Indian Railway: रेल्वेच्या तिकिटावर सबसिडी नाकारता येणार; लोकलच्या मासिक पासवरही?

लोकल ते ग्लोबल
Updated Jul 10, 2019 | 17:09 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

Indian Railway: रेल्वेही आता प्रवाशांना सबसिडी नाकारण्याची सोय करून देणार आहे. रेल्वे त्यावर काम करत असून, येत्या काही दिवसांत सबसिडी नाकारण्याची सोय उपलब्ध होणार आहे. आर्थिक पाहणी अहवालात याचा उल्लेख आहे.

Indian railway
रेल्वेच्या तिकिटावर सबसिडी नाकारता येणार  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • गॅस प्रमाणे रेल्वेच्या तिकिटावरही सबसिडी नाकारता येणार
  • रेल्वेचा प्रस्ताव विचाराधीन; आर्थिक पाहणी अहवालात उल्लेख
  • मुंबईत लोकलच्या पासवरही सबसिडी नाकारता येणार

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारने पहिल्या टर्ममध्ये गॅस सिलेंडरची सबसिडी नाकारण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला होता. आता रेल्वेही अशाच प्रकारे प्रवाशांना सबसिडी नाकारण्याची सोय करून देणार आहे. रेल्वे त्यावर काम करत असून, येत्या काही दिवसांत सबसिडी नाकारण्याची सोय उपलब्ध होणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी सादर करण्यात आलेल्या आर्थिक पाहणी अहवालात याचा उल्लेख आहे. आता रेल्वे प्रवाशांना सबसिडी सोडण्याचे आवाहन करणार आहे. रेल्वेला आणखी आधुनिक करण्यासाठी याचा फायदा होणार आहे. या संदर्भात इंडियन एक्स्प्रेसने सविस्तर वृत्त दिले आहे. त्यानुसार रेल्वे तिकिटावर मिळणारी संपूर्ण सबसिडी किंवा त्या सबसिडीचा थोडा भाग नाकारण्याची मुभा देण्यात येणार आहे. रेल्वे या संदर्भात विचार करत असून, त्याची तयारीही सुरू केली आहे. मुंबईतही उपनगरीय रेल्वेच्या मासिक पासवर असणारी सबसिडी नाकारण्याचाही पर्याय दिला जाऊ शकतो.

सबसिडी सोडली तर तिकिट कन्फर्म

प्रवासी तिकिटातून रेल्वेला केवळ ५७ टक्केच भाग मिळतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जर कोणी प्रवासी सबसिडी सोडणार असेल तर, त्याचे भाडे वाढणार आहे. पण, एनपीजी सिलिंडरची सबसिडी सोडण्यासारखा हा प्रकार निश्चितच नाही. रेल्वे प्रवाशांना देत असलेली सबसिडी त्यांच्या मालवाहतुकीतून वसूल करत असते. त्यासाठी सरकारी खजिन्यातील पैसे उचलले जात नाहीत. जर, एखाद्या प्रवाशाने सबसिडी सोडलीच तर, त्याला रेल्वेकडून काय देण्यात यावे, यावर सरकार सध्या विचार करत आहे. जर, एखादा प्रवासी सबसिडी सोडत असेल तर, त्याला कन्फर्म तिकिट मिळेल, अशी व्यवस्था करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. अशी पद्धत सुरू झाली तर, ती तात्काळ सिस्टिमच असणार आहे. फक्त त्याचे नाव वेगळे असेल. भविष्यात रिझर्व्हेशन फॉर्मवरच सबसिडी सोडण्याचा ऑप्शन असणार आहे. ऑनलाईन सिस्टिममध्ये मात्र हे सोपे होणार आहे. तिथं सिनिअर सिटिझनला सबसिडी सोडण्याचा पर्याय मिळतो आहे. रेल्वेने जुलै २०१७मध्ये सिनिअर सिटिझनला सबसिडी सोडण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला होता. सध्या हा पर्याय अनेकजण स्वीकारत आहेत.  

रेल्वेचे आणि विमानाचे तिकिट एकच

सिनिअर सिटिझनला सबसिडी सोडण्याचा पर्याय दिल्यानंतर आतापर्यंत ४८ लाख प्रवाशांनी सबसिडी नाकारली आहे. त्याचा रेल्वेला फायदा झाला असून, रेल्वेच्या खिशात ७८ कोटी रुपये पडले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वे प्रत्येक प्रवाशावर खर्च होणाऱ्या १ रुपयातील केवळ ३८ पैसेच रिकव्हर करू शकते. पण, सबसिडीचा पर्याय आला तर यात बदल होऊ शकतो. एसी क्लासमधील प्रवाशाने सबसिडी सोडली तर, त्याचे तिकिट विमानाच्या तिकाटाएवढेच होणार आहे. याविषयावर गंभीर चर्चा सुरू आहे. सबसिडी सोडली तर तिकिटाचे दर दुप्पट होणार नाहीत, असे सूत्रांनी सांगितले आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Indian Railway: रेल्वेच्या तिकिटावर सबसिडी नाकारता येणार; लोकलच्या मासिक पासवरही? Description: Indian Railway: रेल्वेही आता प्रवाशांना सबसिडी नाकारण्याची सोय करून देणार आहे. रेल्वे त्यावर काम करत असून, येत्या काही दिवसांत सबसिडी नाकारण्याची सोय उपलब्ध होणार आहे. आर्थिक पाहणी अहवालात याचा उल्लेख आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles