Rahul Gandhi Video : सत्याला बॅरिकेड लावू शकत नाही.. संसद परिसरात राहुल गांधींचे रौद्र रूप तर पहा

Rahul Gandhi News:काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज संसदेच्या आवारात नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल केला. आपण मोदींना घाबरत नसल्याचे ते म्हणाले. सत्य कठोरपणे दाबता येत नाही, असे ते म्हणाले. राहुल गांधी

Rahul Gandhi Video : Truth cannot be barricaded.. Look at Rahul Gandhi's angry look in Parliament area
Rahul Gandhi Video : सत्याला बॅरिकेड लावू शकत नाही.. संसद परिसरात राहुल गांधींचे रौद्र रूप तर पहा   |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • राहुल गांधी यांनी संसद भवनात पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला
  • कर्नाटक दौरा अर्ध्यावर सोडून राहुल दिल्लीत पोहोचले
  • ५ ऑगस्टला महागाई, बेरोजगारी आणि जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटीविरोधात निषेध

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी संसदेच्या आवारात प्रचंड संतप्त दिसल्या होत्या. आज राहुल गांधीही त्याच मनस्थितीत दिसले. संसदेच्या कॉरिडॉरमध्ये  राहुल गांधी यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना सोनियांनी काही दिवसांपूर्वी दिली होती तशीच उत्तरे दिली. ब-याच दिवसांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी इतके रागवलेले दिसत होते. त्यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल केला.(Rahul Gandhi Video : Truth cannot be barricaded.. Look at Rahul Gandhi's angry look in Parliament area)

अधिक वाचा : CCTV: १५ पुरुष घरात घुसले अन् महिलेला उचललं, अपहरणाचा थरार कॅमेऱ्यात कैद

कर्नाटक दौरा अर्ध्यावर सोडून राहुल गांधी दिल्लीत पोहोचले आणि आज संसद भवनात आले. संसदेच्या कॉरिडॉरमध्ये जोरात चालणारे राहुल गांधी संतापलेले दिसले. संसदेच्या कॉरिडॉरमध्ये पत्रकारांनी राहुल गांधी यांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली तेव्हा ते अतिशय कडक शब्दात उत्तर देताना म्हणाले की, मी मोदींना अजिबात घाबरत नाही. सत्य दडपता येत नाही, असे माजी काँग्रेस अध्यक्ष म्हणाले. त्यांनी पंतप्रधान मोदींपासून अमित शहांवरही टिका केली.

५ ऑगस्टला महागाई, बेरोजगारी आणि जीवनावश्यक वस्तूंवरील वाढत्या जीएसटीविरोधात काँग्रेसच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन कडक कारवाई करतेय का असे विचारण्यात आले. यावर राहुल म्हणाले, 'बढ़िया और करिए, सच्चाई को बैरिकेड नहीं किया जा सकता है।''

अधिक वाचा : SSC Scam: पार्थ चटर्जी आणि अर्पिता मुखर्जी यांच्या नात्याविषयी जगजाहीर झाली धक्कादायक माहिती

वाढती महागाई, बेरोजगारी आणि जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लागू केल्याच्या विरोधात काँग्रेस 5 ऑगस्ट रोजी दिल्लीत मोठ्या प्रमाणात आंदोलन करेल, राष्ट्रपती भवनावर मोर्चा काढेल आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानाचा घेराव करेल, असे काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांनी सांगितले. विशेष म्हणजे महागाईबाबत संसदेच्या कामकाजादरम्यान काँग्रेसने गदारोळ केला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी