नवी दिल्ली : दिल्लीतील (Delhi) कुतुबमिनारच्या (Qutub Minar) मशिदीबाबत वाद वाढू लागला आहे. येथे दोन मशिदी आहेत - पहिली , कुव्वत उल इस्लाम मशीद (Qawwat ul Islam Masjid) तर दुसरी मुघल मशीद.(Mughal Mosque) दरम्यान, या महिन्यात मुघल मशिदीत नमाज पढण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर कुव्वत-उल-इस्लाम मशिदीमध्ये देवी-देवतांच्या मूर्ती असल्याचा दावा केला जात असून येथे पूजा करण्याची मागणी करण्यात आली आहे. दोन्ही मशिदींची प्रकरणे वेगळी आहेत, कुव्वत-उल-इस्लाम मशिदीत प्रार्थना होत नाही, फक्त मुघल मशिदीत नमाज अदा केली जात होती, ज्यावर सध्या बंदी घालण्यात आली आहे. सध्या न्यायालयात कुव्वत-उल-इस्लाम मशिदीचा वाद सुरू आहे.
कुव्वत-उल-इस्लाम मशीद प्रकरणी मंगळवारी दिल्लीच्या साकेत कोर्टात सुनावणी झाली. हिंदू बाजूने दाखल केलेल्या याचिकेत असे म्हटले आहे की, कुतुबमिनार संकुलात ऐबकने २७ मंदिरे उद्ध्वस्त करून कुव्वत-उल-इस्लामची स्थापना केली होती.
ही मशीद देव-देवतांच्या मूर्ती तोडून बांधण्यात आली आहे, त्यामुळे आम्हाला तेथे पूजा करण्याचा अधिकार देण्यात यावा, असा युक्तिवाद हिंदू बाजूच्या वतीने न्यायालयात सुनावणीदरम्यान करण्यात आला. त्याचवेळी आम्हाला कोणतेही मंदिर बांधायचे नाही, तर तिथे पूजा करण्याचा अधिकार हवा आहे, असे हिंदूंच्या बाजूने सांगण्यात आले आहे. हिंदू बाजूच्या बाजूने असा दावाही करण्यात आला आहे की, कुतुबमिनार परिसरात श्री गणेश, विष्णू आणि यक्ष यांच्यासह हिंदू देवता आणि देवतांच्या स्पष्ट प्रतिमा आणि मंदिराच्या विहिरीजवळ कलश आणि पवित्र कमळ यांसारखी अनेक चिन्हे आहेत. जे ही इमारत हिंदू वंशाची असल्याचं दर्शवत आहे.
त्याचवेळी न्यायाधीशांनी हिंदू पक्षकारांना विचारले की, तुम्ही कोणत्या कायद्यानुसार येथे पूजेचा अधिकार मागत आहात?
अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश निखिल चोप्रा यांनी याचिकाकर्त्यांचे वकील हरिशंकर जैन यांना विचारले की,-
तुम्हाला न्यायालयाकडून कोणता दिलासा हवा? तुम्हाला परिसराचे स्वरूप बदलायचे आहे का?