Railway Fact: ट्रेनचा प्रवास करताना कुठं कुठं शोधणार टीटीईला; जाणून घ्या काय आहे नियम

Railway Fact in marathi: आज या लेखात आम्ही तुम्हाला टीटीईच्या बर्थ विषयी सांगणार आहोत. ही माहिती घेऊन तुम्ही रेल्वे प्रवासाला जाताना याचा फायदा होईल, आणि प्रवासातील तुमची अडचणी दूर होईल. म्हणजेच काय तुमचा प्रवास हा आरामदायी आणि निसंकोचपणे होईल. ट्रेनच्या सर्व बर्थमध्ये टीटीई आणि सुरक्षा रक्षकांचे बर्थ निश्चित असतात.

Railway Fact: While traveling by train, the TTE will be searched; Know what the rules are
ट्रेनचा प्रवास करताना कुठं कुठं शोधणार टीटीईला  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • ट्रेनच्या सर्व बर्थमध्ये टीटीई आणि सुरक्षा रक्षकांचे बर्थ निश्चित असतात.
  • सुपरफास्ट ट्रेनमध्ये प्रवास करताना प्रवाशांना TTE ला भेटण्यासाठी A1कोचवर जावे लागेल.
  • रेल्वेकडून मोफत वायफाय सुविधा दिली जाते.

Railway Fact in marathi: भारतातील (India) साधरण 99 टक्के लोक हे रेल्वे प्रवास करतात. कमी भाड्यामध्ये लांब पल्ल्याचा प्रवास या रेल्वेने केला जातो. या प्रवासात अनेकांना टीटीई कधीच सापडत नाही. संपूर्ण रेल्वे डब्बे (Railway coaches)पाहिले तरी टीटीई (TTE) अनेकांना मिळत नाहीत. यामुळे बहुतेक प्रवाशांना अडचणींसह प्रवास करावा लागतो.  (No one can sit on the train berth except these persons; Know what the rules are)

अधिक वाचा  : पांढरे आणि चमकदार दातांसाठी करा हे उपाय

आज या लेखात आम्ही तुम्हाला टीटीईच्या बर्थ विषयी सांगणार आहोत. ही माहिती घेऊन तुम्ही रेल्वे प्रवासाला जाताना याचा फायदा होईल, आणि प्रवासातील तुमची अडचणी दूर होईल. म्हणजेच काय तुमचा प्रवास हा आरामदायी आणि निसंकोचपणे होईल. ट्रेनच्या सर्व बर्थमध्ये टीटीई आणि सुरक्षा रक्षकांचे बर्थ निश्चित असतात. परंतु ज्यांना याची माहिती नसते, त्यांना मोठी अडचण होत असते. यामुळे हा लेख तुम्हाला खूप फायद्याचा ठरेल कारण तुम्हाला टीटीईच्या बर्थची माहिती देणार आहोत. 

अधिक वाचा  : महिलेला संतृष्ट करण्यासाठी अंगी हवीत कुत्र्यासारखे हे गुण

राजधानीमध्ये येथे मिळतो टीटीई   

शताब्दी, राजधानी एक्सप्रेससह मेल आणि एक्सप्रेस गाड्यांमध्ये प्रत्येक स्लीपर कोचच्या 7 क्रमांकाच्या बर्थवर TTE असते. दुसरीकडे, इंटरसिटी ट्रेनमध्ये, पर्यायी कोच म्हणजे D1, D3, D5 मध्ये 1 क्रमांकाचा बर्थ TTE हा असतो. तर गरीबरथच्या चेअरकारमध्ये पर्यायी  बर्थ G1, G3, G5, G7कोच  मध्ये  7 नंबर बर्थ टीटीई असतो.

अधिक वाचा  :  नोकरी करणाऱ्या महिलांसाठी फिटनेस टिप्स

तर गरीबरथच्या इकॉनमी क्लासमध्ये टीटीई हा B1आणि BE1 मध्ये 7 क्रमांकच्या बर्थमध्ये असतो. सुपरफास्ट ट्रेनमध्ये प्रवास करताना प्रवाशांना TTE ला भेटण्यासाठी A1कोचवर जावे लागेल. A1कोचमधील बर्थ क्रमांक 5 हा TTE साठी आहे. RPF आणि GRP कर्मचार्‍यांसाठी, रेल्वेने S1 चे 63 क्रमांकाचे बर्थ ठेवले आहेत.

जाणून घ्या रेल्वेशी संबंधित इतर माहिती

जेव्हा आपण रेल्वेचे तिकीट काढतो तेव्हा रेल्वे प्रवाशांना एक विशेष सुविधा देते. रेल्वेकडून मोफत वायफाय सुविधा दिली जाते. रेल्वे स्थानकांवर बसवलेले वायफाय स्थानकावर उपस्थित असलेले सर्व लोक वापरू शकतात. स्थानकावर उपस्थित असलेले प्रवासी आणि लोक या सुविधेचा मोफत लाभ घेऊ शकतात.

अधिक वाचा  :  श्री रामाच्या नावावर ठेवा आपल्या मुलाचं नाव

रेल्वेचे काही नियम 

भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक नियम केले आहेत, त्यातील एक नियम म्हणजे रात्री टीसी तिकीट तपासण्यासाठी तुम्हाला झोपेतून उठवू शकत नाही. रात्री 10 वाजेपासून ते सकाळी सहा वाजेपर्यंत या वेळेत टीसी तिकीट तपासण्यासाठी तुम्हाला झोपेतून उठवू शकत नाही.

पण जर तुम्ही रात्री 10 वाजेनंतर रेल्वे पकडली असेल तर तुम्हाला तिकीट दाखवावे लागेले. यासह प्रवाशी एसीच्या पहिल्या वर्गातील डब्ब्यात फक्त 40 किलो वजनी सामान घेऊ शकतो किंवा स्लीपर क्लासमध्ये प्रवाशी फक्त 15 किलो वजनी सामान घेऊ शकतो. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी