आहे, ती पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याच्याही जवळची होती. मूसेवालाला ती आपला भाऊ मानत होती. याच नात्यातून सिद्धू मूसेवाला हा अफसाना खानकडून राखी बांधत होता. दोघांनी अनेक पंजाबी हिट गाणी गायली आहेत. दोघांनी आजवर एकमेकांबरोबर अनेक कार्यक्रमातही काम केलं आहेत. अफसाना सिद्धू मूसेवालाला पूर्णपणे ओळखत होती, असं म्हटलं जात आहे. मूसेवाला हत्याकांडात अफसानाचा हात असण्याची शक्यता एनआयएला आहे.


 
सिद्धू मुसेवाला खून प्रकरणात यापूर्वीही मानसा पोलिसांनी अफसाना खानला चौकशीसाठी नोटीस दिली होती. पण तेव्हा ती गायिका कुठेतरी बाहेर होती. दरम्यान मूसेवालाच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दिली होती की, यात असं म्हटलं होतं की, मूसेवालाचे गाणे चोरले गेले होते. यात काही गायकांवर त्यांनी संशय व्यक्त केला होता, तर काही म्युझिक इंडस्ट्रीशी संबंधित कंपन्यांचे नाव घेण्यात आले होते.याआधी 12 सप्टेंबरला एनआयएने 50 जागांवरती छापा टाकला होता. तसेच पुढील तपास कार्यात तपास यंत्रणा अफसाना खानचे बँक रिकॉर्ड देखील तपासणार आहे.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खानशी आणि आर्मेनिया येथील लकी गौरव पटियाल, सुखप्रीत सिंह बुड्डायांचे बंबिहा गँगाच्या सदस्यांशी असलेल्या संबंधाविषयी चौकशी केली जाईल. 
 


 दरम्यान, मूसेवाला खून प्रकरणाचा तपास एनआयए करत आहे. हत्येशी संबंधित गुंडांवर सातत्याने छापे टाकले जात आहेत. एनआयएने बिश्नोई, बांबिहा आणि रिंडा टोळीच्या सदस्यांसह अनेक वॉन्टेड गुंडांवर सहाहून अधिक गुन्हे दाखल केले आहेत. एजन्सीने गेल्या आठवड्यात चार राज्यांमधील 52 हून अधिक ठिकाणांचा शोध घेतला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी