भारताचे राफेल चीनच्या जे२०पेक्षा सरस

rafale is superior than china j20 भारताची राफेल विमानं चीनच्या जे२० पेक्षा कैकपटीने सरस

rafale is superior than china j20
भारताचे राफेल चीनच्या जे२०पेक्षा सरस 

थोडं पण कामाचं

  • भारताचे राफेल चीनच्या जे२०पेक्षा सरस
  • जे २० विमानांचे चीनच्या ग्लोबल टाइम्समधून जाहीर कौतुक
  • राफेल आणि जे एफ मालिकेतील विमानांची तुलना

नवी दिल्ली: फ्रान्समधून (France) भारतात (India) दाखल झालेली राफेल (Rafale multirole fighter aircraft) ही पाच लढाऊ विमानं गेम चेंजर आहेत. भारताची राफेल विमानं चीनच्या (China) जे२० पेक्षा (Chengdu J-20 fighter aircraft) कैकपटीने सरस (rafale is superior than china j20) आहेत. 

राफेल भारतात दाखल झाल्यानंतर चीनच्या ग्लोबल टाइम्समध्ये एका लष्करी तज्ज्ञाने जे २० विमानं राफेलपेक्षा उत्तम असल्याचा दावा केला. हा दावा सपशेल फेटाळत भारताचे माजी हवाई दल प्रमुख माजी एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ यांनी ठोस उदाहरणं दिली. धनोआ यांच्या उत्तरानंतर चीनच्या तोंडाला कुलूप लागले आहे. अद्याप धनोआ यांनी दिलेल्या उत्तराला प्रत्युत्तर देण्याची हिंमत चीनने केलेली नाही. 

ज्यावेळी भारताने पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक केला त्यावेळी पाकिस्तानकडे चीनची जे एफ १७ विमानं (JF-17 Thunder) होती. भारताच्या मिग विमानांचा सामना करण्यासाठी ही विमानं पाठवण्याऐवजी पाकिस्तानने एफ १६ विमानांच्या मदतीने लढण्याचा निर्णय घेतला. चीनचा मित्र म्हणवणाऱ्या पाकिस्तानचा चिनी विमानांवर विश्वास नाही, मग जगाने या विमानांच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे का, असा प्रश्न धनोआ यांनी उपस्थित केला. 

जे २० रडारवर स्वतःचे अस्तित्व सुस्पष्टपणे दाखवून देते. आजच्या काळात रडारपासून जास्तीत जास्त लपणे आवश्यक आहे. मात्र चीनचे विमान या सर्वात महत्त्वाच्या कामात अयशस्वी ठरते. राफेलच्या वैमानिकाला विमान चालवाताना जे २० विमानातील रडारवर सहज दिसू शकते. अशा परिस्थितीत आकस्मिक हल्ला करुन प्रभावी ठरणे चीनच्या जे २० विमानांना अशक्य आहे. 

जमिनीवरच्या रडारवर जे २० सहज दिसू शकते. अशा परिस्थितीत लांब पल्ल्याच्या विमानवेधी क्षेपणास्त्रांच्या मदतीने जे २० वर हल्ला करणे शक्य आहे. टप्प्यात येताच जे २० पाडून टाकणे शक्य आहे. 

चीनच्या जे २० विमानाला इंजिनमध्ये इंधन न जाळता आजही आवाजापेक्षा जास्त वेगाने उड्डाण करता येत नाही. या उलट राफेलसह भारताच्या हवाई दलातील विमानं इंजिनमध्ये इंधन न जाळता आवाजापेक्षा जास्त वेगाने उड्डाण करण्यासाठी सक्षम आहेत. यामुळे वेगाच्या जोरावर भारताची लढाऊ विमानं चीनच्या जे २० या लढाऊ विमानावर मात करू शकतात. तसेच क्षेपणास्त्रांना प्रभावीरित्या चकवू शकतात, असे धनोआ यांनी सांगितले. 

आकाशातील हालचालींचा वेध घेणारी अॅवॅक्स (AWACS) प्रकारची दोन मोठ्या क्षमतेची रडार पाकिस्तानकडे आहेत. यातील एक चिनी आणि एक स्वीडनचे आहे. भारत-पाकिस्तान सीमेजवळ पाकिस्तातानने स्वीडनचे अॅवॅक्स सज्ज ठेवले आहे आणि अफगाणिस्तान सीमेजवळ पाकिस्तानने चिनी बनावटीची अॅवॅक्स ठेवले आहे. यातून चिनी उत्पादनांबाबत पाकिस्तानमध्ये असलेला विश्वास उघड झाल्याचे धनोआ म्हणाले. त्यांनी चिनी उत्पादनांच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित केले.

भारताकडे पाचव्या पिढीचे आधुनिक राफेल आहे. अंबाला विमानतळावरुन राफेल उड्डाणानंतर ५ मिनिटांच्या आत पाकिस्तान अथवा चीनच्या हवाई हद्दीत प्रवेश करुन धुमाकूळ माजवण्यासाठी सक्षम असल्याचे धनोआ म्हणाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी