Bihar Violence: पटना: रेल्वे भरतीच्या प्रक्रियेत घोटाळा (Railway recruitment scam) केल्याचा आरोप करत बिहारमधील (Bihar) विद्यार्थी (Student) आक्रमक झाले होते. या आंदोलनाला प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) दिवशीच हिंसक वळण लागले. नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीअंतर्गत (Non Technical Popular Category) होणाऱ्या नोकरी भरतीसाठी (recruitment ) दुसऱ्या टप्प्यातील यादी जाहीर झाली नसल्यानं घोटाळ झाल्याचा आरोप केला जात असून विद्यार्थी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं असून याला यूट्यूबर खान सर जबाबदार असल्याचं म्हटलं जात आहे.
आंदोलनकर्ते संतप्त विद्यार्थ्यांनी गया (Gaya, Bihar) येथे ट्रेनचे इंजिनच (Train) पेटवून दिले होते. याप्रकरणी आता एकूण 400 जणांवर गुन्हा दाखल (FIR) झाला आहे. विशेष म्हणजे यात प्रसिद्ध यूट्यूबर (Youtuber) खान सर (Khan Sir) यांच्यावरही एफआयआर दाखल करण्यात आली आहे. त्यांच्या व्हिडिओमुळेच आंदोलनाला हिंसक (Violence) वळण मिळालं असा आरोप करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे भरती बोर्डाने (RRB) नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीअंतर्गत (NTPC) नोकरभरतीसाठी सीबीटी-2 परीक्षाचे निकाल 14 आणि 15 जानेवारी 2022 रोजी जारी केले. त्याच्या आधारे सीबीटी-2 म्हणजेच दुसऱ्या टप्प्याची परीक्षा घेण्याच्या दृष्टीने उमेदवारांची यादी निश्चित करणं आवश्यक होतं. मात्र या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आरआरबी एनटीपीसीचा निकाल देताना घोटाळा करण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. याच मुद्द्यावरुन बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये आंदोलन आणि रेल्वे भरती बोर्डाविरोधात विद्यार्थ्यांनी रेल्वे मार्ग रोखून धरले. बिहारमधील गया जिल्ह्यात बुधवारी याच आंदोलनादरम्यान एका ट्रेनला आंदोलक विद्यार्थ्यांनी आग लावली होती. ही हिंसा करण्यासाठी खान सरांचा एक व्हायरल व्हिडिओ बघून आपण जाळपोळ केली हे काही विद्यार्थ्यांनी मान्य केलं आहे.
खान सर हे प्रसिद्ध शिक्षक आणि यूट्यूबर आहेत. यूट्यूबवर त्याचं खान जीएस रिसर्च सेंटर या नावाने एज्युकेशनल चॅनेल आहे. स्पर्धा परिक्षा आणि सामान्य ज्ञान ते आपल्या चॅनेलमधून देत असतात. त्यांच्या शिकवण्याची पद्धत, विषय सोपा करुन सांगण्याची कला आणि एकुणच त्यांची बोलण्याची शैली यामुळे ते सोशल मीडियावर प्रसिद्ध आहेत.