स्पेशल ट्रेन आणि स्पेशल ट्रेनचे दर रद्द होणार

Railways to discontinue special trains, revert to certain pre-Covid-19 fares रेल्वेने लांब पल्ल्याच्या गाड्यांचा विशेष हा दर्जा रद्द करण्याचा तसेच कोरोना काळातील दरवाढ मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

Railways to discontinue special trains, revert to certain pre-Covid-19 fares
स्पेशल ट्रेन आणि स्पेशल ट्रेनचे दर रद्द होणार 
थोडं पण कामाचं
  • स्पेशल ट्रेन आणि स्पेशल ट्रेनचे दर रद्द होणार
  • रेल्वेला २०२१-२२च्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत दुसऱ्या तिमाहीत ११३ टक्के जास्त उत्पन्न
  • पुढील २-४ दिवसांत रेल्वेच्या वेळापत्रकात बदल होईल आणि १७०० पेक्षा जास्त लांब पल्ल्याच्या गाड्यांची सेवा पुन्हा पूर्ववत होईल

Railways to discontinue special trains, revert to certain pre-Covid-19 fares । नवी दिल्ली: कोरोना काळात रेल्वेने अनेक लांब पल्ल्याच्या मेल आणि एक्सप्रेस गाड्यांना विशेष मेल आणि विशेष एक्सप्रेस असा दर्जा दिला होता. तसेच या गाड्यांच्या दरांमध्ये वाढ केली होती. नागरिकांनी कोरोना काळात प्रवास टाळावा म्हणून मुद्दाम हा उपाय करण्यात आला होता. आता कोरोना संकट नियंत्रणात येऊ लागल्यामुळे रेल्वेने लांब पल्ल्याच्या गाड्यांचा विशेष हा दर्जा रद्द करण्याचा तसेच कोरोना काळातील दरवाढ मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

अनेक विशेष मेल आणि विशेष एक्सप्रेस गाड्यांच्या मूळ क्रमांकाच्या आधी शून्य हा अतिरिक्त आकडा टाकून त्यांना विशेष दर्जा दिला होता. विशेष दर्जा रद्द होताच गाडीचा मूळ क्रमांक कार्यरत होईल.

रेल्वेच्या वेळापत्रकातून अनेक गाड्यांचा विशेष हा दर्जा पुढील २-४ दिवसांत जाईल. तिकिटातील दरवाढ पण पुढील २-४ दिवसांत टप्प्याटप्प्याने मागे घेतली जाईल. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळेल. कोरोना संकटापूर्वीचे रेल्वेचे वेळापत्रक लागू होईल आणि सुटीच्या काळात निवडक हॉलिडे स्पेशल अर्थात सुटी विशेष गाड्या चालवल्या जातील; अशी माहिती रेल्वेने दिली. 

नियमित लांब पल्ल्याच्या गाड्या आणि सुटीच्या काळात चालवल्या जाणाऱ्या हॉलिडे स्पेशल अर्थात सुटी विशेष गाड्या ही व्यवस्था पहिले लॉकडाऊन जाहीर होण्याआधी अस्तित्वात होती. हीच व्यवस्था पुन्हा लागू होईल. वेळापत्रक पूर्ववत झाले तरी रेल्वे परिसरात आणि रेल्वे प्रवासात कोविड प्रोटोकॉलचे पालन बंधनकारक राहील, असे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले. पुढील २-४ दिवसांत रेल्वेच्या वेळापत्रकात बदल होईल आणि १७०० पेक्षा जास्त लांब पल्ल्याच्या गाड्यांची सेवा पुन्हा पूर्ववत होईल.

रेल्वेने विशेष गाड्या चालवून आणि तिकिटांमध्ये दरवाढ करुन २०२१-२२च्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत दुसऱ्या तिमाहीत ११३ टक्के जास्त उत्पन्न कमावले. यामुळे आर्थिक अडचणींमधून जात असलेल्या रेल्वेला दिलासा मिळाला. आता सेवा पूर्ववत करुन प्रवाशांना दिलासा दिला जाईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी