Ahilyabai Holkar: पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांविषयी 'हे' माहिती आहे का?

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांविषयी.....

punyashlok ahilyabai holkar who was ahilyabai holkar read unknown facts of her life
Ahilyabai Holkar: पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांविषयी 'हे' माहिती आहे का? 
थोडं पण कामाचं
 • Ahilyabai Holkar: पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांविषयी 'हे' माहिती आहे का?
 • अहिल्याबाईंच्या कार्यकाळात संपूर्ण मालवा (माळवा) प्रांताची वेगाने प्रगती
 • पती निधनानंतर त्याच्या मिळकतीवर पहिला हक्क पत्नीचा असेल असे जाहीर करुन हा निर्णय अंमलात आणला

Ahilyabai Holkar: पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांविषयी 'हे' माहिती आहे का?

punyashlok ahilyabai holkar who was ahilyabai holkar read unknown facts of her life

 1. जन्म - ३१ मे १७२५. चौंडी गाव, जामखेड तालुका, अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र
 2. अहिल्याबाईंचे वडील माणकोजी शिंदे मूळचे बीड जिल्ह्याचे होते. ते चौंडी गावाचे पाटील होते. वडील प्रगत विचारांचे असल्यामुळे अहिल्याबाईंना घरी लिहायला-वाचायला शिकवण्यात आले होते. 
 3. पेशव्यांचे सरदार आणि मालवा (माळवा) प्रांताचे जहागीरदार मल्हारराव होळकर पुण्याला जात असताना विश्रांतीसाठी एका ठिकाणी थांबले. तिथे जवळच असलेल्या मंदिरात आठ वर्षांच्या अहिल्याबाईंना मनोभावे पूजा करताना पाहून त्यांचे मन प्रसन्न झाले. मल्हाररावांनी अहिल्याबाईंच्या वडिलांशी चर्चा केली. काही दिवसांनी अहिल्याबाई आणि मल्हाररावांचे पुत्र खंडेराव होळकर यांचा विवाह झाला.
 4. अहिल्याबाईंचे लग्न १७३३ मध्ये झाले आणि त्यांना मुलगा १७४५ मध्ये झाला. या मुलाला मालेराव होळकर या नावाने सगळे ओळखू लागले. 
 5. खंडेरावांचे १९५४ मध्ये कुम्हेरच्या लढाईत तोफगोळा लागून निधन झाले. पण पतीसोबत सती जाण्यास अहिल्याबाईंनी नकार दिला. त्यांनी सतीप्रथेला विरोध केला. मल्हाररावांनी अहिल्याबाईंना पाठिंबा दिला.
 6. खंडेरावांच्या पश्चात मल्हाररावांनी अहिल्याबाईंना राजकारणात सक्रीय केले. त्यांची हुशारी आणि शौर्य पाहून त्यांना युद्धकलेचे प्रशिक्षण दिले. पण मुलापाठोपाठ बारा वर्षांनंतर मल्हाररावांचे १७६६ मध्ये निधन झाले.
 7. मल्हाररावांच्या निधनानंतर अहिल्याबाईंनी मालवा (माळवा) प्रांताच्या कारभाराचा जबाबदारी द्यावी अशी विनंती पेशव्यांकडे केली. पेशव्यांनी ही विनंती मान्य केली. 
 8. अहिल्याबाईंच्या कार्यकाळात संपूर्ण मालवा (माळवा) प्रांताची वेगाने प्रगती झाली. पाण्याच्या नियोजनासाठी अहिल्याबाईंच्या कार्यकाळात मोठे काम झाले. तलाव, विहिरी, घाट, नदीला योग्य प्रकारे बांध घालणे अशी अनेक कामे झाली. उत्तम रस्ते, भक्कम किल्ले, दर्जेदार आरोग्य सुविधांची निर्मिती तसेच कला-संस्कृतीच्या विकासाला चालना देणे अशी कामेही अहिल्याबाईंच्या कार्यकाळात वेगाने झाली. अहिल्याबाईंनी देणग्या देऊन मालवा (माळवा) प्रांतात तसेच भारतातील अनेक तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी मंदिरे, धर्मशाळा यांचेही मोठ्या प्रमाणावर बांधकाम केले. इंदूर या खेड्याचे विकसित शहरात रुपांतर करण्याचे काम त्यांच्याच काळात झाले. पडदा पद्धतीला विरोध आणि दररोज दरबार भरवून जनतेचे म्हणणे ऐकून तातडीने प्रश्न सोडवणे ही अहिल्याबाईंच्या कामाची खास पद्धत होती. त्यांनी पती निधनानंतर त्याच्या मिळकतीवर पहिला हक्क पत्नीचा असेल असे जाहीर करुन हा निर्णय प्रांतात अंमलात आणला. विधवेला मुल दत्तक घेण्याचा अधिकार मिळवून दिला. मुलीचा आंतरजातीय विवाह करून स्वत:च्या घरापासून सुधारणेला सुरूवात केली. हुंडा बंदी, विनाकारण वृक्षतोड करण्याला तसेच जंगलतोडीला बंदी घालण्यासारखे मोठे निर्णय घेतले आणि अंमलात आणले. संपूर्ण प्रांतात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली. यामुळे अहिल्याबाईंविषयी लोकांच्या मनात आदराची भावना निर्माण झाली. अहिल्याबाईंचे १३ ऑगस्ट १७९५ मध्ये निधन झाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी