Rahul Gandhi disqualified from Lok Sabha: राहुल गांधींची खासदारकी रद्द 

Rahul Gandhi disqualified from Lok Sabha: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. 

Rahul Gandhi disqualified as a MP of Lok Sabha after his conviction in defamation case over his Modi surname
Rahul Gandhi disqualified from Lok Sabha: राहुल गांधींची खासदारकी रद्द   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राहुल गांधींची खासदारकी रद्द
  • राहुल गांधी यांना सूरत न्याायलयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर कारवाई
  • लोकसभा सचिवालयाची मोठी कारवाई

Rahul Gandhi disqualified from Lok Sabha: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. मोदी आडनावावरुन केलेल्या टिप्पणीबद्दल राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात सूरत न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आणि नंतर लगेचच जामीन सुद्धा मंजूर करण्यात आला. मात्र, दोन वर्षांची शिक्षा न्यायालयाने सुनावल्याने खासदारकी रद्द करण्यात आली आहे.

2019 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान मोदी आडनावावरुन केलेल्या वादग्रस्त विधानानंतर न्यायालयाने ही शिक्षा सुनावली होती. या प्रकरणात राहुल गांधी यांना आता जामीन मिळाला आहे. मात्र, पुढील 30 दिवसांत त्यांना हायकोर्टात या शिक्षेच्या विरुद्ध याचिका दाखल करावी लागेल.

हे पण वाचा : Rahul Gandhi: राहुच्या चक्रात अडकले राहुल गांधी, जाणून घ्या काय होईल पुढे...

राहुल गांधींना का सुनावली शिक्षा?

2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान प्रचार करताना राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरुन वादग्रस्त विधान केलं.

मोदी आडनावावरुन केलेलं वादग्रस्त विधान राहुल गांधी यांना भोवलं

कर्नाटकातील कोलारमधील सभेत राहुल गांधी यांनी वादग्रस्त विधान केलं होतं

गुजरातमधील भाजप आमदार पूर्णेस मोदी यांनी सूरतमध्ये या प्रकरणी तक्रार दाखल केली होती

आयपीसी कलम 504 अंतर्गत राहुल गांधींना दोषी ठरवण्यात आलं

त्यानंतर राहुल गांधी यांना तातडीने जामीन मंजूर झाला

आता हायकोर्टात जाण्यासाठी राहुल गांधी यांच्याकडे 30 दिवसांची मुदत 

दोन वर्षांची शिक्षा किंवा दोन वर्षांहून अधिकची शिक्षा न्यायालयाने सुनावली तर खासदार, विधानसभेचे सदस्यत्व रद्द होते. संविधानाच्या अनुच्छेद 102 (1) आणि 191 (1) नुसार हे सदस्यत्व रद्द करण्यात येते.

लोकप्रतिनिधी फौजदारी प्रकरणात दोषी आढळल्यास त्याची खासदारकी रद्द करण्यात येते.

राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्यावर काँग्रेस नेते आक्रमक

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्यानंतर राज्यातील काँग्रेस नेत्यांनी याचा निषेध केला आहे. भाजपला राहुल गांधी यांची भीती वाटत आहे त्यामुळे भाजपने आता लोकशाहीकडून दडपशाहीकडे वाटपाल केली आहे. राहुल गांधी यांच्यावर करण्यात आलेली कारवाई हा लोकशाहीवर हल्ला आहे असं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

उद्धव ठाकरे म्हणाले, राहुल गांधी यांची खासदारकी अखेर रद्द करण्यात आली. चोराला चोर म्हणणे हा आपल्या देशात गुन्हा ठरला आहे. चोर आणि देश लुटणारे आजही मोकळे आहेत आणि राहुल गांधी यांना शिक्षा ठोठावली गेली. लोकशाहीचे हे सरळ हत्याकांड आहे. सर्व सरकारी यंत्रणा दबावाखाली आहेत.  हुकूमशाहीच्या अंताची ही सुरुवात आहे. फक्त लढाईला दिशा द्यावी लागेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी