Jammu Kashmir Target Killings | भाजपसाठी काश्मीर ही फक्त सत्तेची शिडी, राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

जम्मू काश्मीरमध्ये कर्तव्यावर असणाऱ्या बँक मॅनेजरची दहशतवाद्यांनी हत्या केली. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरू असलेलं हत्यासत्र रोखण्यात अपयश येत असल्यामुळे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

Jammu Kashmir Target Killings
काश्मीर ही भाजपसाठी सत्तेची पायरी - राहुल गांधी  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • दहशतवाद्यांकडून बँक मॅनेजरची हत्या
  • काश्मीर ही भाजपसाठी सत्तेची पायरी - राहुल गांधी
  • हत्येचा निषेध करणं रोजचंच झालं आहे - ओमर अब्दुल्ला

Jammu Kashmir Target Killings | जम्मू काश्मीरमध्ये गुरुवारी (२ जून) दहशतवाद्यांनी (Terrorist) केलेल्या हल्ल्यात बँक मॅनेजरचा (Bank Manager) मृत्यू (Death) झाला. या घटनेवरून आता जोरदार राजकारण (Politics) सुरू झालं असून काँग्रेस खासदार राहुल गांधी (Congress MP Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेससह एमआयएमचे अध्यक्ष असादुद्दीन ओवेसी यांनीदेखील भाजपवर टीका केली आहे. ज्यांनी काश्मिरी पंडितांचं संरक्षण करायचं ते एका सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत, असा टोला ओवेसी यांनी लगावला आहे. 

अशी झाली हत्या

मूळचे राजस्थानच्या हनुमानगढचे असणारे विजय कुमार काही दिवसांपूर्वीच जम्मू काश्मीरच्या कुलगाममधील शाखेत रुजू झाले होते. यापूर्वी ते केंद्र सरकार, जम्मू काश्मीर प्रशासन आणि स्टेट बँक ऑफ इंडियामार्फत चालवण्यात येणाऱ्या बँकेच्या कोकरनाग शाखेत कार्यरत होते. कुलगाम शाखेत ते नेहमीप्रमाणे काम करत असताना अचानक दहशतवाद्यांनी बँकेवर हल्ला केला. यावेळी बँकेत त्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात विजय कुमार शहीद झाले. त्यानंतर या परिसराची नाकाबंदी करण्यात आली असून दहशतवाद्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.

भाजपसाठी काश्मीर ही सत्तेची शिडी

कधी बँक कर्मचारी, कधी शिक्षक तर कधी इतर निष्पाप नागरिकांच्या हत्येचं सत्र कधी थांबणार, असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. भाजपसाठी काश्मीर ही फक्त सत्तेसाठी वापरण्याची शिडी असून प्रत्यक्ष काश्मिरी पंडितांच्या प्रश्नावर सरकार उदासीन असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. एका सिनेमाचं प्रमोशन करण्याऐवजी काश्मिरी पंडितांच्या खऱ्या प्रश्नाकडे सरकारनं लक्ष द्यावं, असं आवाहन राहुल गांधींनी केलं आहे. 

रोजच होतायत हत्या

गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवाद्यांनी डोकं वर काढलं आहे. 31 मे रोजी जम्मूच्या सांबा जिल्ह्यातील हिंदू शिक्षिका रजनी बाला यांची कुलगाम जिल्ह्यातील गोपालपूरमध्ये गोळ्या झाडून हत्या कऱण्यात आली होती. तर 12 मे रोजी बडगाम जिल्ह्यातील चदुरा तहसीलदार कार्यालयात राहुल भट नावाच्या नागरिकाची हत्या कऱण्यात आली होती. काश्मीरमध्ये गेल्या महिन्याभरात वेगवेगळ्या परिसरात एकूण 8 जणांची दहशतवाद्यांनी हत्या केली आहे. यामध्ये पाच नागरिक आणि तीन पोलिसांचा समावेश आहे. हे पोलीस कर्मचारी कर्तव्यावर नसताना त्यांची हत्या करण्यात आली. 

ओमर अब्दुलांची टीका

नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनीही विजय कुमार यांच्या हत्येचा निषेध केला आहे.

“विजय कुमार यांच्या हत्येची घटना अस्वस्थ करणारी आहे. हल्ल्याचा निषेध करणं आणि मृत्यूचा शोक करण्यासाठी ट्विट करणं ही आता नित्याचीच बाब बनत चालली आहे. कुटुंबच्या कुटुंबं अशी उद्धवस्त होताना पाहणं वेदनादायी आहे”, असं ट्विट ओमर अब्दुल्ला यांनी केलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी