Viral Video : रेल्वे कर्मचार्‍याची ही हातचलाखी पाहिली का ? पहा हा व्हायरल व्हिडीओ

Viral Video : तुम्ही आतापर्यंत अनेक जादूचे प्रयोग आणि हातचलाखी पाहिली असेल. परंतु एका सरकारी कर्मचार्‍याची हातचलाखी पाहिली नसेल. ही हात चलाखी कॅमेर्‍यात कैद झाली म्हणून या रेल्वे कर्मचार्‍याचा हा कारनामा सर्वांच्या समोर आलाय.

थोडं पण कामाचं
  • तुम्ही आतापर्यंत अनेक जादूचे प्रयोग आणि हातचलाखी पाहिली असेल.
  • परंतु एका सरकारी कर्मचार्‍याची हातचलाखी पाहिली नसेल.
  • ही हात चलाखी कॅमेर्‍यात कैद झाली म्हणून या रेल्वे कर्मचार्‍याचा हा कारनामा सर्वांच्या समोर आलाय.

Viral Video : नवी दिल्ली : तुम्ही आतापर्यंत अनेक जादूचे प्रयोग आणि हातचलाखी पाहिली असेल. परंतु एका सरकारी कर्मचार्‍याची हातचलाखी पाहिली नसेल. ही हात चलाखी कॅमेर्‍यात कैद झाली म्हणून या रेल्वे कर्मचार्‍याचा हा कारनामा सर्वांच्या समोर आलाय. (railway clerk cheating 500 rupees note change into 20 rupees note video viral)

ही घटना आहे दिल्लीची. २२ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकावर एक प्रवासी ग्वालियरचे तिकीट विकत घेत होता. प्रवाशाने तिकीट विक्री करणार्‍या रेल्वे कर्मचार्‍याला ५०० रुपयाची नोट दिली. तेव्हा या कर्मचार्‍याने हातचलाखीने ही पाचशे रुपयांची नोट बदलली आणि २० रुपयांची नोट ठेवली. ग्वालियरची तिकीट १२५ रुपये आहे असे सांगून या रेल्वे कर्मचार्‍याने प्रवाशाकडे पुन्हा १०० रुपये मागितले. परंतु प्रवासी हुशार होता. त्याने ही घटना कॅमेर्‍यात कैद केली आणि त्याची रीतसर तक्रार केली. 

ट्विटरवर रेल व्हिस्पर्स या अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करून तक्रार दाखल करण्यात आलीये. रेल्वे प्रशासनाने याची तातडीने दखल घेतली आणि या कर्मचार्‍याला निलंबीत केलंय.  तसेच या कर्मचार्‍यावर योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन रेल्वे प्रशासनाने दिलंय. 

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने अनेकांनी आपल्याबाबत असे झाल्याचे सांगितलंय. चेन्नईमध्ये असे प्रकार सर्रास घडतात अशी प्रतिक्रिया एका युजरने दिलीये. एका युजरने रांची रेल्वे स्थानकावर २०१२ साली आपण तिकीट काढताना अशीच फसवणूक झाल्याचे सांगितले. आपण सकाळी तिकीट काढत होतो आणि आपली झोप पूर्ण झाली नव्हती. तिकीट घेण्यासाठी आपण ५०० रुपये दिले परंतु त्या रेल्वे कर्मचार्‍याने आपण ५० रुपये दिल्याचे सांगितले. त्यावेळी आपल्याला काहीच करता आले नसल्याची खंत या युजरने व्यक्त केलीये. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी