Woman Suicide : पंजाबी महिलेची अमेरिकेत आत्महत्या, मरण्यापूर्वी रेकॉर्ड केला ‘हा’ व्हिडिओ

घरगुती हिंसाचाराला वैतागून मूळच्या उत्तरप्रदेशातील असणाऱ्या एका पंजाबी महिलेने अमेरिकेत आत्महत्या केली. त्यापूर्वी तिने एक व्हिडिओ तयार करत आपल्या वेदना सांगितल्या.

Woman Suicide
पंबाजी महिलेची अमेरिकेत आत्महत्या  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • पंजाबी महिलेची अमेरिकेत आत्महत्या
  • घरगुती हिंसाचाराला कंटाळून दिला जीव
  • आत्महत्येपूर्वी रेकॉर्ड केला व्हिडिओ

Woman Suicide : अमेरिकेत (America) राहणाऱ्या एका पंजाबी महिलेनं (Punjabi Woman) आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या महिलेचं कुटुंब उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बिजनौरमधलं. काही वर्षांपूर्वी कामानिमित्त हे कुटुंब अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये (Newyork) स्थलांतरीत झालं होतं. घरगुती हिंसाचारामुळे वैतागलेल्या महिलेनं आपली जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतला. या घटनेमुळे अमेरिकेत आणि भारतात दोन्हीकडे खळबळ उडाली असून या प्रकऱणी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी महिलेनं एक व्हिडिओ रेकॉर्ड करून आपल्या व्यथा मांडल्याचं सांगितलं जात आहे. तिचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून आत्महत्येच्या काही वेळापूर्वीच तो रेकॉर्ड केला असल्याचं सांगितलं जात आहे. 

आठ वर्षांपूर्वी लग्न

मनदीप कौर नावाच्या या महिलेचं आठ वर्षांपूर्वी रंजोध नावाच्या व्यक्तीसोबत लग्न झालं होतं. लग्नानंतर पहिली दोन वर्षं हे जोडपं उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्येच राहत होतं. या काळात मनदीपनं एका मुलीला जन्म दिला. पहिली मुलगी झाल्यामुळे नाराज असलेल्या रंजोधनं आणि त्याच्या कुटुंबीयांनी मनदीपला त्रास देण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना दुसरा मुलगा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र दुसऱ्यांदाही मुलगी झाल्यानंतर मनदीपला तिच्या सासरच्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली. 

कुटुंब गेलं अमेरिकेला

दरम्यान, रंजोधला अमेरिकेत ट्रक चालक म्हणून नोकरी मिळाली आणि हे कुटुंब अमेरिकेला स्थायिक झालं. मात्र देश बदलला तरी परिस्थिती तिच राहिली. रंजोध आणि त्याच्या कुटुंबीयांकडून मनदीपला त्रास देण्याचा सिलसिला सुरूच राहिला. सतत मारहाण करणे, शिविगाळ करणे यासारखे प्रकार असह्य झाल्यामुळे मनदीपने अखेर आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. 

अधिक वाचा - Special Wedding : रशियाचा ‘तो’ आणि युक्रेनची ‘ती’ भारतात येऊन झाले ‘एक’, युद्धावर केली प्रेमाने मात

रेकॉर्ड केला व्हिडिओ

मनदीपचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ तिने मरण्याअगोदर काही वेळच रेकॉर्ड केला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यात आपल्यावर पतीकडून आणि सासरच्या मंडळींकडून कसा अत्याचार होत आहे, हे तिने सांगितलं आहे. आता आपल्याला जगण्याची अजिबात इच्छा नसून आपण आपली जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेत असल्याचे संकेत तिने या व्हिडिओतून दिले आहेत. 

अधिक वाचा - Man Carrying Python Video : खांद्यावर अजगर ठेवून खेचत होता माणूस, व्हिडीओ झाला व्हायरल

दोन्ही देशात गुन्हा दाखल

आपल्या मुलीचा हुंड्यापायी जीव घेतला गेल्याची तक्रार मनजितच्या वडिलांनी पोलिसांत दाखल केली आहे. तर अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्येही रंजोध आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आणि घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी