Rahul Gandhi पुन्हा शुक्रवारी हाजीर हो! ED च्या विरोधात आंदोलन करणारे 240 काँग्रेस कार्यकर्ते ताब्यात

National Herald Case : नॅशनल हेराल्ड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काॅंग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांची सलग तिसऱ्या दिवशीही चौकशी केली.

Rahul Gandhi interrogated for 3 consecutive days, ED asked to come again on Friday, 240 Congress leaders in custody
Rahul Gandhi यांची सलग 3 दिवशीही चौकशी, 240 काँग्रेस कार्यकर्ते ताब्यात ।   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची चौकशी
  • सलग तीन दिवस ईडीकडून चौकशी
  • काॅंग्रेस नेते आणि कार्यकर्ते रस्त्यावर

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काॅंग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदारा राहुल गांधी आज सलग तिसऱ्या दिवशी चौकशीसाठी हजर झाले होते. सोमवारी राहुलची सुमारे 10 तास आणि मंगळवारी 10 तासांहून अधिक वेळ चौकशी करण्यात आली. ईडीशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे की, ईडीचे अधिकारी राहुलच्या उत्तरांनी समाधानी नाहीत. राहुल अगोदर तयारी करून आल्यासारखी उत्तरे देत आहेत. आता पुन्हा शुक्रवारी त्याची चौकशी होणार आहे.

अधिक वाचा : 

'त्यांची' सहमती असल्यास शरद पवार राष्ट्रपती पदाचे उमेदवार, ममता बॅनर्जींच्या बैठकीला 17 पक्षांची हजेरी
बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी चौकशी केल्यानंतर ईडीने आतापर्यंत राहुल गांधी यांची अनेक सत्रांमध्ये जवळपास 30 तास चौकशी केली आहे. अधिकार्‍यांनी सांगितले की, काँग्रेस खासदाराने गुरुवारसाठी सूट मागितली, त्याला परवानगी देण्यात आली. पहिल्या दोन दिवसांत राहुलची सुमारे सहा तास चौकशी करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 

राहुल गांधी यांच्या या चौकशीविरोधात काँग्रेसने आघाडी उघडली असून त्यांचे सर्व ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. सोमवार आणि मंगळवार या दोन्ही दिवशी काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी अकबर रोडवरील काँग्रेस मुख्यालय आणि त्यापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या ईडीच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली.

अधिक वाचा : 

Lawrence Bishnoi: डी कंपनीसारखा बिश्नोई गँगला मुंबईत सुरू करायचा होता खंडणीचा धंदा - महाराष्ट्र गृह मंत्रालयाचा खुलासा

या भागात कलम 144 लागू असतानाही काँग्रेस नेत्यांनी जोरदार निदर्शने केली. या दोन दिवसांत दिल्ली पोलिसांनी परिसरात शांतता राखण्यासाठी 8-10 वरिष्ठ (काँग्रेस) नेत्यांसह सुमारे 240 लोकांना आज नवी दिल्ली परिसरातून ताब्यात घेण्यात आले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी