Rahul-Priyanka Gandhi यांचा हा व्हिडीओ पाहिला नसेल तर एका पहाच...

गांधी भावा-बहिणीने श्रीनगरमधील भारत जोडो यात्रेच्या शेवटच्या टप्प्यात स्नोबॉल खेळाचा आनंद लुटताना एक हृदयस्पर्शी क्षण शेअर केला.

Rahul and Priyanka Gandhi snowball fight video
Rahul-Priyanka Gandhi यांचा हा व्हिडीओ पाहून म्हणाल, भावाबहिणीचं प्रेम असावं तर असं...  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भावाबहिणीच्या प्रेमाचा हृदयस्पर्शी क्षण
  • भारत जोडो यात्रेच्या शेवटच्या टप्प्यात
  • श्रीनगरमध्ये राहुल - प्रियांका गांधी यांनी स्नोबॉल खेळाचा आनंद लुटला

श्रीनगर : काँग्रेस नेते राहुल गांधी हे त्यांची बहीण प्रियंका गांधी यांच्याबद्दलचे प्रेम जाहीरपणे व्यक्त करण्यापासून कधीच कचरत नाहीत. राहुल गांधी अनेकदा त्यांच्या बहिणींसोबत हृदयस्पर्शी क्षण शेअर करतात ज्यांचे सर्वांकडून कौतुक होते.

अधिक वाचा : Bageshwar Baba यांच वादग्रस्त वक्तव्य पण..., तुकाराम महाराजांच्या वंशजांनी दाखवला मनाचा मोठेपणा

श्रीनगरमधील भारत जोडो यात्रेच्या शेवटच्या टप्प्यात भाऊ-बहीण जोडीतील असाच एक आनंदाचा क्षण कॅमेरात कैद झाला. श्रीनगरमधील भारत जोडो यात्रेच्या शेवटच्या टप्प्यात स्नोबॉलच्या खेळाचा आनंद घेत असताना गांधी भावंडांनी एक हृदयस्पर्शी क्षण शेअर केला.

अधिक वाचा : Horoscope 31 January 2023 : शनीच्या अस्तामुळे मेष आणि कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य


राहुल गांधींनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दोघे स्नोबॉल फाईटचा आनंद घेताना दिसत आहेत. त्यांच्या आनंदाच्या क्षणाची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, युजर्सच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.
प्रियांका गांधी शनिवारी काश्मीरमधील भारत जोडो यात्रेच्या शेवटच्या टप्प्यात आपल्या भावासोबत सामील झाल्या होत्या. 

अधिक वाचा : Omraje Nimbalkar : आमच्याकडे भक्कम पुरावे मात्र निर्णयाबाबत निवडणूक आयोग विवंचनेत - खासदार ओमराजे निंबाळकर 

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सोमवारी श्रीनगरमध्ये जोरदार बर्फवृष्टीमध्ये संपली. त्याची सुरुवात १४५ दिवसांपूर्वी कन्याकुमारी येथून ७ सप्टेंबर रोजी झाली होती. शेर-ए-काश्मीर स्टेडियममध्ये समारोप समारंभात राहुल यांनी 35 मिनिटांचे भाषण केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि आरएसएसचा दोनदा उल्लेख करत भाजपवर हल्ला चढवला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी