Indian Railways : रिझर्व्हेशन असूनही नाही मिळाली सीट, रेल्वेला १४ वर्षांनंतर १ लाखाचा दंड

railways have to pay 1 lakh fine to passenger who not get seat despite of reservation : भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी काही नियम तयार केले आहेत. या नियमांचा आधार घेत एका ज्येष्ठ नागरिकाने रेल्वे प्रवासादरम्यान त्याच्यावर झालेल्या अन्यायाप्रकरणी दाद मागण्यासाठी ग्राहक न्यायालयात याचिका केली होती. याचिकेवर ग्राहक न्यायालयाने तब्बल १४ वर्षांनी निर्णय दिला.

railways have to pay 1 lakh fine to passenger who not get seat despite of reservation
Indian Railways : रिझर्व्हेशन असूनही नाही मिळाली सीट, रेल्वेला १४ वर्षांनंतर १ लाखाचा दंड  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Indian Railways : रिझर्व्हेशन असूनही नाही मिळाली सीट, रेल्वेला १४ वर्षांनंतर १ लाखाचा दंड
  • ग्राहक न्यायालयाने दिला निर्णय
  • रेल्वेला बसला हलगर्जीपणाचा फटका

railways have to pay 1 lakh fine to passenger who not get seat despite of reservation : नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी काही नियम तयार केले आहेत. या नियमांचा आधार घेत एका ज्येष्ठ नागरिकाने रेल्वे प्रवासादरम्यान त्याच्यावर झालेल्या अन्यायाप्रकरणी दाद मागण्यासाठी ग्राहक न्यायालयात याचिका केली होती. याचिकेवर ग्राहक न्यायालयाने तब्बल १४ वर्षांनी निर्णय दिला. ग्राहक न्यायालयाने याचिकाकर्त्याच्या बाजुने निर्णय दिला. रेल्वेला ग्राहक न्यायालयाने एक लाख रुपयांचा दंड ठोठावला.

इंद्रनाथ झा नावाचे प्रवासी १९ फेब्रुवारी २००८ रोजी दरभंगा येथून दिल्लीला जात होते. या रेल्वे प्रवासाकरिता झा यांनी रिझर्व्हेशन केले होते. पण ट्रेनमध्ये प्रवेश केल्यानंतर टीसीने झा यांना नवी माहिती दिली. काही सीट रिकाम्या असल्यामुळे झा यांचे तिकीट वरच्या वर्गात अपग्रेड केले आहे; असे टीसी म्हणाला. ही माहिती मिळाल्यानंतर झा संबंधित डब्यात गेले. तिथे त्यांच्या नावाने सीट नसल्याचे झा यांच्या लक्षात आले. परत येईपर्यंत त्यांची रिझर्व्ह केलेली सीट टीसीने दुसऱ्या व्यक्तीला दिली होती आणि ती व्यक्ती सीटवर बसली होती. यामुळे रिझर्व्हेशन असूनही झा यांना संपूर्ण प्रवास डब्यात उभे राहून करावा लागला होता. या प्रकरणात इंद्रनाथ झा यांनी ग्राहक न्यायालयात दाद मागितली. 

ग्राहक न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकल्यानंतर इंद्रनाथ झा यांच्यावर रेल्वेकडून अन्याय झाल्याची बाब मान्य केली. यानंतर ग्राहक न्यायालयाने रेल्वेला दंड ठोठावला. तिकिटाचा घोळ घातल्याप्रकरणी ग्राहक न्यायालयाने रेल्वेला ५० हजारांचा दंड ठोठावला तसेच प्रवाश्याला त्रास झाल्याप्रकरणी कोर्टाने रेल्वेला २५ हजार रुपयांचा दंड केला. या व्यतिरिक्त प्रवाश्याला न्यायालयीन खर्चाची भरपाई म्हणून सुमारे २५ हजार रुपये देण्याचा आदेश न्यायालयाकडून देण्यात आला आहे. यामुळे रेल्वे सुमारे एक लाख रुपयांचा फटका बसला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी