Crime : एकत्र संपवल्या होत्या 3 पिढ्या, 7 खून करणाऱ्या रक्तपिपासू ड्रायव्हरला झाली फाशीची शिक्षा

Murder : एका भयानक खुन्याला 9 वर्षानंतर मृत्युदंडाची शिक्षा मिळाली आहे. गाझियाबादमध्ये 9 वर्षांपूर्वी झालेल्या हत्याकांडात न्यायाची प्रतीक्षा संपली आहे. या निर्घुण हत्याकांडामध्ये एका व्यावसायिकाच्या कुटुंबातील 7 जणांची हत्या (Murder)करण्यात आली होती. दरोड्याच्या इराद्याने संपूर्ण कुटुंबाची हत्या करणाऱ्या चालक राहुल वर्माला अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

Murder case
7 खून गुन्हेगाराला फाशीची शिक्षा  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • भयानक खुन्याला 9 वर्षानंतर मृत्युदंडाची शिक्षा मिळाली
  • निर्घुण हत्याकांडामध्ये एका व्यावसायिकाच्या कुटुंबातील 7 जणांची हत्या (Murder)करण्यात आली
  • पैशांसाठी ड्रायव्हरने केली मालकाच्या कुटुंबांची हत्या

Murderer got death sentence : नवी दिल्ली : एका भयानक खुन्याला 9 वर्षानंतर मृत्युदंडाची शिक्षा मिळाली आहे. गाझियाबादमध्ये 9 वर्षांपूर्वी झालेल्या हत्याकांडात न्यायाची प्रतीक्षा संपली आहे. या निर्घुण हत्याकांडामध्ये  एका व्यावसायिकाच्या कुटुंबातील 7 जणांची हत्या (Murder)करण्यात आली होती. दरोड्याच्या इराद्याने संपूर्ण कुटुंबाची हत्या करणाऱ्या चालक राहुल वर्माला अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयाने 50 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. कुटुंबातील 7 जणांची हत्या हा दुर्मिळ श्रेणीतील गुन्हा असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. (Rahul Verma gets death sentence in 7 murders case)

अधिक वाचा : Railway Station: स्टेशनसाठी रेल्वेची ब्लू प्रिंट तयार! मिनी मॉल, फूड कोर्ट, रेस्टॉरंट बांधणार...

न्यायालयाने शनिवारी राहुलला दोषी ठरवले आणि शिक्षेवरील युक्तिवादासाठी 1 ऑगस्टची तारीख निश्चित केली. 21 मे 2013 रोजी घंटाघर नई बस्ती परिसरात ही खळबळजनक घटना घडली होती. हे हत्याकांड करून व्यापारी सतीश गोयल यांचा चालक राहुल वर्मा हा लाखो रुपयांचे दागिने आणि रोकड घेऊन पळून गेला होता. तो जवळपास 9 वर्षांपासून डासना कारागृहात आहे.

कसे घडले होते हे भयानक हत्याकांड?

घंटाघर कोतवाली परिसरात 21 मे 2013 च्या रात्री एक खळबळजनक घटना घडली. घंटाघर नई बस्ती परिसरात राहणारे वृद्ध व्यापारी सतीश गोयल आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची चाकूने हत्या करण्यात आली. याप्रकरणी मयत व्यावसायिकाचे जावई सचिन मित्तल यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. मृतांमध्ये व्यापारी सतीश गोयल, त्यांची पत्नी मंजू गोयल, मुलगा सचिन गोयल, सून रेखा गोयल आणि तीन नातवंडांचा समावेश आहे.

अधिक वाचा : Uddhav Thackeray: 'मला संजय राऊताचा अभिमान, हा बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक', उद्धव ठाकरेंची भाजपवर तुफान टीका

आधी चोरी करून झाला होता फरार, परतल्यावर केले खून

या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि घटनेच्या 10 दिवसांनंतर, खळबळजनक खुनाच्या आरोपाखाली राहुल वर्माला 22 मे रोजी अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले. राहुलकडून पोलिसांनी सहा हजार रुपये रोख आणि लाखो रुपयांचे सोने-चांदीचे दागिने जप्त केले आहेत. दोन दिवसांनंतर, 24 मे रोजी कोतवाली पोलिसांनी मारेकरी राहुल वर्माला पोलिस कोठडीत घेतले आणि खुनात वापरलेला चाकू आणि रक्ताने माखलेले कपडेही जप्त केले. राहुल वर्मा हा व्यावसायिकाचा कार चालक होता. घटनेच्या सुमारे 15 दिवस आधी व्यापारी सतीश गोयल यांच्या घरातून 4.5 लाख रुपये चोरून राहुल फरार झाला होता. तेव्हापासून तो कामावर येत नव्हता.

अधिक वाचा : Rohit Pawar Tweet : राजकारणात सोडावंस वाटतंय, पण….! संजय राऊत अटकसत्र पाहून रोहित पवारांचं उद्विग्न ट्विट

25 लाखांची रोकड मिळवण्याच्या उद्देशाने केला गुन्हा 

पीडितेचे वकील देवराज सिंह यांनी सांगितले की, 22 मे 2013 रोजी सतीश चंद्र गोयल यांचे किडनी प्रत्यारोपण होणार होते. राहुलला याची जाणीव होती. किडनी प्रत्यारोपणासाठीच्या इलाजासाठी 25 ते 30 लाख रुपये घरात ठेवलेले असतील, असा अंदाज राहुलचा अंदाज होता. ही रक्कम राहुलला ताब्यात घ्यायची होती. याच उद्देशाने राहुलने 21 मेच्या रात्री हे हत्याकांड केले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी