Punjabi Singer Siddhu Moosewala shot dead : आम आदमी पक्षाची सत्ता असलेल्या पंजाबमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. पंजाब सरकारने ४२५ जणांना दिलेले संरक्षण काढून घेण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अंमलात आला आणि पंजाबमध्ये एका गायकाची गुंडांनी हत्या केली. गायकाला आधी पंजाब सरकारने संरक्षण दिले होते. हे संरक्षण काढून घेण्यात आले आणि गुंडांनी गायकावर गोळीबार केला. गोळीबारात पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याचा मृत्यू झाला. गायकासोबत असलेले दोन जण गंभीर जखमी झाले. दोघांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याच्यावर मानसातील जवाहर गावात गोळीबार झाला. गायक कारमधून प्रवास करत होता. तो स्वतः कार चालवत होता. याच वेळी समोरून एक काळ्या रंगाची कार आली. या कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी नेम धरून सिद्धू मूसेवाला याच्या कारवर गोळीबार केला. मोठ्या प्रमाणावर गोळीबार झाला. एकट्या सिद्धू मूसेवाला याच्यावर ३० फैरी झाडण्यात आल्या.
सिद्धू मूसेवाला याला धमक्या येत होत्या. जिवाला धोका होता म्हणूनच सिद्धू मूसेवाला याला संरक्षण देण्याचा निर्णय झाला होता. पण पंजाबच्या आम आदमी पक्षाच्या सरकारने सिद्धू मूसेवाला आणि आणखी ४२४ जण अशा एकूण ४२५ जणांचे संरक्षण काढून घेतले. संरक्षण काढून घेण्याचा निर्णय अंमलात आला आणि नंतर गोळीबाराची घटना घडली. गोळीबारात पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याचा मृत्यू झाला. यामुळे पंजाब सरकारने कोणत्या माहितीच्या आधारे संरक्षण काढून घेण्याचा निर्णय घेतला असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राजकीय विरोधकांकडून पंजाबच्या आम आदमी पक्षाच्या सरकारच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याच्या हत्येचे वृत्त कळताच शोक व्यक्त केला. गायकाच्या हत्येने धक्का बसला अशा शब्दात त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.