Rahul Gandhi Disqualified: राहुल गांधी यांना लोकसभा खासदार म्हणून अपात्र ठरवण्यात आलं आहे. यासंदर्भात ते आज सोमवारी सुरत येथील सत्र न्यायालयात त्यांच्या शिक्षेला आव्हान देणारी याचिका दाखल करणार आहेत. याप्रकरणी झालेल्या शिक्षेविरोधात राहुल यांनी 11 दिवसांनी सत्र न्यायालयात याचिका दाखल करत आहेत. तसेच ते नियमित जामिनासाठी न्यायालयात अर्जही दाखल करणार आहे. त्यांच्यासोबत प्रियंका गांधीही सुरतमध्ये असल्याची शक्यता आहे.
अधिक वाचा : Imagesद्वारे द्या महावीर जयंतीच्या शुभेच्छा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांच्यासोबत न्यायालयात अशोक गेहलोत (राजस्थान), भूपेश बघेल (छत्तीसगड) आणि सुखविंदर सिंह सुखू (हिमाचल प्रदेश) हे तीन राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित राहणार आहेत. तसेच काँग्रेसचे अनेक दिग्गज नेतेही सुरत न्यायालयात उपस्थित असणार आहेत. कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला आव्हान देण्यासाठी ते स्वत: सत्र न्यायालयात उपस्थित राहतील. सुरतचे मुख्य न्यायदंडाधिकारी एच. एच. वर्मा यांनी 23 मार्च रोजी राहुल गांधी यांना मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवलं आणि दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्याचवेळी राहुल यांना जामीन मंजूर करण्यात आला होता आणि शिक्षेविरोधात अपील करण्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली होती.
अधिक वाचा : मित्रांना,परिवाराला मराठीतून द्या महावीर जयंतीच्या शुभेच्छा
2019 मध्ये राहुल यांनी कर्नाटकातील कोलार येथे एका जाहीर सभेत मोदी आडनावावरून केलेल्या टिप्पणीनंतर भाजपच्या पूर्णेश मोदी यांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना खासदार म्हणून अपात्र ठरवण्यात आले.